Login

पदरी पडले अन पवित्र झाले, भाग -2

“देव नेहमी आपल्याला हवं ते देत नाही,पण जेव्हा तो देतो… ते ‘पदरी पडलं’ असतं आणि ‘पवित्र झालं’ असतं.”
पदरी पडले अन पवित्र झाले – भाग २

जलद  लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2005

सुमन दुकानात आली.
“सुमन, कोणत्या भाज्या आणल्या? लवकर आलीस की! गर्दी नव्हती का? तुझाच नंबर लागला का?”
अमोल काहीतरी लिहीत सुमनशी बोलत होता.

“अहो, बघा ना... मला तिथे एक बाळ भेटलं. साडीमध्ये लपेटलेलं होतं. त्याचं कोणी नाही असं वाटतं,” सुमन त्या बाळाकडे बघत म्हणाली.

अमोलने त्या बाळाकडे पाहिलं. “किती गोड बाळ आहे! कोणी त्याला असं फेकून दिलं असेल? सुमन, आई काय बोलेल?” अमोल म्हणाला.

“मला हे बाळ हवं आहे. आपण त्याला दत्तक घेऊ. पोलिसांशी बोलून घेऊ,” सुमन म्हणाली.

“सुमन, तू सगळं ठरवूनच टाकलंस!” अमोल हसत म्हणाला.

“मला ते बाळ हवं आहे,” सुमन ठामपणे म्हणाली.

“आई किती बोलेल… सुमनला बाळ हवं आहे, असं ती ऐकली की लगेच काहीतरी बोलेल. पण असं बाळ जन्म देऊन फेकून कोण देतं बरं?” अमोल विचारात पडला.

“सुमन, चल, आपण पोलिस स्टेशनमध्ये जाऊ,” अमोल म्हणाला.

सुमनला खूप छान वाटलं.

अमोलने मुलांना दुकान सांभाळायला सांगितलं आणि ते दोघं बाहेर पडले.

ते पोलिस स्टेशनला पोहोचले. तिथे त्यांनी सगळं सांगितलं.

अमोलने इन्स्पेक्टरला सांगितलं, “मला हे बाळ दत्तक घ्यायचं आहे.”

“त्या बाळाला आश्रमात देण्यापेक्षा, आई–बाबा मिळत असतील तर चांगलंच आहे ना,” इन्स्पेक्टर मनात विचार करत म्हणाले.

“आम्ही बाळ घेऊन जाऊ का?” अमोल थोडा कचरून विचारतो.

“हो, तुम्ही बाळ घेऊन जा,” इन्स्पेक्टर म्हणाले.

अमोल आणि सुमन आनंदाने उजळले. त्यांनी बाळाला घेतलं आणि घरी गेले.

सुमन लगेच रूममध्ये गेली.

“अमोल, तिने काय आणलंय? अशी रूममध्ये का निघून गेली?” अमोलच्या आईने विचारलं.

“आई, आम्ही बाळ दत्तक घेणार आहोत,” अमोल म्हणाला.

“कोणाचं बाळ आहे? आणि इतक्या लवकर कसं काय मिळालं?” अमोलची आई म्हणाली.

“असं फेकून दिलेलं होतं, सुमन त्याला घेऊन आली,” अमोल म्हणाला.

“असं कोणालंही उचलून घेऊन आलात आणि आता त्याला तुमचं बाळ म्हणणार?!” अमोलची आई चिडून म्हणाल्या.

“आई, ते आमचं बाळ आहे,” एवढंच अमोल म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला.

“अहो, याला कपडे लागतील. मी आता याला अंघोळ घालते,” सुमन म्हणाली.

“मी जवळच्या दुकानातून कपडे घेऊन येतो,” अमोल म्हणाला आणि बाहेर गेला.

सुमन बाळाला अंघोळीसाठी बाथरूममध्ये घेऊन गेली.

अमोलच्या आई बडबड करत होत्या, पण सुमनने त्यांचं काही ऐकलं नाही.

अमोल बाळाला लागेल ते सगळं घेऊन आला.

सुमनने बाळाला तयार केलं. बाळ खूप छान दिसत होतं. सुमनने दूध बनवलं, बाळाला पाजलं. अमोल बाळासोबत खेळत होता. सुमनने स्वयंपाक करून घेतला.