Login

पडक्या घराचे रहस्य भाग 2

रहस्य कथा
भाग २

आज आदी ने मनाशी ठरवले की आज त्या घराकडे पुन्हा जायच पण या बद्दल आत्याला काय सांगायच ? ती तर मला एकट्याला तीकडे जाऊ देणार नाही . काय सांगू तिला पण जर मी लवकर जाऊन आलो तर तिला समजणार पण नाही आणि मला पण त्या घरात काय आहे हे पाहता येईल असा विचार करून आदी त्या पडक्या घराकडे जायला निघतो.


सागवानी लाकडाच्या खांबांनी सावरलेलं ते घर मध्ये मध्ये पडलेल आणि घरा पुढे आंगण ज्या मध्ये गवत मरून त्याच्या काड्या वाऱ्यामूळे झुलत होत्या. द‌गड मातीचे खूप वर्ष जुने असे ते घर असल्यामुळे मध्ये मध्ये दगडाच्या भिंतीना मोठी मोठी भगदाडे पडलेली होती . त्या पडलेल्या भगदाडांमधून वाळलेल्या गवताच्या काड्या वाऱ्यामूळे एक वेगळाच आवाज करत होत्या. आदी आता तुळसी पासून थोडा पुढे गेला . त्याला तीकडे दोन आकृत्या खेळताना दिसल्या.तो त्यांच्या बरोबर काही बोलणार इतक्यात त्याच्या मागून कोणी तरी गेल्या सारखे त्याला वाटले . त्याने लगेच मागे वळून पाहील तर कोणीच नव्हते. तो पर्यंत आता त्या दोन आकृत्या ही आतल्या घरात जाताना दिसल्या तसा तो त्या आकृत्या न मागे गेला .

आत पाहतो तर काय आता त्याला त्या आकृत्या स्पष्ट दिसायला लागल्या होत्या. पण का कोणास ठाऊक त्या आकृत्यांचे चेहरे ओळखीचे वाटायला लागले होते . आदी त्यांच्या सोबत बोलणार इतक्यात एका अनोळखी माणसाने त्या लहान मुलाला विहिरीत टाकून दिले . आणि त्याच्या सोबतची ती छोटी मुलगी ती कुठे गेली ? आता तर इकडेच होती कुठे गायब झाली ती ? आदी ला आता घाम सुटला होता . त्याच्या हृदयाची स्पंदने वाढली होती . त्याने धावत जाऊन विहिरीमध्ये डोकावून पाहीले तर विहीरीत गवत आणि खूप सारा पाला पाचोळा आणि पिंपळाच्या झाडाशिवाय काहीच दिसत नव्हते .

कुठे गेला तो मुलगा ? आता तर त्याला त्या माणसाने विहिरी मध्ये टाकलं होतं .पण आता तो त्या विहिरीत नाहीये असा विचार करे पर्यंत इतक्यात कोणी तरी उंचपुरा धिपड माणसाने एका धोतर घातलेल्या माणसाला काठीने डोक्यावर मारलं हे सर्व पाहून आदी खूप घाबरला आणि त्याचे डोळे बंद होत असताना त्याला काहीतरी आठवल्या सारखे झाले . तो काही बोलणार इतक्यात ती माणसे गायब झाली होती . काय होत हे त्याला काही समजत नव्हते . का ही माणसे ओळखीची वाटत होती ? आणि ती छोटी मुलगी कोण होती ती? ज्याने त्या माणसाला मारले कोण होता तो . आणि का मारले त्याने त्या माणसाला ?

क्रमशः
0

🎭 Series Post

View all