Login

पाऊस परतण्या आधी

पाऊस आणि प्रेम दोघांचा मेळ असलेली एक सुंदर कविता


पाऊस  परतण्या आधी
तु येन जरा माघारी
वाट पाहते तुझी राधा बावरी

किती गेल्या श्रावणसरी
तरी तु न आलास परतुनी
मी वेडी राधा वाट पहाते
तुझी त्या किनारी

आठवते मला सूर आपले जुळले होते
जेव्हा तु मला त्या किनारी पाहिले होते
आजही देतो साक्ष तो किनारा आपल्या प्रेमाची
मग का येत नाहीस तु आज परतुनी
वाट पहाते तुझी राधा बावरी राधा बावरी
0

🎭 Series Post

View all