Login

पाचवी माळ: देवी स्कंदमाता

Devi Skandmata And Mona Agrawal
पाचवी माळ: देवी स्कंदमाता

“या देवी सर्वभुतेषु मॉं स्कंदमाता रुपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”||

अश्विन शुध्द पक्षातला पाचवा दिवस हा देवी स्कंदमातेला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. चतुर्भुज असलेली ही स्कंदमाता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे. हया देवीच्या हातात कमळाचे फूल आहे. घरातली शांतता, सुख व समृद्धीचं स्रोत म्हणजे देवी स्कंदमातेची आराधना उपासना करणे.

पॅरिसमधल्या पॅरालिम्पिक्समध्ये कांस्यपदकावर लक्षवेधी निशाणा साधत देवी स्कंदमाताचे स्वरूप आजकालच्या जीवनात बघायला मिळते ते म्हणजे मोना अगरवाल मध्ये.

संघर्षमयी जीवनाला सुखी व समाधानी बनविण्यासाठी मोनाने अतोनात कष्ट, एकाग्रता व निष्ठेचे गणित अचूकपणे मांडले. देवी स्कंदमातेसारखे शांत, सुवासी, ध्येयवादी व यशरूपी कमळाचे फूल एका हातात व दुसर्या हातात शूटिंगसाठी रायफल घेऊन सज्ज होते.

बालपणी पोलओमुळे प्रभावित झालेली मोना, जरी चालण्यातील असमर्थतता व अपूर्ण शिक्षण राहिले तरी शूटिंगचे धडे गिरविण्यासाठी तिने कष्टाची पराकाष्ठा पणाला लावली.
अनुभवी व प्रशिक्षित असणार्या या रायफल शूटरला “आकाशी झेप घे रे पाखरा” म्हणत तिच्या पंखातल्या बळाला उभारी देऊ व कारकीर्दीस शुभेच्छा.

“लक्षवेधी ध्येयासाठी धडपड करीत,
पोलियोसारख्या दुर्धर आजारावर केली मात,
जिंकून आणला कांस्य पदक,
देशवासीय अभिनंदनाचा वर्षाव करतो||”
प्राजक्ता जोशी सुपेकर
०७|१०|२०२४

🎭 Series Post

View all