Login

ऑर्केड : एक थरार 3.0 ( अंतिम भाग )

ऑर्केड : एक थरार


" मनु भाईऽऽ इथे का बोलवलं इतक्या रात्री??? तुला माहितीये ना.!! इथ शांती केली त्या मास्तरची... तेव्हा कुठ गप झाला तो."

आल्यापासून तोच एकटा बडबडत होता.

" हे सगळ्यांना जायला सांग भाईऽऽ त्यांच्या समोर नाही बोलता येणार."

चित्याभाईने मागे न बघताच हाताच्या इशाऱ्यानेच त्यांना जायला सांगितल.

" बोल आता..." पुन्हा लाइट्स चिर्रर्रर्रर्रऽऽऽऽ.. झाल्या आणि चालू बंद होऊ लागल्या. आणि माणिकच्या जागी आता मास्तर दिसू लागला. अर्धा जळालेला चेहरा.. अंगावर अर्धे कपडे... अंग... जळलेल... पण नजरेत मात्र भयंकर राग... लालबुंद डोळे बघून चित्यभाई ची भीतीने गाळण उडाली. सगळीकडे कुबट जळका वास पसरला होता. आजूबाजूला मुलांची झुंड त्याला दिसू लागली.अंदाधुंदी त्याच्या हातातला घोडा मास्तर वर गोळ्या मारून संपवला पणं मास्तराना काहीच झालं नाही. ते त्याच्या आणखी जवळ जवळ येऊ लागले. ती मुल ही चहूबाजूंनी घेरून त्याच्या जवळ येऊ लागली.

" एे... ऐ... थांब... तू... तू... तू... नाही... मेलास तू... जिवंत कसा मास्तर... ह्या ह्या... हातांनी ... मारला तुला... तू... तू ... नाही... मागेच थांब... मी... साहेब... साहेबांना... आणि तो मोबाईल वर कॉल लावला... साहेब... मास्तर... मास्तर... जिवंत.!!"  आणि तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडला.

भीषण अवस्थेतले मास्तर अजूनच जवळ जवळ येऊ लागले..

सकाळी सिक्युरिटी गार्ड चक्कर मारत होता तेव्हा त्याला शुद्धीवर आला आणि पोलिस देखील हजर झाले सकाळी सकाळी.

चीत्यभाईला हतकड्या घातल्या. कारण काल च सीसीटीव्ही फुटेज सगळीकडे व्हायरल झाल होत. आणि आता चीत्याभईच्या व्हिडिओ मध्ये साहेब हा शब्द ऐकून थडणी साहेबांना ही घाम फुटला होता. पोलिसांनी त्याला तावडीत घेतल म्हणल्या वर त्याने तोंड उघडल की साहेब कोण... तर थडानी साहेब मात्र बाराच्या भावात जाणार होते. दिवसभर तोच विचार करून त्यांचं डोक उठलं होतं. दिवसाढवळ्या दारूचे पेगच्या पेग रिचवत होते.


त्यांना कसोशीने आपल्या मुलीची आठवण येत होती. कदाचित शेवटचे काही क्षण त्यांना तिच्यासोबत घालवायचे होते. सायंकाळी ते स्वातीच्या घरी पोहोचले. स्वातीने तर काही भाव दिला नाही. ती आत निघून गेली. पण ह्यावेळी श्रेयाच रंगरूप मात्र वेगळच होत. ती त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली होती.

इतर वेळी श्रेया देखील त्यांच्यासोबत बोलायची नाही पण आज मात्र ती भरपूर गप्पा मारत होती. स्वातीला देखील आश्चर्य वाटलं होतं पण तिने तिला अडवल नाही.

रात्रीचे पावणे बारा होत आले आणि थडणी च्या कानात वेगळेच आरडाओरडा चित्कराचे आवाज सुरू झाले.

कुत्र्यांचं विव्हाळण सुरू झाल, घरातच दिवे चालू बंद होऊ लागले, समोर बसलेली श्रेया, आता वेगळ्याच नजरेने त्याकडे बघत होती आणि तिरकस बघत तिची जळजळीत नजर विखरलेल्या डोळ्यांतून थडणींवर पडली. ते थर थर कापत होते.

श्रेयाच्य चेहऱ्यात बदल होऊ लागला. संपूर्ण घरभर कुबट जाळका घाणेरडा वास पसरला. आणि तोच अर्धवट जळालेला चेहरा, जागोजागी फाटलेले कपडे,जळालेली अंग... आणि नजरेतला जाळ, त्याचा विस्तव थडणीं वर पडत होता.

थडाणी लट लटा कापू लागला. तो तिच्या लांब लांब जात होता. पण त्याला आता स्वतःपेक्षा मुलीची जास्त काळजी वाटू लागली. पण धाडस होईना तिच्या जवळ जाण्याचं कारण तिच्या जागी मास्तर भीषण अवस्थेत उभे होते.

" श्रेयाऽऽ श्रेयाऽऽ बाळाऽऽ !! स्वातीऽऽ स्वाती ऽऽ कुठ आहात तुम्ही दोघी. "

" ऐ स्वाती ऽऽ प्लीज लवकर ये. हे बघ श्रेया ला काय होतंय."

आतून स्वाती किर किर करत बाहेर आली. "रात्रभर वैताग दिलाय ह्या माणसाने... आज तर हद्द केली. ड्रिंक सुद्धा घेऊन आला. " श्रेयाही त्यांच्या आवाजाने जागी झाली आणि बेडरूम मधून बाहेर आली.

आता मात्र तो चपापला. श्रेया आणि स्वाती त्याला बाहेर येताना दिसल्या.." श्रेऽऽ यूऽऽ.. बाळ... तू आत होतीस... म... म...मग .. ही कोण ... हा कोण .." थडानीची भीतीने अंग घामाने ओलचिंब झालं होत.

" अंशू तू असा विचित्रपणें का ओरडतोय आणि तुझ्या घरी का नाही गेला.??  तुला काय तमाशा घालायचा तो तिकडे जाऊन कर!!  इथे आम्हाला का त्रास देतोय.!! " स्वाती जरा चिडूनच म्हणाली.

" स्वाती तो... ती... तो ..हा बघ... हा कोण आहे. मला मारून टाकेल तो!!  प्लीज मला वाचव. " थडानी भीतीने तं तं फ फ करू लागला. 

" कोण... कुठ कोण आहे इथे ... चल श्रेयू... वेडावला हा माणूस!! दुसऱ्यांना त्रास देण्यातच ह्याला आनंद मिळतो." स्वाती बडबड करून श्रेयाला आत घेऊन जाऊ लागली.

" नाही आई... थांब... तिथे बाबासमोर कुणीतरी आहे." श्रेया हळू हळू पुढे येऊन बघू लागली.

आणि मास्तरांनी लगेच भीषण चेहरा बदलून सौम्य रूप घेतले.

" काका ऽऽ तुम्ही... पुन्हा ... इथे!!"

" हो." ते फक्त हसले.

" आणि बाबा का घाबरताय तुम्हाला..."

" तुझे बाबा सांगतील ते... होना थडानी!!" म्हणत एक जळजळीत कटाक्ष थडानी वर टाकला.

" बाबा काय आहे हे!! कोण आहे हे काका आणि आपल्या घरी का आलेय."

" आपला जो ऑर्किड मॉल आहे तिथे हे सर अनाथ मुलांसाठी शाळा चालवायचे. आश्रमशाळा!! मी त्या मोक्याच्या जागी मॉल बांधायचा होता  पण हे सर जागा द्यायला तयार नव्हते. म्हणून मी त्या सगळ्यांना संपवलं. आय एम सो सॉरी बेटा ऽऽ" थडानी हतबल झाला.

" आधी पण एकदा माझ्या स्वप्नात आले होते आणि कुणी मुलाला कोंडून ठेवलं आहे म्हणून मॉल मध्ये एक खोलीचा दरवाजा उघडायला सांगितलं. "

" पण तिथे अशी काही खोली नाहीये."

आता मात्र थडानी अजुनच चक्रावले आणि डोक्याला हात लावून मटकन सोफ्यावर बसले.

" ती खोली फक्त पापभिरू लोकांनाच दिसते. मॉल मध्ये अशी काही खोली नाही पण जे नेहमी दुसऱ्यांचा चांगला विचार करतात त्यांनाच दिसते. " मास्तर म्हणाले.

" हे बघा सर तु म्हाला काय करायचंय ते माझ करा. मी तयार आहे कुठलीही किंमत मोजायला पण प्लीज माझ्या मुलीला... " थडानी घाबरून हात जोडून उभा होता.

" तुझ्या मुलीला...? आणि माझी ही मुलं होती की,  तेव्हा तुला दया आली."

स्वाती ला तर काहीच कळत नव्हतं काय सुरू आहे पण तिला श्रेयाची काळजी वाटत होती.

" पण ती सगळी अनाथ मुलं होती." थडानी म्हणाला.

" अनाथ नाही. ती माझी मुलं होती."मास्तर चिडून म्हणाले.

" सॉरीऽऽ सॉरी. एक्स्ट्रिमेली सॉरी सरऽऽ" थडानी हात जोडत गयावया करू लागले.

" सॉरी बोलून माझी मुल जिवंत होतील का?  तुझी लायकी नाही इतक्या चांगल्या कुटुंबात रहायची. इतकी गोड मुलगी, संस्कारी बायको आणि हे सगळं घाणेरडी उद्योग करून पैसा मिळवतो तू, लाज नाही वाटत!! "

" खरंच सॉरी सर... तुम्ही जे सांगाल ते मी करेन." थडानी मात्र अगदी गळून गेला होता.

" करशील...?"

" हो... हो ... हो... करेन." थडानी म्हणाला.

" हा सुरा घे आणि तुझ्या मुलीला मारून टाक."

श्रेया डोळे विस्फारून त्याकडे पाहू लागली.

" न.. न .. नाही... मी नाही. " आणि त्याने तोच सुरा स्वतःच्या पोटात खुपसला. एकदा... दोनदा... तीनदा... आणि बाळाऽऽ म्हणत प्राण सोडला.

आणि मास्तरांनी मुलीला हात जोडून क्षमा मागितली. झालेली सगळी घटना सांगितली. स्वातीला ही मोठा धक्काच बसला.

आणि तिने ही त्यांना वचन दिले की त्यांनी सुरू केलेल्या त्यांचे पुण्य कर्म ती अविरत सुरू ठेवणार आहे.