Login

ऑपरेशन व्हाईट शार्क भाग 4

वाचा एक थरारक रहस्य कथा

ऑपरेशन व्हाईट शार्क भाग 4

मागील भागात आपण पाहिले ॲलेक्सने काहीतरी फेरफार केले आणि अमनने ती माणसे शोधली . पार्टी रंगात आली असताना राघव गायब झाला आता पाहूया पुढे .


एलिना आणि राघव तिच्या खोलीत आले . त्याने तिला पिळदार बाहुपाशी जखडले आणि तिचे नाजूक ओठ त्याच्या ओठांत गुंफणार इतक्यात तिने त्याच्या छातीवर हात ठेवला .

" वेट , वन मिनिट . "

ती वॉशरूम वरून येईपर्यंत राघव अधीर झाला होता . ती जवळ येऊन त्याच्या कुशीत झोपली आणि तिचे उष्ण श्वास त्याच्या मानेवर जाणवू लागले . तिने आपले नाजूक ओठ त्याच्या ओठांवर टेकवले आणि राघव बेहद्द खूश झाला .


त्याला नशा जाणवू लागली आणि दोन मिनिटात एलिना बाजूला झाली . पडद्याआड लपलेली स्वेतलाना बाहेर आली .


" वेल डन बेब . आता उद्याच्या शोपर्यंत हा इथे कैद असेल . "

तिने राघवला पूर्ण विवस्त्र करून बांधून टाकले . त्याचा फोन ऑफ करून स्वेतलाना सूट लॉक करून बाहेर पडली .

" अमन , आपल्याला पोलीस स्टेशनवर जावे लागेल . राघव फोन बंद करून..."
डेजी चिडली होती .

अमन आणि डेजी बाहेर पडले .



ॲडमने त्या दोघांना पकडले होते .
" मी वकिलांशी बोलणार फक्त ."
ती मुलगी असे म्हणताच ॲडमची सहकारी ऑफिसर चिडली आणि तिने एक मुस्कटात लगावली .

" यू बिच . तू एका आयबी ऑफिसरवर हल्ला केला आहेस . " तितक्यात डेजी आत आली .

" ऑफिसर , यांना दोघांना गाडीत भरू आणि सरळ बर्फाच्या तळ्यात फेकून देऊ . "
ती सरळ म्हणाली .

" प्लीज लेट अस गो . " म्हातारा घाबरला .

" तुम्हाला जाऊ देणार फक्त मला सांगा ॲलेक्स तुमच्याकडे कशाला आला होता ? "
अमन शांतपणे म्हणाला .

" ॲलेक्स ? कोण ॲलेक्स ? "
त्याची मुलगी अजूनही बेफिकीर होती .

डेजीने फोन काढला आणि तिच्यासमोर फोटो ठेवला .

" नाऊ स्पीक अप . "
डेजीने दरडावले .

" सांगतो , त्याने एक मॅप दिला होता आणि त्याची शंभर तुकडे करून आम्ही नेकलेसमध्ये भरले . "

तिने उत्तर दिले .


" कसले नेकलेस ?"
अमन चिडला .

" व्हाईट शार्क डिझाईन केलेले आहेत त्यात . "
मुलगी म्हणाली .


ही सर्वाधिक महत्वाची माहिती मिळाली होती . अमन आणि डेजी दोघे वेगाने परत निघाले . राघव अजूनही सापडला नव्हता .



पहाटे ॲलेक्स जागा झाला तेव्हा त्याच्या शेजारी तोच भारतीय तरुण झोपलेला होता . आय जस्ट क्रेझी फॉर दिस ब्राऊन स्किन . असे मनात म्हणून ॲलेक्स परत त्याच्यावर झेपावला .

पंधरा मिनिटांनी तो ॲलेक्सच्या छातीवर डोके ठेवून झोपला होता तितक्यात पन्नाचा फोन आला आणि त्याला एक दीर्घ चुंबन देउन ॲलेक्स बाहेर पडला .

" अमेझिंग " , रियान स्वतःशीच म्हणाला .

स्वित्झर्लंडमध्ये फिरायला आल्याचा निर्णय त्याला ही अनोखी रात्र देवून गेला . रियान शांतपणे पडून असतानाच अचानक एक तरूण आत शिरला .

" फक्त तुझ्या हातात असलेले घड्याळ दे आणि हॉटेल सोडून निघून जा . "
अमन रिव्हॉल्वर रोखत म्हणाला .

रियानने घड्याळ काढून दिले . अमन परत आला आणि त्याने लॅपटॉप उघडला .

तितक्यात डेजी ओरडली ," येस, आता आठवले . "

" डेजी ओरडू नकोस . आधीच राघव गायब आहे . "
अमन चिडून म्हणाला .

" अमन तुला परवा रात्री बाहेर पडलेलं कपल आठवते ? त्यांनी भारतीय कपडे घातले होते पण त्या तरुणाच्या हातावर सात,आठ आणि सहा म्हणजे सातशे शहाऐंशी असा टॅटू होता . "
डेजी एका दमात बोलून गेली .


" डेजी , तो नक्कीच एजंट आहे . आपल्याला सावध असायला हवे . उद्या संध्याकाळी आपली एकमेव संधी आहे . "


" संजू , खिडकीत काय करतेस इतक्या रात्री ? "
मेघना म्हणाली .

" तिथे झाकलेला पुतळा बघत आहे . खाली चाके असणारा एवढा मोठा पुतळा का उभारला असेल ? "
संजू म्हणाली .

" ते माहीत नाही . पण उद्याचा रॅम्प वॉक आम्हाला तिथेच करायचा आहे . "
मेघना एवढे बोलून आत गेली .

बाहेर तीन मोठे कंटेनर येऊन थांबले होते . अंधार असला तरी हालचाल जाणवत होती . स्वेतलाना आणि व्हिक्टर त्यांच्या माणसांना आवश्यक सूचना देऊन निघाले होते .

इथून दोन किलोमीटर अंतरावर एक भव्य कंटेनर तयार होता . बँकेत पन्नास कोटी डॉलर क्रेडिट झाले होते . उरलेले उद्याचा शो संपताच मिळणार होते .


" अमन लूक , उद्याच्या प्रेस एन्ट्रीमध्ये नयना भास्कर देखील आहे . तिच्या नावावर कोणीतरी आत शिरत आहे . "
हॉटेल वेबसाईट हॅक करून डेजी सगळे चेक करत होती .


" डेजी राघव कुठे असेल ? " त्याला शोधायला हवे . "
अमन काळजीत होता .

" अमन आधी डील थांबवली पाहिजे . "

डेजी पुढे फुटेज चेक करत होती .


राघव जागा झाला . त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते . आपण ट्रॅप झाल्याचे त्याला समजले होते . एलिना एजंट असेल ? त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता .

अमन आणि डेजी मला शोधत असतील इथून बाहेर पडायला हवे .


" हलू नकोस नाहीतर मला नको तिथे गोळी मारावी लागेल . " एक भाडोत्री एजंट पुढे आली .

आपण गन पॉईंटवर असल्याचे लक्षात येताच राघव थोडा शांत बसला .


" कम ऑन गर्ल्स चेक करा सगळे . कॉस्च्युम, ज्वेलरी अँड सिक्वेन्स सगळे परत बघा . मला एकही चूक नकोय . "
पन्ना आपल्या टीमला सूचना देत होता .


" हे बेबी , उद्याचा दिवस आपल्यासाठी स्पेशल असणार आहे . " ॲलेक्स त्याला जवळ घेत म्हणाला .

तितक्यात त्याला मॅसेज आला .

" इंडियन ऑफिसर्स आर अराऊंड यू . बी अलर्ट . "
पलीकडून इतकेच बोलून फोन कट झाला .


" उद्याचा शो फायनल झाल्यावर बातमी मिडियात पोहोचवा म्हणजे गृहमंत्री पद आपल्यालाच . "

त्याने अंतिम फोन केला आणि उद्याच्या बिग बँगसाठी तो तयार झाला .



कोण असेल ह्या सगळ्याचा सूत्रधार ?

ॲलेक्स आणि साथीदार पकडले जातील का ?

शायरा सापडेल का ?


वाचा अंतिम भागात.