Login

ऑर्केड : एक थरार 2.0

ऑर्केड : एक थरार
श्रेयाची आई तिला शोधत शोधत आली तेव्हा तिला पार्किंग मध्ये ती बेशुद्ध अवस्थेत दिसली.

ती घाबरली. ओरडून सिक्युरिटी ला आवाज देऊ लागली. तो ही लगेच तिथे आला आणि घाईन त्याच्या टेबल वरून पाणी बॉटल घेऊन आला. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडल आणि श्रेया हळू हळू शुद्धीवर आली.तेव्हाकूठे तिच्या आईच्या जीवात जीव आला.

तिची आई अगदी कवटाळून तिचे मुके घेत होती.

इकडे श्रेयाला मात्र कळतच नव्हत की आई अशी विचित्र का वागते आहे. जवळपास भरपूर गर्दी झाली होती.


जो तो कुजबुजत होता. उन्हाळ्याच्या दिवसात कशाला मुलांना बाहेर घेऊन फिरतात देव जाणे,वगेरे वगेरे.


आईने सेक्युरीटीचे आभार मानले. त्याने ही त्यांचं सामान कार मध्ये घेऊन जायला मदत केली. आई आणि श्रेया दोघीही घरी आल्या.


श्रेया वेगळ्याच धुंदीत दिसत होती. आईने छान स्वयंपाक केला पण श्रेया ला मात्र तितकासा आवडला नाही जेव्हा की सगळचं तिच्या आवडीचे पदार्थ होते.


" श्रेयु ऽऽ तुझ लक्ष नाही जेवणात."


" आईऽऽ मला आवडल नाही आज.उद्या तू सकाळी आलू आणि पालक मिक्स पराठा बनवशिल का आणि जेवणात दोडक्याची डाळ शिजवलेली भाजी आणि दुधीचा हलवा पण!!"


" तूला कधी पासून पालक पराठा आवडू लागला बाळाऽऽ  दोडका भाजी, दुधीचा हलवा, बघू जरा, ताप वगेरे नाही ना तुला!!" तिच्या गळ्याला हात लावून स्वाती बघू लागली.


" आईऽऽ कधीतरी वेगळं चालत."

स्वाती मात्र आश्चर्याने तिच्याकडे बघत बसली.

जरावेळ शतपावलीसाठी दोघीही बाहेर गेल्या.

चालता चालता एक बंगलो समोर श्रेया उभी राहून अतिशय रागाने लालबुंद होऊन बघू लागली.

" श्रेयु ऽऽ चल बाळा. "

" हो!! आलेच आई!!"

दोघीही झोपी गेल्या.


******


त्या बंगल्याच गेट कररर्रर्रर्रऽऽऽऽ करत गेट उघडल. सिक्युरिटी ढाराढुर झोपले होते.

एक एक दरवाजा आपोआप उघडत होता आणि शेवटी एक मोठा बेडरूम समोर आला. एक मोठा हवेचा झोत आला आणि बेडवरचा व्यक्ती खाडकन झोपेतून जागा झाला. तो समोरचा व्यक्ती बघून खूप घाबरला. भीतीने गाळण उडालेली त्याची आणि बाजूला झोपलेल्या बायकोला जोरजोरात हलवून जागे करत होता पणं तिला काही जाग आली नाही.

अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक व्यक्ती समोर धुक्यात उभा होता. जळालेला कुबट वास पूर्ण घरात पसरला होता.

" तू... तू... तू... मास्तर नाहीच... तुझा तर..."

" हेच ना की माझा चांगलाच बंदोबस्त केला तुम्ही आणि तरीही मी आता समोर उभा आहे. " आणि जोरजोरात हसू लागला. त्या माणसाला जोरात उचलून भिंतीवर आदळला.

" नाही मास्तरऽऽ माफ करा. खरंच माफ करा. माझी लहान मुल आहेत हो. प्लीज मला मारू नका." 

" का? माझी ही मुल होती. तुझ्या दोन मुलांना तुझी बायको सांभाळेल. पण माझी मुल... माझी बाहत्तर मुल !! त्यांना ही सोडल नाही तुम्ही??"


" मी ऽऽ मीऽऽ  पुन्हा शाळा चालू करतो. तुमच्या नावानेऽऽ "

" मी तुझ्यासारखा प्रसिद्धीला भुकेला नाही कधीच... पण.. काय चूक होती आमची... माझ्या मुलांचीऽऽ  माझीऽऽ फक्त त्या जागेवर कॉम्प्लेक्स बांधायचं म्हणून आम्हाला रात्रीतून झोपेत जाळून मारलं. मला जिवंत पुरल. आमची आश्रमशाळा हडपली."

" नाही मास्तरऽऽ खरंच माफ करा. मी नव्हतो करणार तस पणं साहेबांनी केलं सगळ. मी फक्त तुम्हालाच मारणार होतो आणि मुलांना मारणार नाही ह्यावरून मी भांडलो पणं होतो. खरंच!! माझ्या बायका मुलांची शपथ!  पण ते थडानी साहेब ऐकायलाच तयार नव्हते. म्हणाले की तुमच्या मागे मुल सुरू ठेवतील शाळा आणि त्यांना काहीही करून ती जागा हवी होती. त्यामुळे मी ही सुपारी घ्याला मना केलं."


" मग कुणी मारलं माझ्या मुलांना?? खर काय ते सांगितल तर तुला जीवदान देईन. माझ्यासाठी एक वेळ तुम्हाला माफ केलं ही असतं पणं माझी मुल!! माझ्याशिवाय कुणीही नव्हत त्यांचं आणि तुम्ही, तुम्ही त्यांना!!  नराधम आहात तुम्ही सगळे लोक. "


" आणि खरंच सांगतो मास्तरऽऽ मी नाही मारलं तुम्हाला किवा तुमच्या मुलांना!!  आई रक्ताची शपथ!! मी फक्त दोन वेळा तुम्हाला धमकी द्यायला आलो होतो. मी खरंच नाही मारलं."


" मग कुणी मारलं. लवकर सांग नाहीतर इथेच तुला गाडून टाकीन."


" चीत्या भाई!!  थडानी साहेबांनी त्याला दिली सुपारी, त्यानेच रात्रीतून आश्रम शाळा पेटवून दिली. शॉर्ट सर्किट करवला बाजूच्या खांबाला आणि शॉर्ट सर्किट मुळे आग लागली अस सांगितलं सगळ्यांनी."


" ह्यावेळी सोडतो तुला माणिक पण मी पुन्हा येईन. जर तू मला भुलवण्याचा प्रयत्न केला तर याद राख!! उद्या रात्री अकरा वाजता चीत्याला मॉलच्या आवरात घेऊन ये. नाही आलास घेऊन तर मी उद्या रात्री पुन्हा येईन. तेव्हा मात्र तुझ काही खर नाही." मास्तर धुक्यात विरून गेले.


सकाळी सकाळी आईने दोन तीन वेळा श्रेया ला आवाज दिला पणं ती काही उठली नाही.

तिच्या रूम मध्ये जावून तिला अगदी हलवून झोपेतून जागं केलं. श्रेयाच डोक मात्र खूप जड पडलं होतं.. 

ती उठून फ्रेश होऊन बाहेर आली. आईने पराठे बनवले होते. ती अगदी त्यावर तुटून पडली आणि आईच कौतुक करत खात होती.


लक्ष्मीने भाजीत दोडका आणि दुधी भोपळा आणलेला, तो ही तिला दिसला. ती जाम खुश होती.

श्रेयाऽऽ स्वातीची एकुलती एक मुलगी.. खूप लाडाने तिला वाढवलं होत. पण तिचे वडील मात्र असूनही नव्हते आणि समजदार झाल्यानंतर श्रेयाने ही आईला विचारलं नाही त्याबद्दल... पण तिचे वडील घरी येत तिला भेटायला, घ्यायला, पण ती कधीही त्यासोबत गेली नाही.

ती अंशुमन थडानीची मुलगी होती पण स्वातीला त्याचे हे धंदे आवडत नसल्याने श्रेया लहान असतानाच तिला घेऊन वेगळी राहत होती.

******

" चित्या भाईऽऽ पंगा झाला. तुझी मदत हवी होती. "
"बर..!"
"थडाणी साहेबांच्या मॉलला पार्किंग मध्ये थांबतो."
"हा.!!"
" एअरपोर्ट रोड वर आहे तो..." एवढे बोलून माणिकने फोन ठेऊन दिला.


*****
चार पाच गाड्या मॉलच्या गेट मधून आता आल्या.

रात्रीचे साडेअकरा झाले होते.

पार्किंग लॉट मध्ये लाइट्स चालू बंद होत होत्या.  माणिकची मात्र भीतीने गाळण उडाली होती. अगदी थर थर कापत होता.


एक गाडी झुंग करत माणिक समोर येऊन उभी राहिली. उंच बांध्याचा चीत्याभाई आणि त्याचे पंतर गाडीतून उतरून बाहेर आले आणि एक वाऱ्याचा झोत माणिकच्या दिशेने आला. माणिक आता मात्र वेगळ्याच लूक मध्ये होता. त्याच्या नजरेत जरब होती, डोळ्यांत आग होती.