Login

पडक्या घराचे रहस्य भाग 3

रहस्य कथा
भाग ३


असे प्रश्न डोक्यात असतानाच त्याला काहीतरी आठवल्या सारखे झाले आणि तो आपोआप एका बंद दरवाज्याच्या खोली कडे वळाला . दरवाजा खोलून तो आत जाणारच इतक्यात त्याला आवाज आला. सखा आत जाऊ नकोस तिकडे आबा काही लोकांन सोबत सला मसलती करत आहेत आदी ने मागे वळून पाहील तर कोणीच नव्हते . अस का होत आहे. आणि कोण हे आबा ? पण त्याने आत जायूचे ठरवले तो आत गेला तेव्हा त्याला दिसले की काही माणसे एका माणसासोबत वाद घालत होते . वादचं रुपांतर भांडणामध्ये झाले . इतक्यात एका माणसाने मोठ्या काठीने दुसऱ्या माणसाच्या डोक्यावर मारले .

आणि ते पाहून बाकी लोक इकडे तिकडे पळून गेली इतक्यात ज्याने काठी मारली तो माणूस मागे वळला तसा त्याचा चेहरा .हा तोच माणूस होता जो थोडा वेळ आदी त्याला दिसला होता . आणि ज्याच्या डोक्यात मारलं होत त्यांना पाहून आपोआपच तोंडातून आबा अशी जोरात हाक बाहेर पडते . डोक्यातून येणार रक्त आणी रक्ताने माखलेले कपडे, खाली पडलेले रक्त हे सर्व पाहून आदी खूप घाबरला होता. त्याच्या छातीत आता जास्त धडधडत होत .आणि आदी खाली पडला .


जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या बाजूला एक बाई बसलेली होती आणि ती त्याला विचारत होती आता कस वाटतय सखा तुला ?" मला काय झाल आहे आई ?"अस म्हणत तो ऊठला तेव्हा त्या बाई त्याला म्हणाली आपल्याला जीवावर काही माणसे उठली आहेत.पण का आई ? का म्हणजे आपल्या कडे असलेल्या गुप्त खजिन्या बद्दल त्यांना समजलं आहे .आणि तोच त्यांना हवा आहे . हे बोलता बोलताच तो उठला आता त्याला खूप हलके हलके वाटत होते. ती मघाची छोटी मुलगी त्याला दादा दादा बोलत होती. आणि तो त्या मुलीला घेवून खेळायला जाऊ का ?अस विचारत होता आई बोलली की जा खेळायला पण जास्त लांब जाऊ नकोस कोणाचा काय भरवसा नाही कोण कधी जीवावर उठेल ते .

आता तो मुलगा आणि ती मुलगी त्या घराबाहेर आले . आणि पाहतो तर काय समोरून हर्ष आदीला हाक मारत मारत त्याला शोधत होता . हर्षला पाहून आदीलाही खूप आनंद होतो . आदी ही त्याला आवाज देऊ लागतो पण आदी चा आवाज त्याला ऐकू जात नव्हता. म्हणून आदी हर्ष च्या जवळ गेला त्याला हात लावला पण तरीही हर्ष आदी ला शोधत शोधत पुढे निघून चालला होता. हे पाहून आदी ला काही समजत नव्हते .तसाच तो आत्याच्या घरी जातो . आत्याच्या घरी गेल्यावर पाहतो तर काय रमा आणि मारूती पण गावी आलेले असतात. इतक्यात आत्या बोलते काल सकाळी आदी घरातून गेला होता जो आता पर्यंत तो आलेलाच नाही.

रमा ची जोर जोरात रडून रडून हालत खराब झालेली असते . मारुती तीला धीर देत असतो आदी त्यांना ओरडून ओरडून सांगत असतो की मी इथेच आहे . पण कोणीहीच त्याच्याकडे पाहत नसते का ते त्याच्याकडे पाहत नसतील ? की त्यांना तो दिसताच नसेल ? का तो त्यांना दिसत नसेल ?

टिप : मी पहिल्यांदाच लेख लिहत आहे . काही चुकले असल्यास माफी असावी.