पदरी पडले अन् पवित्र झाले - १
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५
"जळलं मेल लक्षण! अहो काय गरज होती हे असं करायची? तरी मी सांगत होते तुम्हाला जमणार नाही. तरी पण इथे माझं ऐकतय कोण? आता बसा हात गळ्यात घेऊन."
पुष्पा बाई बोलत होत्या आणि त्यांचे यजमान हात गळ्यात बांधून त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होते.
पुष्पा बाई बोलत होत्या आणि त्यांचे यजमान हात गळ्यात बांधून त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होते.
"अगं पण मी तुला मदत व्हावी म्हणूनच करत होतो ना! माझी मदत केलेली अजिबात दिसत नाही तुला.. आणि वर मलाच ओरडत असते. किती दुखतोय माझा हात.. आई आई गं!"
असे म्हणून प्रकाशराव बायकोशी बोलत होते.
"हम्म्म, खूप मोठ्ठी मदत केलीत. आता गपचुप एका ठिकाणी बसून रहा. माझं मी बघते काय करायचं ते."
पुष्पा बाई पुन्हा त्यांना दटावत बोलल्या.
'आता काय शांतच बसावे लागणार आहे. इतकी वर्ष बसलो तसा आणखी काही वेळ.'
प्रकाशराव हळूच पुटपुटले तरीही पुष्पा बाईंना ऐकू गेलं.
"काय म्हणालात?"
डोळे वटारून पुष्पा बाईंनी त्यांच्याकडे पाहिले तसे ते काही नाही म्हणून इकडे तिकडे बघू लागले.
डोळे वटारून पुष्पा बाईंनी त्यांच्याकडे पाहिले तसे ते काही नाही म्हणून इकडे तिकडे बघू लागले.
"कुठे काय? काहीच नाही. मी आपला बसतो गपचूप. तुमचं चालू दे."
आता मात्र ते कैचीत सापडतात की काय असे वाटत होते.
आता मात्र ते कैचीत सापडतात की काय असे वाटत होते.
पुष्पाबाई आणि प्रकाशरावं.. वयाची साठी पार केलेलं जोडपं. मुलगा चांगला शिकला आणि अमेरिकेत स्थायिक झाला. मुलीचं लग्न होऊन ती सुद्धा सासरी गेली. आता घरात उरले ते फक्त दोघेच. अधेमधे चौकशीसाठी दोघांचाही फोन येऊन जातो. एकुलता एक मुलगा जेव्हा लग्न होऊन परदेशात स्थायिक झाला तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलेले, पण आता त्या दोघांनी एकमेकांसाठी जगायचं ठरवलं होतं. कोणी कोणासाठी थांबत नाही, मग तो स्वतः चा मुलगा का असेना! आला दिवस भरभरुन जगून घ्यावा, पुढच्या येणाऱ्या दिवशी काय होईल कोणी पाहिले; त्यामुळे आहोत तोपर्यंत आनंदाने दिवस घालवू. असे पुष्पा बाई नेहमीच म्हणायच्या.
दिवाळी तोंडावर येऊन ठेपली होती. साफसफाई करायची म्हणून पुष्पा बाईंनी सगळं आवरायला घेतलं होतं. आता वयोमानानुसार त्यांना अशी कामं होत नाहीत, पण तरी सुद्धा त्या काही ना काही करतच असतात. शांत म्हणून बसवत नाही. त्यात प्रकाशरावांना त्यांच्या मधे मधे करायला खूप आवडतं, मदत म्हणून नाही तर त्यांना आणखी चिडवण्यासाठी. उगाचच गप बसलेलं त्यांनाही आवडत नाही; म्हणूनच पुष्पा बाईंना ते नेहमी अशी वाढवा कामांची मदत करत असे.
पुष्पा बाईंनी स्वयंपाक घरातला पसारा आवरायचं ठरवलं होतं. एक एक करून फळीवरची सगळी भांडी घासून लख्ख केली. किचनच्याच बाल्कनीत ठेवलेला पाटा वरवंटा त्यांना किचन ओट्यावर ठेवायचा होता; म्हणून त्यांनी प्रकाशरावांना आवाज देऊन विचारले.
"अहो, जरा इकडे येताय का? मला तुमची मदत हवी होती?"
बाहेर हॉलमधे बसलेले प्रकाशराव त्यांचा आवाज ऐकताच उठून उभे राहिले.
बाहेर हॉलमधे बसलेले प्रकाशराव त्यांचा आवाज ऐकताच उठून उभे राहिले.
"हो आलो आलो. काय काम आहे माझ्यासाठी? जे तुम्हाला जमणार नाही."
प्रकाशराव थोडे खोचक बोलत किचनमध्ये आले, कारण पुष्पा बाईंना त्यांची मदत म्हणजे डबल कामं होतं होते.
प्रकाशराव थोडे खोचक बोलत किचनमध्ये आले, कारण पुष्पा बाईंना त्यांची मदत म्हणजे डबल कामं होतं होते.
"काही नाही हो, मला जरा तो पाटा वरवंटा आतमध्ये ठेवून घ्यायचा होता. गुडघे दुखतात म्हणून हल्ली खाली बसवत नाही; त्यामुळे पाटा वरवंटा तसाच धूळ खात बाहेर पडून आहे. तो इथे किचन ओट्यावर ठेवला तर निदान काहीतरी करता येईल मला."
पुष्पा बाईंनी मनातले बोलून दाखवले.
पुष्पा बाईंनी मनातले बोलून दाखवले.
"अगं आता कुठे पाट्यावर वाटतं बसणार आहेस का तू? नसते उद्योग सांगितले कोणी? मिक्सर आहे ना आपल्याकडे, मग त्यात कर काय करायचं ते. उगाच दमत बसू नकोस."
प्रकाशराव काळजीने बोलले.
प्रकाशराव काळजीने बोलले.
"अहो पाट्यावर वाटलेले वाटणं किती छान होते. उगाच असा पडून राहण्यापेक्षा त्याच्यावर काहीतरी चेचून काढेन मी. नाहीतर देऊन टाकू का त्या सरलाला? तसाही तिचा डोळा होता त्याच्यावर. किती दिवस झाले विचारत होती मला, मावशी तुम्ही पाटा वरवंटा वापरत नसाल तर मी घेऊन जाते म्हणून."
"अगं नको नको! आता लगेच ठेवून देतो बघ तुला किचन ओट्यावर, पण तिला देऊ नकोस. मला उलटून बोलते ती, आणि काही काम सांगितले की लगेच निघून जाते. आपला पाटा किती छान आणि जुना आहे. आपले नविन लग्न झाले तेव्हा घेतला होता. आठवते ना तुला?"
प्रकाशरावांनी आठवण करून देत म्हंटले.
प्रकाशरावांनी आठवण करून देत म्हंटले.
"हो ना, किती जुना आहे आपला पाटा वरवंटा.. म्हणूनच मी आत ठेवून घेत होते, पण तुम्हाला जमेल का?"
पुष्पा ताईंना थोडी शंका वाटली म्हणून त्या लगेच बोलून गेल्या. नाही म्हंटले तरी पाटा तसा जडच होता. वय झाले होते आता दोघांचे; त्यामुळे असली जड कामं ते दोघेही टाळत होते.
पुष्पा ताईंना थोडी शंका वाटली म्हणून त्या लगेच बोलून गेल्या. नाही म्हंटले तरी पाटा तसा जडच होता. वय झाले होते आता दोघांचे; त्यामुळे असली जड कामं ते दोघेही टाळत होते.
"अगं अजूनही ह्या हातांमध्ये तितकीच ताकद आहे. तू हलक्यात घेऊ नको मला! हे बघ लगेच उचलून ठेवतो तुझ्यासमोर."
असे म्हणून ते हातांची बाही वर करत पुढे झाले.
असे म्हणून ते हातांची बाही वर करत पुढे झाले.
"आई आई ग! हात मोडला माझा."
असे म्हणून त्यांनी पाटा किचन ओट्यावर न ठेवता खालीच आपटला.
"अहो काय करताय? तरी मी विचारत होते जमेल की नाही तुम्हाला.. तुम्ही आपले लगेच तयार झालात हिरोपणा दाखवायला. बघू काय झाले ते."
पुष्पा बाईंनी काळजीने विचारले.
पुष्पा बाईंनी काळजीने विचारले.
"पाटा उचलताना हात मुरगळला असं वाटतंय मला."
त्यांनी एका हाताने दुखऱ्या हाताला धरून ठेवत बोलले.
"एक काम धड करता येत नाही तुम्हाला!"
पुष्पा बाई त्यांच्यावर खेकसत बोलल्या.
पुष्पा बाई त्यांच्यावर खेकसत बोलल्या.
क्रमशः
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा