ऑपरेशन व्हाईट शार्क भाग 5 ( अंतिम )
मागील भागात आपण पाहिले राघव ट्रॅपमध्ये अडकतो . ब्लू प्रिंट कुठे आहे हे अमन आणि डेजी यांना समजते . तिकडे युरेनियम चोरीची बातमी भारतात जाहीर करायची तयारी ॲलेक्सचा बॉस करतो . आता पाहूया पुढे .
सूर्य मावळतीला गेला आणि इकडे ग्लॅमरचा सूर्य उगवला . युरोपमधील सर्वाधिक चर्चेत असलेला फॅशन शो लवकरच सुरू होणार होता . यावेळी ओपनिंगचा मान भारतीय डिझायनरना होता .
" मेघना, एलिना आर यू रेडी बेबस ? "
पन्ना टेन्शनमध्ये अस्वस्थ येरझाऱ्या घालत होता .
पन्ना टेन्शनमध्ये अस्वस्थ येरझाऱ्या घालत होता .
" चिल पन्ना , वुई आर गोइंग टू रॉक . "
मेघना हसत म्हणाली .
मेघना हसत म्हणाली .
" द शो इज ऑन अँड लाईटस आर शायनिंग . "
निवेदकाने जाहीर केले आणि त्याबरोबर समोरच्या भव्य पुतळ्यावरील आवरण हटवले गेले .
एक अतिशय सुंदर जबडा उघडलेला व्हाईट शार्क आणि त्याच्या तोंडात असणारा रॅम्प पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता .
" लेडीज अँड जन्टलमेंटस बिहोल्ड युअर ब्रेथ ."
अशी उद्घोषणा झाली आणि एकेक मॉडेल वॉक करू लागली .
धाडकन खुर्ची पडल्याचा आवाज झाला आणि राघव खाली पडलेला बघुन त्याला उठवायला भाडोत्री एजंट पुढे झाली . तिने खुर्चीला हात घातला आणि त्याचक्षणी राघवने फक्त बोटाने तिच्या मानेची नस दाबली . पुढच्या क्षणी ती खाली कोसळली .
राघवने खाली वाकून ओठांनी चाकू काढला आणि स्वतःला सोडवले . पुढच्या मिनिटाला राघव बाहेर पडला .
" मेघना , बी केअरफुल. "
एलिना तिच्या कानात कुजबुजली .
एलिना तिच्या कानात कुजबुजली .
मेघना इशाऱ्याने विचारू लागली तितक्यात स्वेतलाना दिसल्याने एलिना पुढे गेली .
" व्हिक्टर , बी रेडी . वुई आर गोइंग टू स्टील बिग शार्क ." स्वेतलाना ब्लूटूथवरुन सूचना देत होती .
डेजी तिच्या आसपासच होती . मेघना आणि तिच्यासोबत चार मॉडेल्स मंचावर अवतरल्या . अतिशय सुंदर असे हिरे लावलेले शार्क कोरलेले नेकलेस आणि रेड,ग्रीन गाऊन घातलेल्या ह्या चार अप्सरा आणि त्यापाठोपाठ ॲलेक्स आणि पन्ना मंचावर मागे उभे होते . मॉडेल्स मध्यभागी आल्या आणि स्वेतलानाने तिच्या हातातला पांढरा रुमाल खाली टाकला .
अचानक मागच्या बाजूने आतिषबाजी सुरू झाली आणि उपस्थित लोकांच्या नजरा आकाशावर स्थिरावल्या . त्याचवेळी रॅम्प थरथर करू लागला .
" एलिना रॅम्प हलतोय का ? "
मेघना असे म्हणेपर्यंत तो भव्य रॅम्प चक्क धावू लागला होता . ॲलेक्स पुढे आला .
" चला नेकलेस काढून ह्या पेटीत टाका . "
त्याने दरडावले .
" ॲलेक्स बेबी , काय करतोय तू ? "
पन्ना लाडानेजवळ आला .
त्याचक्षणी ॲलेक्सने त्याला दूर लोटले .
" यू फॅटी पिग , हाऊ द गाय लाइक मी कॅन बी विथ यू . "
ॲलेक्स क्रूर हसला .
पन्ना चिडला आणि रागावून धावून गेला आणि ॲलेक्सने त्याच्या पायावर गोळी घातली .
" एलिना रिमुव्ह ऑल नेकलेस . " ॲलेक्स ओरडला .
" मेघना प्लीज , आपल्याला मारून टाकतील . "
एलिना नेकलेस काढत होती तितक्यात ॲलेक्स धाडकन जमिनीवर कोसळला .
एलिना नेकलेस काढत होती तितक्यात ॲलेक्स धाडकन जमिनीवर कोसळला .
" लवकर हे नेकलेस बॉक्समध्ये भर . " डेजी ओरडली .
एलिना आणि मेघना दोघींनी पटकन नेकलेस बॉक्समध्ये भरले .
" डेजी ड्रॉप द बॉक्स नाहीतर तुझा सहकारी जीव गमवेल . " अमनला गन पॉईंटवर ठेवत स्वेतलाना पुढे आली .
डेजी क्षणभर थबकली . आता पुढे काय करायचे हा विचार ती करत असताना तिला मागे लपलेला राघव दिसला . डेजी बॉक्स घेऊन डेजी हळुहळू पुढे आली . तिने बॉक्स खाली ठेवला आणि सरकवला . स्वेतलाना फक्त बॉक्स घ्यायला वाकली आणि मागून राघवने तिच्या अंगावर झेप घेतली .
अचानक समोरुन दरवाजा उघडताना दिसला आणि तो अख्खा शार्कचा पुतळा समोरच्या भव्य कंटेनरमध्ये गेला . त्याचक्षणी कंटेनरचा दरवाजा बंद झाला .
" लिव्ह मी राघव . तुम्हाला माझ्या माणसांनी घेरले आहे . " स्वेतलाना हसली .
" ट्रान्स्फर रिमेनिंग फिफ्टी करोड . " तिने फोन केला .
थोड्याच वेळात कंटेनर थांबला . समोरून पाकिस्तानी एजंट फवाद आणि टीम समोरून आली .
" वेल डन स्वेतलाना , आता ही ब्लूप्रिंट आणि ह्या व्हाईट शार्कच्या पोटात असलेल्या युरेनियम सिलेंडर वापरुन आम्ही लवकरच आमचे ध्येय साध्य करू . "
फवाद हसला .
फवाद हसला .
" यांचे काय करायचे ? "
स्वेतलानाने विचारले .
" थ्रो देम आऊट . ह्या चार पोरी आम्ही घेऊन जातो . "
तिला उत्तर देऊन फवाद वळला आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या नाकावर एक किक बसली .
" आमच्या भारत देशाची संपत्ती तू कधीच घेऊन जाऊ शकणार नाहीस . "
समोर रिव्हॉल्वर घेऊन संजू उभी होती .
अमन आणि राघव फक्त आ वासून बघत होते .
" स्पेशल एजंट शायरा फ्रॉम आयबी . ऍन सगळ्यांना अटक करा . "
स्वित्झर्लंड गुप्तहेर खात्याची बेस्ट एजंट असलेली ऍन पुढे झाली . तिने लॅपटॉप उघडला आणि स्वेतलानाला समोर आणले .
" पुट युअर फिंगर ऑन द स्कॅनर . " ऍन म्हणाली .
" नो , यू बीच . "
स्वेतलानाने सायनाईड कुपी काढली आणि तोंडात टाकणारा तर राघवने तिचा हात पकडला .
स्वेतलानाचे फिंगरप्रिंट वापरुन तिचा फोन अनलॉक केला गेला आणि ऍनने नंबर लावला .
" स्वेतलाना , काम झाले ना . म्हणजे मिडियात बातमी द्यायला . " समोरुन उत्तर येत असताना उपग्रह वापरुन लोकेशन ट्रेस झाले होते .
फवाद आणि त्याच्या संपूर्ण टीमला रस्त्यावर फेकून देऊन भारतीय जहाजावर युरेनियम सिलेंडर चढवला गेला .
" शायरा , तू हे सगळे शोधले कसे ? "
राघव थोडा दुखावला होता .
राघव थोडा दुखावला होता .
" राघव वाईट वाटून घेऊ नकोस . देशाच्या इज्जतीचा प्रश्न असल्याने दोन टीम तयार केल्या गेल्या . ॲलेक्सचा जुना बॉयफ्रेंड शोधून मी तो नक्की कोणाकडून काम करून घेणार हे शोधले . परंतु भारतातील बॉस सापडत नव्हता . तुमच्या समांतर काम करत असताना खरा व्हाईट शार्क पकडायचा होता . "
असे म्हणून तिने मोबाईलवर आलेली बातमी दाखवली . गृहमंत्री रत्नमाला यांच्या सावत्र भावाला अटक .
" हॅलो , अब्बा शायरा बात करते . "
तिने भारतात उतरल्यावर लगेच फोन लावला .
दुसऱ्या दिवशी शायरा ऑफिसरच्या गणवेशात गावी रवाना झाली . कारण अजून ऑपरेशन शादी बाकी होते ना .
कथा पूर्णपणे काल्पनिक आहे . मनोरंजन ह्याच हेतूने वाचावी .
©® प्रशांत कुंजीर
अष्टपैलू 2025 स्पर्धा
अष्टपैलू 2025 स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा