Login

दोष कुणाचा - भाग 4

ovi


दोष कुणाचा - भाग 4

ओवी ने दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर किचन चा ताबा घेतला. सासू ला म्हणाली आई तुम्ही बाहेर बसा टी व्ही वर बातम्या बघत...आज मी सर्वांसाठी उपमा आणि चहा बनवते...सासू पण लगेच खुश होऊन म्हणाली अरे वा..छान..तू करशील ना एकटीने...जमेल ना तुला..ओवी पण म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका...मला जमेल...
सासू ने येऊन सर्व जिन्नस असलेले डब्बे ओवी ला दाखवले आणि म्हणाली कर आरामात नाश्ता.....तेवढ्यात संजय पण बेडरूम मधून बाहेर आला आणि म्हणाला..अरे वा ओवी लगेचच किचन मध्ये रूळलीस पण तू...ओवी ला पण त्याच बोलणं ऐकून हसू आलं...आणि संजय कडे बघून ओवी लाजली...संजय दिवसभर ओवी बरोबर खूप छान वागत होता...तिच्या मागे पुढे करत होता. ओवी ला हळू हळू हे सर्व आवडत होत...
सासू म्हणाली संध्याकाळी दोघांनी आपल्या जवळच्या देवळात जाऊन या...ओवी पण संध्याकाळी छान साडी निसून तयार होऊन बाहेर आली...सासू तिला बघून सासर्यांना म्हणाली पण अगदी नक्षत्रा सारखी दिसतेय बघा आपली सून...सासरे पण हसले...ओवी मनातल्या मनात म्हणाली पण आई - बाबा खूप चांगली माणसं आहेत ना....संजय पण तयार होऊन आला आणि मग दोघे बाईक ने देवळात गेले...
ओवी आणि संजय येईपर्यंत सासू जेवण करून ठेवले होते..सगळे हसत, बोलत जेवले आणि मग भांडी घासणे..वैगेरे आटपून ओवी बेडरूम मध्ये गेली....संजय कुठलं तरी पुस्तकं वाचत बसला होता...ओवी आत गेल्यावर पण त्याने तिच्याकडे बघितल्यासारखं केलं आणि तो पुन्हा वाचत बसला...
ओवी ला हे त्याच वागणं वेगळं च वाटत होत...तो तिच्यापासून अंतर राखून बसत होता...त्याला ओवी बरोबर नजर मिळवाविशी वाटत नव्हती...पण कां...असं ओवी ला सारखं वाटत होत...
ओवी त्याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होती. पण तो दुर्लक्ष करत होता.... तो ओवी च्या जवळ जावू पाहत नव्हता हे एव्हाना ओवी च्या लक्षात अआले होते... ओवी त्याच्या जवळ येतेय बघून तो कुशीवर वळून झोपायचं नाटक करू लागला. आता ओवी चा संयम सुटत चालला होता..तिच्या संयमाची जागा आता रागाने घेतली होती... आणि अजून वाट बघण्यात की उपयोग असा विचार करून ती जोरात ओरडून बोलली तुमचा काय प्रोब्लेम आहे...लग्नाची बायको आहे न मी तुमची मग का दूर – दूर राहताय....
संजय तिच्या अश्या वागण्याने ’गडबडून गेला ... आणि उठून उभा राहिला....आणि त्याने सरळ मुद्द्याला च हात घातला आणि बोलला..... मला माफ कर ओवी ..मी हे तुला आधीचं सांगणार होतो पण आई ने सांगू दिल नाही.....आई च्या मनाला ते पटत नव्हत... काय.. ओवी पुन्हा ओरडून बोलली...
संजय बोलला ओवी मी समलिंगी आहे .. मी हे तुला सांगायचा खूप प्रयत्न केला पण आई ने जीव देण्याची धमकी दिली त्यामुळे माझी हिम्मत झाली नाही....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ह्या सगळ्यावर ओवी ची प्रतिक्रिया काय असेल ते....)
लेखिका – सोनल गुरुनाथ शिंदे .
देवरुख – रत्नागिरी....
0

🎭 Series Post

View all