पडक्या घराचे रहस्य
भाग १
आज आदी खूप खूश होता .कारण 2 वर्षानंतर
त्याला रविवारी गावी आत्या च्या घरी जायला मिळणार होते. दर वेळी आत्या पुण्याला आली की गावी (पिंपळवंडी) ला ये अस बोलायची पण आदीच्या अती उत्साही, खटपटी खटयाळ, स्वभावामुळे रमा आणि मारूती त्याला गावी पाठवत नव्हते. पण हया वेळी त्याने नीट वागेल ,छान गावी राहील या अटी मान्य केल्यामुळे रमा आणी मारुती त्याला गावी जायची संधी द्यायची असे ठरवतात . शेवटी गाव ते गावच असते . गावाबरोबर नात टिकून राहव, गावाच वातावरण काय असते ते त्यालाही अनुभवता याव अस त्यांनाही वाटत होत म्हणून ते आदी ला गावी जायला हो बोलले होते.

रविवारी आदी ला मारूती ने गावी सोडताना एक ना एक अशा अनेक सुचना दिल्या त्यानेही त्या उत्स्फूर्त पणे मान्य केल्या. मारुती परत पुण्याना पोहचाला तेव्हा रमा म्हणाली "राहील ना आदी नीट गावी? नाहीना उगाच काही करामती करायचा " मारुती म्हणाला "राहील तो नीट नको उगाच काळजी करूस."
आदी ने इकडे फिरायला काय आहे असं विचारल्यावर हर्ष ( हर्ष म्हणजे आत्याचा मुलगा ) बोलला की गावा बाहेर एक खूप छान अस देवीचं मंदिर आहे . लगेच आदी बोलला "आत्या मी गावा बाहेरच्या मंदीरामध्ये जाणार आहे".हर्ष आणि तू जा पण लवकर घरी या आत्या म्हणाली मंदिरामध्ये गेल्यावर आदी ला खूप आनंद झाला. खूप सारे फोटो काढले ,खूप खेळले . आणी परत येताना ते आता दुसऱ्या रस्त्याने घरी येत होते त्याला रस्त्याने येताना एक पडके घर दिसले. जणू काही ते पडके घर त्याला बोलावत होते . असे त्याला वाटायला लागले आणि तो बेचन झाला. पण हर्ष त्याला लवकर चल आदी अस बोलल्यावर आदी भाणावर आला. पूर्ण रस्ता आदीच्या डोक्यातून. त्या पडक्या घराचा विषय मात्र जात नव्हता.रात्री झोपतानाही त्याला त्या घराची ओढ वाटत होती.
त्या पडक्या घराचा विचार करता करता झोप कधी लागली.ते त्याच त्यालाच समजलं नाही . सकाळी आत्याच्या आवाजानेच त्याला जाग आली. कालचा अख्खा दिवस त्याच्या डोळ्यासमोरून सर करून गेला. आणि ते पडक घर , कोणाचं असेल ते घर ? का त्या घरात जावंस वाटत आहे ? काय असेल त्या घरात असा विचार करत करतच त्याने चादरीच्या घड्या घातल्या . मनातुन काही केल्या त्या घराचा विषय जात नव्हता .
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा