Login

दोष कुणाचा - भाग 3

Ovi


दोष कुणाचा - भाग 3

ओवी च लग्न आठ दिवसांवर आलं होत, ओवी प्रतीक ला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होती पण बाबांच्या धाका पुढे तीच काहीच चाललं नाही.. बाबा आणि आजी तिच्यावर करडी नजर ठेवून होते....
दोन दिवस आधी दिवशी साखरपुडा आणि मग तिसऱ्या दिवशी लग्न असा कार्यक्रम ठरला.. मुलगा दिसायला बरा होता. पण ओवी ला तो खूप अबोल वाटला किंवा त्याला पण जबरदस्ती ने लग्नाला उभं केल आहे असे त्याच्या चेहऱ्यावर भाव होते.. त्याच्या घरची जास्त माणसं ही नव्हती लग्नाला.. ओवी च्या घरी तीच - घरातलं पाहिलं च लग्न असल्यामुळे पै - पाहुणे बरेच आले होते..
सगळ्या मावश्या, काका - काकी साखरपुडया पासून च राहायला आल्या होत्या.. लग्न घर सजल होत...मांडव लागला होता.. लग्न ओवी च्या घरी अंगणात होत... त्यामुळे घर छान फुलांनी, सजवलं होत... ओवी ची आई पण खुश होती...
होणारा नवरा मुलगा एकुलता एक होता.. त्याचे आई वडील दोघ ही शिक्षक होते... घरची परिस्थिती चांगली होती.... स्वतः च मोठं घर होत... एकंदरीत सर्व चांगल दिसत होत...ओवी ला पण मनातून वाटून गेलं कि घरचे सर्व शिकलेले आहेत त्यामुळे मला पण पुढे शिकायला देतील.. ह्या विचाराने थोडा वेळ का होईना पण तिला बरं वाटल..
साखरपुडा झाला.. ओवी च्या हातात हिरवा चुडा भरण्यात आला.. नवरा मुलगा पण छान दिसत होता.. दोन दिवसांनी लग्न होत.. ओवी ला प्रतीक ची आठवण येत होती.. पण ती मनातल्या मनात म्हणाली कदाचित देवाला हेच मान्य असेल.....
पण का कळेना ओवी ला सारखं वाटत होत कि नवरा मुलगा गप्प गप्प आहे.. तो जास्त बोलत नाही आहे.. हसत नाही आहे.. एका जागी शांत बसून आहे... पण तिने च मग म्हंटल राहुदेत असतो एकेकाचा स्वभाव अबोल....
ओवी ची होणारी सासू फार छान होती बोलायला ती सारखी ओवी च्या आई ला म्हणत होती कि ओवी आता आमची मुलगी आहे तिची तुम्ही अजिबात काळजी करू नका... लग्न छान पार पडलं.. ओवी सासरी आली.. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा होती... ओवी चा नवरा संजय तिच्याशी जास्त बोलत नव्हता..
ओवी घर बघुन च खुश झाली. घर खूप छान होत.. इंटिरियर पण छान केल होत. घरात संजय च्या दोन चुलत बहिणी राहिल्या होत्या त्या लग्नाची पूजा हळद उतरणी झाल्यावर त्यांच्या घरी जाणार होत्या.. लग्न झालं त्या दिवशी घरात सर्व च होती त्यामुळे ओवी आणि संजय ला एकमेकांशी बोलताच आलं नाही.. दुसऱ्या दिवशी पूजा झाली आणि मग त्या रात्री ओवी आणि संजय ला एका बेडरूम पाठवण्यात आले.. ओवी मनातून म्हणाली आज विचारते ह्यांना कि तुम्ही गप्प गप्प का आहात...
पण संजय बेडरूम मध्ये आल्यावर पाच च मिनिटात ओवी ला बोलला मी खूप दमलो आहे आपण झोपुयात.. ओवी त्याच वाक्य ऐकून अवाक च झाली पण ती काहीच बोलायच्या आत संजय बेडवर आडवा पण झाला.. आणि डोळे मिटून पडून राहिला...
( काय चाललं होत संजय च्या मनात तो का असा वागत होता हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत.....)
0

🎭 Series Post

View all