पदरी पडले अन पवित्र झाले – भाग १
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2005
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2005
सुमन अठ्ठावीस वर्षांची होती. लग्नाला पाच, सहा वर्षं होऊन गेली होती. साधी, सरळ होती. खूप प्रेमळ होती. नवरा अमोलसुद्धा खूप छान होता. त्यांचं मोठं किराणा दुकान होतं. घरची परिस्थिती चांगली होती.
अमोलची आई शारदाबाई, सुमनच्या मागे लागल्या होत्या. “मुलं पाहिजे” असं सतत विचारत असत.
आईसमोर अमोलला काही बोलता येत नव्हतं. सुमनची खूप घुसमट होत होती. तरीही ती अमोलच्या आईचं सगळं काम करत होती.
सुमनने अमोलला सांगितलं, “मी पण तुमच्यासोबत दुकानात येत जाईन.”
अमोल विचारात पडला घरी राहून आईचे टोमणे ऐकण्यापेक्षा, तिला माझी मदत करता येईल, तिचं पण मन रमेल. घरी राहिली की तेच तेच विचार डोक्यात येतात.
अमोल विचारात पडला घरी राहून आईचे टोमणे ऐकण्यापेक्षा, तिला माझी मदत करता येईल, तिचं पण मन रमेल. घरी राहिली की तेच तेच विचार डोक्यात येतात.
“सुमन, तू पण माझ्यासोबत चल. मला तुझी मदत होईल,” अमोल म्हणाला.
“घरचं काम कोण करेल? माझ्याकडून काही होत नाही,” अमोलची आई म्हणाली.
“आई, ती घरातले काम करून घेत जाईल, मी पण तिला मदत करीन. लवकर काम झालं की आम्ही दोघं दुकानात जाऊ,” अमोल म्हणाला.
“आता तू घरातलं पण काम करणार का? आणि दुकानात पण काम करणार? बायकांचं काम तुला का करायचं आहे?” अमोलची आई म्हणाल्या.
“आई, सुमन पण घरचं काम करून दुकानात येणार आहे ना. तिने का माणसाचं काम करावं? घरी आयतं बसून खाऊ शकते ना? ती मला मदत करत आहे, ते तुला चालत नाही का?” अमोल म्हणाला.
त्या काही बोलल्या नाहीत. सुमन पण आवरायला निघून गेली. अमोलही तिच्या मागे गेला.
“माझं काही ऐकतच नाही, बायकोचं सगळं ऐकतो. तुला एवढी वर्षं मुलं होत नाहीत तरी तिच्या मागे पुढे करतो. माझं ऐकलं असतं तर आतापर्यंत दुसरी सून घेऊन आले असते. आतापर्यंत मी आजी झाले असते,” त्या मनात विचार करत बसल्या होत्या.
सुमन आवरून आली. तिने डब्बा भरला. अमोलच्या आईसाठी भाजी–चपाती नीट झाकून ठेवल्या.
“आई, आम्ही येतो,” अमोल म्हणाला. दोघं निघून गेले.
ते दुकानात पोहोचले. अमोलने दुकान उघडलं. तो आपल्या जागेवर बसला. त्याने दोन नोकर ठेवले होते. सुमन त्यांच्यावर लक्ष ठेवत होती.
तिला भाजीवाल्याचा आवाज आला.
“अहो, मी भाजी घेऊन येते,” सुमन म्हणाली.
“अहो, मी भाजी घेऊन येते,” सुमन म्हणाली.
“लवकर ये,” अमोल म्हणाला.
“दादा आणि वहिनी किती छान आहेत! देव अशा लोकांनाच का त्रास देतो कोण जाणे... वहिनी आपल्याला किती जीव लावतात. काही खायला आणलं की आपल्यालाही देतात,” एक नोकर म्हणाला.
“बरोबर बोलतोयस,” दुसरा म्हणाला.
ते गप्पा मारत काम करत होते.
सुमन भाजी घेण्यासाठी गेली, पण भाजीवाला दूर निघून गेला होता. मग ती चालत पुढे जायला निघाली.
तिला एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. साडीमध्ये त्याला लपवून ठेवलं होतं. सुमनने त्या बाळाला बाहेर काढलं. मग तिने त्याला नीट लपवून दुकानात घेऊन गेली.
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा