Login

दागिना

लेकरांना कमी करून नातेवाईकांची सरबराई करणं यापूढे जमणार नाही, त्यांना राग आला तरी चालेल
खोलीत दार लावून तिने मनसोक्त रडून घेतलं. कारणही तसंच होतं. तिच्या नऊ वर्षाच्या मुलाने तिला जे सांगितलं ते ऐकून तिला स्वतःवरच राग येऊ लागला. तिचा मुलगा, राघव, सगळ्या गोष्टीत हुशार आणि वयाच्या मनाने लवकरच समज आलेली त्याला. तो अतिशय छान क्रिकेट खेळायचा, त्याला शाळेकडून अनेक बक्षिसेही मिळाली होती. गेल्या काही महिन्यांपासून अंजलीची धावपळ सुरू होती, पाहुणे, येणं जाणं हे सगळं करत असताना राघवकडे तिचं जरा दुर्लक्ष झालं होतं.

अंजलीला तिची एक मैत्रीण भेटली असता ती म्हणाली,

"तुझा राघव इतका छान खेळतो, त्या क्लब का नाही जॉईन करत?"

"तो बोलला होता मागे, पण तिथे फारच पैसे लागणार होते गं.."

"आपण मुलांसाठीच कमावतो ना? तू त्याला पाठवायला हवं होतंस.."

अंजलीला मागील काही दिवस आठवले, राघवने तिला एक दोनदा याबद्दल विचारले होते पण त्याचवेळी घरी तिच्या दोन्ही नणंदा आलेल्या. त्या आल्या म्हणजे त्यांचं करण्यात पूर्णवेळ जाई. त्यात सासूबाई चोवीस तास राबवून घेत. अंजलीलाही पाहुण्यांचं सगळं करायला आवडायचं, पण यावेळी दोघीजणी एकदम घरी आल्यामुळे दोन्ही नवरा बायकोवर चांगलाच आर्थिक ताण पडला. त्या दोघींचा चांगल्या साड्या, घरात लागणाऱ्या वस्तू आणि एखादा दागिना करायचा असा नियमच होता.

इतरवेळी सर्व व्हायचं पण आता राघवच्या शिक्षणाला, क्लासेसला पैसे लागत असायचे. खर्च वाढला होता. राघवने क्रिकेट क्लब बद्दल सांगितलं तेव्हा अंजली दोन्ही नणंदांसाठी वाळवण करण्यात व्यस्त होती..आधीच वैतागलेली अंजली राघवच्या मागणीला तात्काळ तिने नकार दिला,

"हे बघ, क्लबची फी जास्त असते..सध्या अडचण आहे.."

राघवनेही एका शब्दात मान्य केलं आणि पुन्हा विषय काढला नाही. दोन्ही नणंदांची सरबराई सुरू होती. त्यांना सगळं घेऊन झालेलं, दुसऱ्या दिवशी एकीला साखळ्या आणि एकीला अंगठी करायला जायचं होतं. अंजलीच्या नवऱ्याने पैसे काढून आणून ठेवले होते.

अंजली घर आवरत असताना तिचं कचरापेटीकडे लक्ष गेलं, राघवने त्याची बॅट, बॉल आणि इतर क्रिकेटचं सामान त्यात टाकलं होतं. अंजलीने राघवला विचारलं,

"काय रे? तुला खेळायचं नाहीये का?"

राघव नाराज होत म्हणाला,

"आई, माझं सतत याकडे लक्ष जातं आणि माझे मित्र क्लबला जाताना आठवतात. त्यांच्यापेक्षा मी चांगला खेळत असूनही मला जायला मिळत नाही. असं सतत मन मारून मला त्रास व्हायला लागला आता, त्यामुळे मी ठरवलं, आता बंदच करायचं खेळणं. खेळणं बंद झालं की आपोआप विचार डोक्यातून निघून जातील.."

अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं, मुलाने इतकही समजूतदार असू नये की तो हट्ट करणंच विसरावा. तिने खोलीत जाऊन रडून घेतलं. नवऱ्याला विश्वासात घेऊन त्याला सगळं सांगितलं, तोही भावुक झाला.

दुसऱ्या दिवशी अंजलीने नवऱ्याने घरी आणलेले पैसे राघवला दिले आणि म्हणाली,

"जा..क्लबचे पैसे भर आणि जात जा..अजून लागले तर सांग.."

ते बघून सासूबाईंना संशय आला, त्या म्हणाल्या,

"हे राघवच्या दोन्ही आत्यांसाठी आणलेले पैसे आहेत ना?"

"हो आई, पण यावेळी ते शक्य नाही असं दिसतंय. राघव मन मारून क्रिकेट सोडायच्या तयारीत होता, का? तर पैसे नाहीत म्हणून. म्हणजे घरात आपल्याच लेकरांना सुखापासून वंचित ठेवायचं आणि ज्यांच्या घरी सुबत्ता आहे त्यांच्या झोळ्या भरायच्या..हे यापुढे मला नाही जमणार.."

हे ऐकताच सासूबाई चिडल्या, त्यांनी अंजलीशी चांगलंच भांडण केलं. पण राघवचे वडील मात्र बायकोच्या पाठीशी उभे राहिले..

"आई, अंजलीने योग्य तो निर्णय घेतलाय..ताईंसाठी जेवढं शक्य आहे तेवढं करेन मी, पण स्वतःच्या घरात लेकराचं सुख हिरावून नाही.."

दोन्ही बहिणींनी हे ऐकलं आणि त्यांनीही अंजलीची बाजू घेतली,

"वहिनी...अगदी योग्य निर्णय घेतलास, तू आधी सांगायचंस ना? आम्हाला काही वाटणार नाही..आणि आई, वहिनीला काहीही बोलू नकोस..तिने जे केलं ते योग्य केलं.."

सर्वांनी समजुतीने घेतल्याने वाद चिघळला नाही. पुढे राघव मोठा क्रिकेटर बनला, चांगले पैसे मिळू लागले. त्या पैशातून सर्वात आधी त्याने दोन्ही आत्याना सोन्याचे हार आणि आईसाठी महागातला दागिना केला. त्या तिघींना आज भरून आलं होतं, यावेळी मिळालेल्या दागिन्यात विशेष झळाळी होती

समाप्त
********************************** बोले तैसा चाले

(ट्रेंडिंग कथा- बोले तैसा चाले)

"काय एकेक बायका असतात, मी तर माझ्या सुनेला अगदी लेकीसारखं ठेवते..अगदी कुठेच कमी पडू देत नाही"

Tv वर सुरू असलेल्या छळाच्या बातम्या बघून आशाताई स्वतःचीच पाठ थोपटून घेत होत्या...घरी सूनबाईचे वडील आले होते आणि सोफ्यावर बसून चहा घेत होते. सूनबाईच्या वडिलांसमोर स्वतःची प्रौढी मिरवत होत्या की बघा जगात काय सुरू आहे, आणि आम्ही तुमच्या मुलीला काहीही होऊ दिलं नाही म्हणून, थोडक्यात तुमची मुलगी जिवंत आहे हे फार मोठे उपकार केल्याची भावना त्यांच्यात होती, स्वातीच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. ती गपगुमान सगळं ऐकत होती.

दुपारची वेळ झाली, स्वातीने सासूबाईंना ताट वाढून दिलं, वडिलांनाही जेवायला बसवलं आणि स्वतः ताट घेऊन बसली. सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. इकडे वडील मुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होते, त्यांना स्पष्ट दिसत होतं की आपली मुलगी इथे खुश नाही म्हणून.

सासूबाईंचं जेवण झालं तसं त्या उठल्या आणि हात धुवून परत सोफ्यावर येऊन बसल्या. स्वातीचं जेवण अजूनही सुरू होतं. तेवढ्यात दारासमोर घंटागाडी येऊन थांबली, सासूबाई मोठ्याने म्हणाल्या,

"स्वाती, कचरागाडी आलीये..टाक पटकन.." पूर्ण वाचा या लिंकवर https://irablogging.com/blog/bole-taisa-chale_44480

0