पदरी पडले अन् पवित्र झाले - २
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५
"हात खूप दुखतोय ग!"
असे म्हणून प्रकाशरावं विव्हळत होते.
"थांबा जरा, लेप लावून देते म्हणजे बरे वाटेल."
पुष्पा बाईंनी वाटीमध्ये कसलातरी लेप आणला गरम करून.
पुष्पा बाईंनी वाटीमध्ये कसलातरी लेप आणला गरम करून.
"आई आई ग! किती गरम आहे तो लेप. जरा फुकून फुकून तरी लाव."
प्रकाशराव हातावर फुंकर घालत बोलले.
प्रकाशराव हातावर फुंकर घालत बोलले.
"काय लहान मुलासारखे करताय, एकतर स्वतः हुन काम वाढवा करून ठेवलं आणि वरतून मला सांगताय फुंकून लाव म्हणे."
पुष्पा बाईंना वाईट तर वाटतं होते पण त्या दाखवत नव्हत्या.
पुष्पा बाईंना वाईट तर वाटतं होते पण त्या दाखवत नव्हत्या.
दोघेही घरात एकमेकांशी काही ना काही कामावरून भांडत असायची. तेवढाच वेळ जातो म्हणून. बाजूची कमला यायची बोलायला, कधीतरी गप्पा मारायला.. तितकाच त्यांचा विरंगुळा व्हायचा आणि छान वाटायचे दोघांनाही.
"अहो मावशी हल्ली सोसायटीमध्ये उंदीर खूप झालेत. तुम्ही किचनचे दार उघडे ठेवत नका जाऊ. नाहीतर घरामध्ये एकदा का उंदीर घुसले की पुन्हा जात नाहीत लवकर. नुसती नासधूस सुरू असते त्यांची. घरात धुमाकूळ घालून ठेवतात आणि आपल्याला त्यांच्या मागे मागे पळताही येत नाही."
कमला बोलत होती आणि ते दोघेही तिचे मन लावून ऐकत बसले होते.
कमला बोलत होती आणि ते दोघेही तिचे मन लावून ऐकत बसले होते.
"हो ना खरचं, आमच्याच्याने ते घरात घुसलेले उंदीर काही बाहेर पळवून लावता येणार नाही."
पुष्पा बाई पण काळजीने म्हणाल्या.
पुष्पा बाई पण काळजीने म्हणाल्या.
"हो, म्हणूनच म्हणतेय मी.. ती पट्टी येते दुकानात चिकटवाली ती घेऊन या आणि ठेवून द्या किचनच्या बाल्कनीमध्ये, म्हणजे उंदीर आले तरी त्याला चिकटून बसतील."
कमला त्यांना मस्त मस्त उपाय सांगत होती आणि पुष्पा बाई ऐकत होत्या.
कमला त्यांना मस्त मस्त उपाय सांगत होती आणि पुष्पा बाई ऐकत होत्या.
"अहो, ऐकलत का? आपण पण घेऊन येऊया ती चिकटवाली पट्टी आणि ठेवून देऊ बाल्कनीमध्ये म्हणजे उंदीर आले तरी चिकटून बसतील त्याला. ताणच नको डोक्याला."
त्या बोलत होत्या आणि तिकडे प्रकाशराव त्यांच्या हो ला हो करत होते.
त्या बोलत होत्या आणि तिकडे प्रकाशराव त्यांच्या हो ला हो करत होते.
"हो आताच आणून ठेवतो थोड्यावेळाने."
असे म्हणून ते जागेवरून उठून गेले.
असे म्हणून ते जागेवरून उठून गेले.
"अहो आता कुठे निघालात लगेच! आता चहा ठेवणार होते मी सगळ्यांसाठी."
पुष्पा बाई किचनमध्ये जात बोलल्या.
पुष्पा बाई किचनमध्ये जात बोलल्या.
"अग पडतो जरासा आतमध्ये जाऊन, बसून बसून पाठीचा कणा मोडला माझा."
पाठीला हात लावतच प्रकाशराव आतमध्ये निघून गेले.
"मी काय म्हणते मावशी, तुम्ही दोघे रोज चालायला जात जा. घरात बसून कंटाळा नाही येत का तुम्हाला?"
कमला बोलायला उशीर आणि आतमधून प्रकाशराव बोलले.
कमला बोलायला उशीर आणि आतमधून प्रकाशराव बोलले.
"अगं, हिला किती दिवस झाले मी सांगत असतो की जाऊया खाली. थोड बाहेर फिरून आलो की छान वाटेल. समोरच्या बागेत जाऊन बसले की छान छोटी छोटी मुलं खेळताना बागडताना दिसतात. त्यांना बघून प्रसन्न वाटते. आमचा नातू पण छान बोलायला लागला आहे आता."
असे म्हणून प्रकाशराव खिडकीतून बाहेर बघून बोलू लागले. खरंतर त्यांना त्यांच्या मुलाची आणि त्याहीपेक्षा नातवाची जास्त आठवण येत होती.
असे म्हणून प्रकाशराव खिडकीतून बाहेर बघून बोलू लागले. खरंतर त्यांना त्यांच्या मुलाची आणि त्याहीपेक्षा नातवाची जास्त आठवण येत होती.
"हो जाऊया खरचं फिरायला. बरं वाटेल तुम्हाला."
पुष्पा बाईंनी त्यांचे मन ओळखले.
पुष्पा बाईंनी त्यांचे मन ओळखले.
"बरं चला मावशी येते मी. काळजी घ्या हा.. आणि हो ती उंदरांची चिकटपट्टी आणायला विसरू नका. नाहीतर आहेच परत डोक्याला ताप."
हसत हसत कमला निघून गेली.
हसत हसत कमला निघून गेली.
इतक्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. काचेची वस्तू असावी बहुतेक; म्हणून पुष्पा बाई घाईघाईने आतल्या खोलीत गेल्या.
"अहो काय झालं? कसला तरी आवाज आला मला बाहेर."
त्यांनी जाब विचारायला सुरुवात केली.
त्यांनी जाब विचारायला सुरुवात केली.
"कुठे काय? बाहेरून आवाज आला असणार तुला. मी इथे निवांत बसलोय खुर्चीत."
असे म्हणून प्रकाशराव खुर्चीत रेलून बसले.
असे म्हणून प्रकाशराव खुर्चीत रेलून बसले.
"असं कसं, काचेच काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला मला. आणि हा वास कुठून येतोय?"
पुष्पा बाईंनी सगळीकडे कानोसा घेतला आणि त्यांना कळून चुकले. नक्कीच काहीतरी घोळ घातलेला दिसतो.
पुष्पा बाईंनी सगळीकडे कानोसा घेतला आणि त्यांना कळून चुकले. नक्कीच काहीतरी घोळ घातलेला दिसतो.
"अग काही नाही, मी ह्या आत्तरांच्या बाटल्या बघून जरा कपड्यांवर मारल्या. आता बाहेर जाणार आहोत ना आपण!"
कशी बशी वेळ मारून नेण्यासाठी त्यांनी उत्तर दिले.
कशी बशी वेळ मारून नेण्यासाठी त्यांनी उत्तर दिले.
"इतका भसाभसा कोण मारत सेंट अंगावर?"
असे म्हणून त्या जवळ येऊन बघू लागल्या. आणि बघता तर काय? अत्तराची काचेची फुटलेली बाटली एका कोपऱ्यात गोळा करून ठेवली होती.
असे म्हणून त्या जवळ येऊन बघू लागल्या. आणि बघता तर काय? अत्तराची काचेची फुटलेली बाटली एका कोपऱ्यात गोळा करून ठेवली होती.
"हम्म्म, तरीच म्हंटले तुम्ही आणि शांत कसे बसणार? केलाच ना कारभार! ही अत्तराची बाटली कशी काय फुटली?"
त्या चिडून बोलू लागल्या.
त्या चिडून बोलू लागल्या.
"अग चुकून धक्का लागला माझा आणि पडली ती खाली."
केविलवाणा चेहरा करत प्रकाशराव पुष्पा बाईंचा चिडलेला चेहरा बघत बोलले.
केविलवाणा चेहरा करत प्रकाशराव पुष्पा बाईंचा चिडलेला चेहरा बघत बोलले.
"मग खोटं का बोलत होता इतका वेळ? तरी मी म्हणत होते बाहेरपर्यंत इतका वास कसा काय येतोय."
पुष्पा बाई अंदाज लावत बोलल्या.
"तू चिडणार म्हणून तुला काही सांगत नाही मी."
प्रकाशराव आता बोलून मोकळे झाले.
प्रकाशराव आता बोलून मोकळे झाले.
"म्हणजे, याआधी पण असेच माझ्यापासून लपवून ठेवत असणार तुम्ही. काय बाई काय नवरा मिळाला आहे मला. रोज काही ना काही उद्योग करून ठेवतात. शांत अजिबात बसवत नाही. नुसतं छळायच मला."
पुष्पा बाई बोलत होत्या आणि प्रकाशराव मात्र खुर्चीवर चांगले रेलून बसले होते.
पुष्पा बाई बोलत होत्या आणि प्रकाशराव मात्र खुर्चीवर चांगले रेलून बसले होते.
क्रमशः
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा