Login

दोष कुणाचा - भाग 6 ( अंतिम भाग )

ovi
दोष कुणाचा - भाग 6

ओवी रात्रभर काय करू ह्याचा विचार करत राहिली..सकाळी मग उशिरा चं उठली, सासू ने ती उठायच्या आधी नाश्ता आणि चहा करून ठेवला होता...ओवी ला आठ वाजता जाग आली..ओवी लगबगीने किचन मध्ये गेली..आणि ओशाळून म्हणाली आई सॉरी हा मला उठायला उशीर झाला. सासू हसून म्हणाली अग बेटा त्यात काय एवढं...तू लेक आहेस आता आमची.. हे सासर आहे इथे उठायला उशीर झाला तर आई काय बोलतील...असं काहीच कधी मनात आणू नकोस...
तेवढ्यात संजय फ्रेश होऊन आला, गुड मॉर्निंग ओवी म्हणाला...ओवी हसली..ओवी मनातल्या मनात म्हणाली हा एकदम रात्री चा माझा त्रागा, राग विसरून चांगला वागतोय..जसं काही घडलंच नाही असा...
ओवी शांत होती बघून सासरे म्हणाले...ओवी बाळा बरी आहेस ना....गप्प कां आहेस...ओवी च्या डोळ्यात पाणी चं आलं पटकन..कारण तिचे बाबा कायम मुलींशी कडक चं वागायचे....प्रेमाने सहसा कधी विचारपूस करायचे नाहीत...
ओवी तो दिवस गप्प चं होती. संजय ने लग्नासाठी सात दिवस सुट्टी टाकली होती...घरी चं असल्यामुळे संजय च्या ते लक्षात येत होत...म्हणून मग संजय चं ओवी ला म्हणाला आज संध्याकाळी आपण चौपाटी वर जाऊ....त्यावर सासू पण म्हणाली अरे वा...मस्त फिरा, हॉटेल मध्ये जेवून आरामात घरी या..
संध्याकाळी चौपाटी वर पोचल्यावर संजय ओवी ला म्हणाला...तू काय निर्णय घेतला आहेस. तू घेतलेला कुठलाही निर्णय मला मान्य असेल..तुझा निर्णय तू आता सांगू शकतेस...कारण इथे तू मला ओरडलीस तरी चालेल..घरी बेडरूम मधले वाद उगाच आई - बाबांन पर्यंत जाऊ नयेत असं मला वाटत..
निर्णय ऐकण्याआधी एक सांगतो.. मी तुला कधीच कसलीही कमी पडू देणार नाही..आपण ही एक गोष्ट सोडल्यास चांगले मित्र - मैत्रीण बनून कायम राहू...तुझे सगळे लाड मी हौशीने पुरवेन...आता त्या देवाने चं मला हि कमी दिली आहे त्याला मी काय करणार...राहता राहिला मुलाचा प्रश्न आपण भविष्यात एखादं मुलं दत्तक घेऊ ना...
ओवी म्हणाली पण लोक मला विचारणार ना कि आई कां होत नाही आहे असं..दुनिया मलाच बोल लावेल ना...संजय म्हणाला असं कोण बोललं कि सरळ तू सांगू शकतेस..कि संजय मध्ये जरा प्रॉब्लेम आहे असं...मला खरंच त्याच काहीच वाटणार नाही...ओवी संजय चं उत्तर ऐकून अवाक चं झाली...
आणि माझे आई - वडील तर तुझे खूप लाड करतात..त्यांना मुली खूप आवडतात...त्यामुळे त्यांच्या पासून तुला भविष्यात हि काहीच त्रास होणार नाही हा माझा शब्द आहे तुला. आणि एक सांगू मला पण तुझी कंपनी आवडली आहे. तुझं आई - बाबांन बरोबर प्रेमाने वागणं -बोलणं मला खूप आवडलं आहे...
ओवी विचारात पडली.....आणि थोड्या वेळाने बोलली बरं ठीक आहे राहते मी तुमच्याबरोबर...संजय ला पण मनातून बरं वाटल...ओवी - संजय रात्री हॉटेल मधून जेवून घरी आले...
दुसऱ्या दिवसापासून ओवी बदलली...ती पण अगदी संजय बरोबर हसत - खेळत राहू लागली..त्या नंतर मग ओवी आणि संजय अगदी मित्र - मैत्रिणी सारखे राहू लागले..फिरायला जाऊ लागले, एकत्र खरेदीला जाऊ लागले. संजय ने ओवी ला पुढे शिकवले...ओवी शिक्षिका झाली...
आणि मग लग्नानंतर   त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं..तिचा छान सांभाळ केला...ती ला छान संस्कार दिले......आता मुलगी छान शिकून इंजिनियर झाली आहे......
( हि माझ्या एका मैत्रिणी ची सत्य कथा होती, तिच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली..त्या निम्मिताने मी हि कथा माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला...)
( कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा...)
( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
0

🎭 Series Post

View all