ऑपरेशन व्हाईट शार्क भाग 3
मागील भागात आपण पाहिले राघव आणि त्याचे सहकारी स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले . त्याचवेळी भारतीय पत्रकार नयना भास्कर हिच्यावर हल्ला झाला . आता पाहूया पुढे .
जवळपास सहा फूट उंच , पिंगट तपकिरी डोळे , कोरलेली दाढी आणि कपाळावर असलेला गंध . त्याला पाहून स्वेतलाना मंद हसली . तो पुलमध्ये उतरला .
दोघेही एकमेकांचा अंदाज घेत पोहत होते . त्याच्याजवळ जाऊन स्वेतलाना थोडीशी थांबली आणि तिने डिजिटल वॉच एक्सचेंज केले .
काहीही न बोलता दोघेही पूलच्या बाहेर पडले . स्वेतलाना निघून गेली आणि तो शॉवर घ्यायला आत आला . चेंज करून त्याने कपाळावर गंध रेखला आणि तो शर्ट घालून बाहेर पडला .
" हॅलो , जिग्नेश स्पीकिंग . आज पार्सल मिळून जाईल पन्ना भाय . "
त्याने हळूच सांगितले .
त्याने हळूच सांगितले .
" ओ जुग्गु डार्लिंग सो स्वीट ऑफ यू . "
पन्ना किंचाळला .
पन्ना किंचाळला .
" ॲलेक्स बेबी कम हिअर . "
पन्नाने त्याचा अमेरिकन मित्र ॲलेक्सला बोलावले .
पन्नाने त्याचा अमेरिकन मित्र ॲलेक्सला बोलावले .
" बेबी , पिक द ज्वेलरी बॉक्स फ्रॉम एअरपोर्ट . "
ॲलेक्सने एक डीप किस दिला आणि बाहेर पडला .
ॲलेक्सने एक डीप किस दिला आणि बाहेर पडला .
त्यापाठोपाठ अमन देखील होता . ॲलेक्स भारतात दाखल झाल्यापासून आयबी ऑफिसर त्याच्यावर नजर ठेवून होते .
अणुऊर्जेत डॉक्टरेट असणारा ॲलेक्स त्याची तस्करी करण्यात देखील तरबेज होता . आजवर कोणीही त्याला पुराव्यासह पकडू शकले नव्हते . भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर पन्ना त्याच्या प्रेमात वेडा झाल्याने त्याला व्ही. आय. पी. सर्कलमध्ये सहज प्रवेश मिळाला होता .
बर्न विमानतळावर ॲलेक्सने पार्सल ताब्यात घेतले आणि त्याची कार बाहेर पडली . अमन ठराविक अंतरावर त्याचा पाठलाग करत होता . थेट हॉटेलवर न जाता ॲलेक्स एका जीर्ण इमारतीजवळ थांबला .
त्याने पार्सल बॉक्स उचलला आणि आत प्रवेश केला . इतके महत्वाचे पार्सल घेऊन हा इथे का थांबला असेल ? याचा विचार करून अमन त्याच्यापाठोपाठ आत गेला .
एका मोठ्या खोलीत ॲलेक्स गेला आणि जवळपास चार तासांनी तो बाहेर पडला आणि त्यानंतर एक तासाने तिथून एक वृद्ध माणूस आणि एक मुलगी बाहेर पडली . अमन निघाला आणि त्याच्या मानेवर वार झाल्याने तो कोसळला .
परंतु तोपर्यंत त्याने फोटो सेंड केले होते .
" डॅड , व्हॉट अबाऊट हिम ? "
त्या मुलीने विचारले .
त्या मुलीने विचारले .
" थ्रो हिम इन द आइस . कोल्डनेस किल हिम डोन्ट वरी . "
हसून त्या वृद्धाने उत्तर दिले .
हसून त्या वृद्धाने उत्तर दिले .
राघव गाढ झोपेत असताना त्याच्या अंगावरची चादर खसकन ओढून डेजी ओरडली , " राघव गेट अप . अमन हॉटेलमध्ये नाहीय . "
तिचे वाक्य ऐकताच राघव ताडकन उठला . रात्री सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करताना त्याला गाढ झोप लागली होती .
" व्हॉट , कुठे गेला अमन ? "
राघव ओरडला .
राघव ओरडला .
" माहित नाही . काल रात्री सांगितल्याप्रमाणे आपण सकाळी सुरुवात करणार होतो चौकशीला . "
डेजी म्हणाली .
डेजी म्हणाली .
" थांब फोन लावून बघतो . "
असे म्हणून त्याने फोन घेतला आणि त्याने नोटिफिकेशन पाहिले .
असे म्हणून त्याने फोन घेतला आणि त्याने नोटिफिकेशन पाहिले .
पहाटे तीन वाजतानाचा अमनचा मॅसेज होता . त्याने मॅसेज उघडला आणि पाहिले . दोन फोटो होते .
" डेजी चल लवकर आता आपल्याला लोकल पोलिसांची मदत लागेल . अमन धोक्यात असू शकतो . "
इकडे भारतात सलीम आणि सखाराम शायराला शोधत शहरात पोहोचले . आपली एवढी शिकलेली मुलगी हॉटेलात काम करत असलेली बघून सलीम घाबरला होता . त्यांनी प्रियाला गाठले .
" शायरा हित आली का पोरी ? "
सखारामने हात जोडून विचारले .
सखारामने हात जोडून विचारले .
" काका गेले चार दिवस ती गावाला गेली ती परत आलीच नाहीय . तिचा फोन देखील बंद आहे . "
प्रियाने सरळ सांगितले . सलीम आणि सखाराम निराश होऊन परत फिरले .
प्रियाने सरळ सांगितले . सलीम आणि सखाराम निराश होऊन परत फिरले .
राघव आणि डेजी तिथल्या पोलिसांकडे गेले . ॲडम नावाचा पोलीस अधिकारी आणि त्याची सहकारी त्यांना भेटले .
" आय एम राघव शास्त्री अँड माय असिस्टंट डेजी . वुई आर इंडियन ऑफिसर्स . "
राघवने ओळखपत्रे दिली .
राघवने ओळखपत्रे दिली .
" चेक आयडी . "
त्याने सहकारी ऑफिसरला सांगितले .
त्याने सहकारी ऑफिसरला सांगितले .
हे दोघे भारतीय अधिकारी असल्याचे ॲडमने खात्री करून घेऊन त्यांना विचारले , " काय मदत हवी आहे तुम्हाला ? "
" आमचा एक सहकारी गायब आहे आणि त्याने शेवटी हा मॅसेज पाठवला आहे . "
राघवने फोन समोर ठेवला .
राघवने फोन समोर ठेवला .
त्यातील फोटो ॲडमने आपल्या सिस्टिमवर घेतले .
" डोन्ट वरी आपल्याला ह्यांना शोधणे फार अवघड नाही . तुम्ही कुठे उतरला आहात ? "
त्याने विचारले .
राघव आणि डेजी आवश्यक माहिती देऊन बाहेर पडले .
त्याने विचारले .
राघव आणि डेजी आवश्यक माहिती देऊन बाहेर पडले .
अमन जागा झाला तेव्हा तो हॉटेलच्या मागच्या बाजूला होता . त्याच्या अंगावर गरम कपडे होते . त्याचा फोन आणि कागदपत्रे मात्र गायब होती . आपण जिवंत असल्याची जाणीव होताच तो हॉटेलच्या आत आला .
" मिस्टर अमन कसे आहात ? "
संजूने विचारले .
संजूने विचारले .
" मस्त , सकाळी उठून फिरायला गेलो होतो . " त्याने उत्तर दिले .
" तू इतक्या सकाळी कुठे चाललीस ? "
त्याने विचारले .
त्याने विचारले .
" मेघना ज्वेलरी आणि कॉस्च्युम ट्रायल घेणार आहे . "
तिने उत्तर दिले .
तिने उत्तर दिले .
तितक्यात राघव पळत येताना दिसला . संजूकडे बघून तो पुढे काहीच न बोलता फक्त आत चल असे म्हणाला . त्या गडबडीत मागे कोणाशी तरी टक्कर होऊन राघव खाली पडला .
" हे , आर यू ब्लाइंड ? "
मेघना चिडली होती आणि ती इतक्याजवळ आलेली पाहून राघवने तिला हात देवून उठवले .
मेघना चिडली होती आणि ती इतक्याजवळ आलेली पाहून राघवने तिला हात देवून उठवले .
त्याच्या भक्कम हाताचा आधार खरतर तिला सुखावून गेला .
" थँक यू . " मेघना जाताना म्हणाली .
" सर्वात आधी त्या ॲडमला कळव हा सापडला ते . "
राघव लॉबीमध्ये ओरडत असताना एका खोलीतून एक कपल बाहेर पडले .
राघव लॉबीमध्ये ओरडत असताना एका खोलीतून एक कपल बाहेर पडले .
त्यांचा पेहराव भारतीय होता मात्र तरीही राघवला त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्याचे आठवत होते .
तितक्यात ॲडमने फोन केला आणि आम्ही त्या दोघांना शोधले आहे . आज रात्री ते ताब्यात असतील .
असे सांगितले .
तितक्यात ॲडमने फोन केला आणि आम्ही त्या दोघांना शोधले आहे . आज रात्री ते ताब्यात असतील .
असे सांगितले .
राघव आपण संध्याकाळी पार्टीला आमंत्रित आहोत . तशी व्यवस्था आपण केली आहे . आपल्या आसपासच डीलर आहेत . पार्टीतून काहीतरी नक्कीच मिळेल . "
डेजी म्हणाली .
" बाकी काहीच मिळाले नाही तरी थोडी मजा तरी करता येईल . " टाळी देत अमन आणि राघव म्हणाले .
" यू डर्टी बॉईज , जर कुठे फसलात तर बघा ."
डेजी रागावून निघून गेली .
डेजी रागावून निघून गेली .
स्वेतलाना आणि व्हिक्टर पार्टीसाठी तयार झाले होते . आज पार्टी आणि उद्या मुख्य शो असणार होता .
त्या ग्लॅमरस पार्टीत राघव एलिना बरोबर नाचत होता आणि पार्टी रंगत गेली तसा राघव आणि एलिना तिथून गायब झाले .
डेजी आणि अमन संशयास्पद व्यक्ती नोट डाउन करत होते . तितक्यात ॲलेक्स जवळ आला आणि त्याने अमनला ड्रिंक ऑफर केली .
ॲलेक्सच्या मागून एक भारतीय तरुण आला आणि त्याने ॲलेक्सला मागुन मिठी मारली .
अचानक अमन खाली घसरून पाडताना त्या तरुणाने हात दिला . ॲलेक्स आणि तो तरुण जाताना अमन हसला त्याचे काम झाले होते .
वृद्ध माणूस काय माहिती देईल ?
ॲलेक्सला अमन ट्रॅप करू शकेल ?
स्वेतलाना आणि व्हिक्टर नक्की कोण असतील ?
वाचा पुढील भागात
अष्टपैलू 2025 स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा