Login

'स्व'तःचा शोध (भाग 34)

As A Female


साक्षी हळू- हळू आजारातून बरी होऊ लागली होती.

जगण्यासाठी तिने सकारात्मक विचार करून नकारात्मक विचारांवर मात केली होती. त्यामुळे तिने कोरोना ला ही हरवले होते.

परत तिची टेस्ट करण्यात आली. तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला घरी सोडण्यात आले.

घरी पण वेगळ्या रूममध्ये आराम करायला सांगितले.

तिने वरिष्ठांकडून घरी जाताना एक महिन्याची सुट्टी मंजूर करुन घेतली होती.

साक्षी आता आपल्या घरी आली होती.

साक्षीला आता नव्याने आयुष्य मिळाले होते.

घरातील घाबरून गेल्याने प्रत्येक जन तिच्या सोबत अंतराने च वागत असे.

सुयोग ही तिच्या जवळ जाण्यास भीत होता.

तिला आठवले , ' एकदा ती कामाने खूप थकलेली होती व सुयोग तिला झोपू देत नव्हता. तिने खूप आढेवेढे घेतले पण सुयोग काही केल्या ऐकेना. त्यानंतर सगळे तिच्या मनाविरुद्ध च झाले होते ' .

' पुरुषातला पुरुष जेव्हा जागा होतो तेव्हा तो कोणाचेही ऐकत नाही. समोरच्या चे मन असो किंवा नसो फक्त त्याला आपला च स्वार्थ दिसतो ' , तेव्हा तिला खूप असंह्य वाटलं होतं.

तेव्हा तिच्या मनात विचारही आले होते , ' पुरुषाला कोणाचीही भीती नाही. कायदा-सुव्यवस्था आहेत त्या लग्न न झालेल्या पुरुषांबाबत पण लग्न झालेले पुरुष कोणाला घाबरणार. त्याचे उत्तर आज कोरोना ने दिले होते. म्हणजे पुरुष पण घाबरतात'.

तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होते.

' बरं आहे बाबा ! कोरोना मग अधून- मधून तू भीती दाखवायला येत जा म्हणजे आम्हा बायकांना त्यापासून सुटका तरी मिळेल ' , साक्षीचे आपलं वेडं मन बोलत होतं.

साक्षीला 14 दिवसांसाठी क्याॅरंनटाईन ठेवलं होतं.

चौदा दिवसांचा कालावधी कसा गेला, हे तिला कळाले ही नाही.

ह्या कालावधीमध्ये मात्र तिने  ' ईरा ब्लॉग ' वरती भरपूर कथांचा आस्वाद घेतला.

ह्या  ब्लॉग बद्दल तिच्या एका मैत्रिणीकडून तिला कळाले होते. जेव्हा तिच्या क्याॅरंनटाईन कालावधीत तिच्या जवळ कोणीच नव्हते. तेव्हा या ब्लॉग ने तिला सोबती केले.

' नवीन -नवीन विचारांवर कथा आधारलेल्या होत्या. तिला जगण्यासाठी बळ देत होत्या. तिला जगण्यासाठी आता खरी प्रेरणा तिला कथामधूनच मिळत होती.

तिचे बरेच आवडते लेखक-लेखिका झालेले होते. तिला मनापासून त्यांच्या विचारांचे कौतुक होते व ती आपली स्वतःची प्रतिक्रिया नोंदवून त्यांना प्रतिसाद देत होती.

तिने मनोमन ईरा ब्लॉगचे CEO यांचेही आभार मानले कारण आम्हां वाचकांसाठी ते वरदानच ठरले होते ' , असे साक्षीला वाटले.

एखादी कथा मनाला भावून गेली तर ती व्हाट्सअप च्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड ही करत असे. असा तिचा छान वेळ चालला होता. घरचे ही तिची काळजी घेत होते.

बरेच दिवस अंथरुणात पडून राहिल्याने तिचे आता अंग मात्र दुखू लागले होते. घरात टीव्ही हा बंद ठेवण्यात आला होता. बातम्या मध्ये पण कोरोनाशिवाय दुसरे काही दिसतच नव्हते.

लाॅकडाऊन लागले असल्याने बाहेर जाण्याची बंदी घालण्यात आली होती. फक्त इमर्जन्सी काम असलेले बाहेर पडू शकत होते.ते पण जागोजागी पोलीस उभे असल्याने ते चेकिंग करूनच जाऊ देत असत.

 साक्षीने हळू-हळू उठत -बसत कामाला सुरुवात केली होती.

सुयोग ला पालेभाज्या किंवा दूध आणण्यासाठी बाहेर जावे लागत होते. तसंही होम डिलिव्हरी भेटत होती पण सुयोगने ती न घेता स्वतः जायचे ठरवले कारण त्यालाही घरात बसून -बसून कंटाळा आला होता.

सगळेजण आतून थोडेसे घाबरलेले असल्याने प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेताना दिसत होता.

घरातील वातावरण पहिल्यापेक्षा जरा बदलले साक्षीला जाणवले. हे जर कोरोना च्या अगोदर साक्षीला जाणवले असते तर त्यांच्याबद्दल तिला प्रेमच वाटले असते. असो.

 साक्षी बऱ्यापैकी रिकव्हर झाली होती व घरामध्ये सगळी कामे तिच्या अंगावर पडायला सुरुवात झाली. तसे सासूने कामातून अंग काढून घेतले.

साक्षीला ही माहीत होते. हे तर होणारच आहे.

साक्षीने विचार केला , 'आता सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे व आयुष्यात पुढे जाण्याचे ठरवले होते. पण कोण -कोणत्या गोष्टीं कडे तिने दुर्लक्ष करायला हवे. जोपर्यंत अशा विचाराचे लोक आजूबाजूला असतात. त्यांचा सहवासात तर येणारच असतो मग त्यांच्या सवयीकडे दुर्लक्ष करून आपण कसे राहू शकतो ' .

साक्षीला जमेल का?

साक्षीची एक महिन्याची सुट्टी संपत आली होती.

लाॅकडॉऊन तर अजून उठलेले नव्हते. सगळीकडे नकारात्मक वातावरण दिसत होते. रस्त्यावर तर भयाण शांतता पसरली होती फक्त अधून -मधून ॲम्बुलन्स चा आवाज मात्र कानी पडत होता.

साक्षीला तर ती सवयच जडली होती.

हॉस्पिटलमध्ये तर अशा शेकडो ॲम्बुलन्स रोज येत असत. हॉस्पिटल मध्ये असताना रोज दिसणारे मृत्य देह बघून आता तिला मरणाचीच भीती उरली नव्हती.

साक्षी आता अनुभवाने मोठ्यांपेक्षाही मोठी झाली होती.

साक्षीची सुट्टी संपायला अजून चार दिवस बाकी होते तेवढ्यात तिला हॉस्पिटलमधून इमर्जन्सी कॉल आला.

तिला कामावर हजर होण्यास सांगितले गेले.

साक्षीला माहित होते, ' ती आजारी असल्याने तिला सुट्टी देण्यात आली. पण जर ती आजारी नसती तर तिला कधीही सुट्टी मिळाली नसती ' .

तिने पटापट आवरून हॉस्पिटल गाठले.

हॉस्पिटलमध्ये पहिल्यासारखीच परिस्थिती होती.

फक्त आता लस उपलब्ध झाल्याने सगळ्या कोरोना योद्धांना प्राथमिक स्तरावर लसीकरण चालू केले होते. त्यामुळे डॉक्टर्स व नर्स यांना लसीकरण करण्यात आले.

सगळीकडे मृतदेहांचा खच बघून रोजचे घडे त्याला कोण रडे अशी अवस्था झाली होती.

हॉस्पिटल मध्ये बराच नवीन स्टाफ दिसत होता. काही स्टाफ कोरोना ला बळी पडलेला होता.

तिच्या एक- दोन मैत्रिणी तिच्या सोबत नव्हत्या. तिला खूप वाईट वाटले. तिला हे कधी -कधी सगळं सोडून पळून जावे असे वाटत होते.

पण आपण शिक्षणासाठी धडपडलेल्या सगळ्या गोष्टी आठवून ती पुन्हा मनाची तयारी करत होती.

' हे ही दिवस जातील असे ' , ती मनाला सारखं -सारखं बजावत होती.

एक दिवस साक्षी नाईट ड्युटी संपवून घरी गेली होती.

सुयोग ची तब्येत बिघडलेली होती. तो घरी झोपूनच होता.

तिला सर्व लक्षणे कोरोना ची च दिसल्याने तिने ताबडतोब आपल्या हॉस्पिटलला हलवले.

कोरोना ला आता जवळ -जवळ एक वर्ष झाले होते. लोकांमध्ये भीती थोडी कमी झाली होती.

सुयोग ची टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले.सेवेला साक्षी ही होतीच.त्यामुळे तो निर्धास्त होता.

हॉस्पिटलमध्ये साक्षीची होणारी धावा -धाव , काळजीपूर्वक पेशंटची विचारपूस करणारी त्याची साक्षी त्याला आज नव्याने च भासत होती.

सुयोगची ती व्यवस्थित काळजी घेत होती व सासूबाईंनाही धीर देत होती.

दोन दिवसांनी सासूबाई ही आजारी पडल्या. त्यांना ही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

' ये तो फेवीकल का जोड है,  ये कभी टुटेगा नही , असंच म्हणावं लागेल सुयोग आणि सासूबाई बाबत ' , साक्षी स्वगतच पुटपुटली.

हॉस्पिटलमध्ये ' सिनियर नर्स ' म्हणून साक्षीची ओळख निर्माण झाली होती.

पहिल्या लाटेमध्ये सगळे डॉक्टर व नर्सने खूप धैर्याने तोंड दिले होते. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये छोटासा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पहिल्या स्थानावर साक्षीचे नाव होते. तिला ' सन्मानचिन्ह ' देऊन गौरवण्यात आले. तिने दोन शब्दांमध्ये आभार ही व्यक्त केले. टाळ्यांचा खूप कडकडाट झाला.

हॉस्पिटलमध्ये तर ती सर्वांची आवडती नर्स म्हणूनच ओळखली जात होती.

सुयोग आणि सासू लांबूनच पाहत होते. त्यांना साक्षीचे एवढं गुणगान पाहून आतून भरून येत होते.

त्यांना साक्षी कधी उमगलीच नव्हती. त्यांना नव्याने साक्षीचा साक्षात्कार झाला.

पंधरा दिवसांनी दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला. साक्षी दोघांनाही घरी घेऊन गेली.

साक्षी खूप हिंमतीने घरच्या ही व हॉस्पिटलमधील गोष्टी हाताळत होती. घरी ही त्यांची ती काळजी घेत होती. जशी हॉस्पिटलमध्ये घेतली तशी.

त्या दोघांनाही आपल्या कडून साक्षीला दिलेल्या त्रासाबद्दल पश्चाताप होत होता. पण दोघांपैकी एकाने ही ते बोलून दाखवले नव्हते.

साक्षीला माहित होते , ' एक वेळेस सुयोग मनातील बोलून दाखवेल पण सासू कधीही नाही. आता झालेल्या प्रसंगावरून सासू मावळली असेल पण पुढे तिचे तसेच वागणे राहणार आहे , हे मात्र काळा दगडावरची पांढरी रेघ होती' .

साक्षी हे मनोमन जाणून होती. त्यामुळे साक्षीने असेच दाखवले की , ' मी कोणावर ही उपकार करत नाही. मी फक्त माझे कर्तव्य केले ' .


क्रमशः







                   

🎭 Series Post

View all