Login

पदरी पडले अन पवित्र झाले, भाग -3

“देव नेहमी आपल्याला हवं ते देत नाही,पण जेव्हा तो देतो… ते ‘पदरी पडलं’ असतं आणि ‘पवित्र झालं’ असतं.”
पदरी पडले अन पवित्र झाले – भाग ३

जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2005

थोड्याच दिवसांत त्यांनी बाळ दत्तक घेतलं.

अमोलची आई सुमनला खूप बोलत होती.
“दुसऱ्याचं मूल का आणलं? आजूबाजूच्या बायका पण सुमनला बोलत होत्या, ‘तुझं स्वतःचं मूल आहे का?’ अजून बरंच काही बोलल्या. पण सुमन काही ऐकत नव्हती.”

“सुमन, बाळाचं बारसं करायचं का? आता पंधरा दिवस झाले. बाळ खूप शांत आहे ना? त्याला काहीच त्रास नाही, रडतही नाही,” अमोल म्हणाला.

“माझ्याही मनात आलं होतं. आपण त्याचं नाव काय ठेवायचं?” सुमन म्हणाली.

“आपण गुरुजींना विचारूया का? आपल्याला त्याचं काहीच माहित नाही ना,” अमोल म्हणाला.

“आपल्याला तो भेटला, एवढंच मोठं भाग्य आहे. गुरुजींना विचारण्यापेक्षा माझ्या मनात एक नाव आहे,” सुमन म्हणाली.

“बरं चालेल, सांग ना तुझ्या मनातलं नाव. आपण उद्याच बारसं करूया,” अमोल म्हणाला.

“चालेल,” सुमन हसत म्हणाली.
सुमन अमोलला  नाव सांगितले..  अमोलला पण  आवडले. 

“काय चाललंय घरात? मला काहीच सांगत नाही. अमोल, तू पण माझं काही ऐकत नाहीस. सुमन आता काहीच विचारत नाही, सगळं तिच्या मनासारखं करते,” अमोलची आई चिडचिड करत म्हणाली.

अमोल आणि सुमनने बाळाचं बारसं केलं. बाळाचं नाव त्यांनी गौरव ठेवलं.

बाळ मोठं होत होतं. सुमन तर त्याच्यासोबत जास्त वेळ घालवायची. बाळ कधी बोलायला लागेल याची ती वाट बघायची.
अमोल पण दुकानातून आल्यावर बाळासोबत खेळायचा. त्याचा थकवा निघून जायचा.
बाळही अमोलसोबत मस्ती करायचं.

असेच छान दिवस जात होते. अमोलची आई टोमणे मारायच्या, पण सुमन फारसं लक्ष द्यायची नाही.

गौरव आता दीड वर्षांचा झाला होता. तो “आई” म्हणून हाक मारायचा. सुमनला ते ऐकून खूप छान वाटायचं.

एक दिवस गौरव खेळत असताना पडला. त्याच्या डोक्याला लागलं. सुमन खूप घाबरली.
अमोल घरी आला होता. त्याने पाहिलं आणि लगेच गौरवला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. सुमन पण सोबत गेली.

ते हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी गौरवला ऍडमिट केलं. सुमन खूप रडत होती.
अमोल तिला समजवत होता. अमोलची आईही आली होती. त्या सुमनकडे पाहत होत्या. आता त्यांनाही तिचं दुःख जाणवत होतं.

दरवाजा उघडला. नर्स बाहेर आली.
सुमन आणि अमोल लगेच तिच्याकडे गेले.

“नर्स, आमचा गौरव कसा आहे?” अमोलने विचारलं.

“त्याला रक्ताची गरज आहे. त्याचं खूप रक्त गेलं आहे. तुमच्यापैकी कुणाचं तरी रक्त द्यावं लागेल,” नर्स म्हणाली.

“माझं घ्या!” सुमन पुढे होत म्हणाली.

“चला, आधी तपासणी करावी लागेल,” नर्स म्हणाली आणि सुमनला घेऊन गेली.

अमोल पण रक्त  चेक करायला गेला.  नर्सने अमोलचे रक्त चेक केले. 

नर्स म्हणाली, “अमोलजी, तुमचं रक्त चाललं नाही. सुमनबाईंचं रक्त जुळलं.”

अमोल आपल्या आईजवळ गेला.
“आई, गौरव लवकर बरा व्हावा असं वाटतंय,” अमोल म्हणाला.

“काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. सुमन गेली आहे ना,” अमोलची आई म्हणाली.

सुमनचं रक्त गौरवच्या रक्ताशी जुळलं. सुमनने गौरवला रक्त दिलं.

गौरवला लगेच रक्त चढवलं. थोड्याच वेळात गौरवला शुद्ध आली.
सुमनला झोपवून ठेवलं होतं.

अमोल आणि त्यांची आई गौरवला भेटायला गेले.

“गौरव, तुला बरं वाटतंय का?” अमोल विचारला.

“ब.. बा... आ... ई... कु... ठे... आ... हे...” गौरव हळू आवाजात म्हणाला.

“आई येईल, थोड्या वेळात,” अमोल म्हणाला.

“गौरव, आता तुला बरं वाटतंय ना?” अमोलची आई म्हणाली.

गौरव अमोलकडे पाहत होता. अमोलने त्याला डोळे उघडझाप केली.

“आता बाहेर जा, त्याला झोपू द्या,” नर्स म्हणाली.
अमोल आणि त्यांची आई बाहेर गेले

अमोलच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले.

‘सुमनने गौरवचा जीव वाचवला...
मातृत्व रक्तात नसतं ग, हृदयात असतं.’