ओवी चं सायन्स ला ऍडमिशन घ्यायचं ठरत. म्हणजे तसं तीला सर्व तिच्या शाळेचे शिक्षक सुचवतात. बाबा पण होकार देतात.. आणि मग ओवी कॉलेज ला ऍडमिशन घेते.. पाठीमागच्या बहिणी पण हळू हळू मोठ्या होतं असतात..
बाबा शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक असतात. त्यांना मुलींनी वावगं वागलेलं अजिबात सहन होतं नसे.. ओवी आता पंधरावी ला असते. मुलींनी कॉलेज मधल्या मुलांशी बोललेलं पण बाबांना आवडत नसे.
असंच सर्व सुरळीत चालू असताना एक दिवस ओवी च्या बाबांना ह्या नात्याची कुणकुण लागते.. बाबा खूप चिडतात. आधी मनीषा ला ओवी च्या आई ला खूप ओरडतात. तुझं मुलींवर लक्ष नाही..असं बोलतात.. ओवी कॉलेज मधून आल्यावर बाबा तीला खूप ओरडतात.
ओवी सांगते बाबा प्रतीक माझा फक्त मित्र आहे, बाकी आमच्यात काहीच नाही... पण बाबा ऐकत नाहीत आणि बोलतात पंधरावी ची परीक्षा व्हायला अजून एकचं महिना उरला आहे तो पर्यंत रोज मी तुला कॉलेज ला सोडायला - आणायला येणार.. आणि तुझ्या त्या शिकवण्या आजपासून बंद म्हणजे बंद...ओवी खूप रडते बाबा असं करू नका.. असं सांगते पण बाबा कोणाचंच ऐकत नाहीत..
आजी बोलते बसं झालं शिक्षण हीच लग्न करून टाकू आता..बाबा पण लगेचच आजीच्या वाक्याला दुजोरा देतात आणि बोलतात मी पण उद्यापासून हिच्या साठी स्थळ बघायची सुरवात करतो... ओवी आणि मनीषा खूप रडतात. पण बाबा आधीच स्वभावाने खूप जिद्दी असतात ते कोणाचंच ऐकत नाहीत...
आता ओवी वर सगळीकडून खूप बंधन येतात. तीला कुठेच एकटीला पाठवलं जात नाही, इकडे प्रतीक तिची रोज वाट बघून तिच्या एका मैत्रीणी ला विचारतो काय झालं ते आणि ती प्रतीक ला सांगते असं असं झालं आहे... प्रतीक पण खूप हताश होतो.. त्याला ओवी ला अज्जीबात भेटता येत नसतं.
बाबांना हे ओवी चं वागणं सहन होतं नाही ते खूप रागात असतात.. आणि पुढच्या दोनच महिन्यात ओवी चं लग्न ठरवून टाकतात.. मुलगा कसा आहे काय करतो हे मनीषा ने विचारल्यावर बाबा सरळ बोलले चांगला श्रीमंत आहे.. त्या प्रतीक सारखा नक्कीच नाही आहे.. त्यांच्या कडक स्वभावामुळे मनीषा पण त्यांच्यापुढे काही बोलू शकली नाही..
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ओवी चं लग्न झालेला मुलगा आणि त्याच्या घरची परिस्थिती )....
( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा