Login

पदरी पडले अन पवित्र झाले, भाग -4

“देव नेहमी आपल्याला हवं ते देत नाही,पण जेव्हा तो देतो… ते ‘पदरी पडलं’ असतं आणि ‘पवित्र झालं’ असतं.”
पदरी पडले अन पवित्र झाले, भाग - 4
जलद स्पर्धा ऑक्टोबर 2005

गौरव आता बरा होत होता. सुमन त्याच्या जवळ होती. आज त्याला घरी सोडणार होते.

अमोलच्या आईने त्याचे ओक्षण केले. त्याला घरात घेतले. त्याच्यासाठी जेवण बनवले. सुमन आणि अमोलला खूप खुश वाटले.

“गौरव आता तुला छान वाटतं आहे ना? काही त्रास तर होत नाही ना?” अमोलच्या आई म्हणाल्या.

“आजी, तू आज माझ्यासोबत एवढी चांगली कशी काय बोलत आहेस? मी पडलो होतो ना... तुझ्या डोक्याला लागलं का?” गौरव म्हणाला.

“गौरव, आजी आहे ती. असं नाही बोलायचं,” सुमन त्याला समजावते. मग गौरव काही बोलत नाही.

“चला आता, मस्त जेवण बनवलं आहे. आपण जेवण करू या. माझ्या नातवाला मी माझ्या हाताने खाऊ घालणार आहे,” अमोलच्या आई म्हणाल्या.

सुमन आणि अमोल तिच्याकडे बघत होते. आज या अशी काय वागत आहे? दोघं पण विचार करत होते.

सुमन त्यांच्या मदतीला गेली. त्यांनी जेवण बाहेर आणलं.

अमोलच्या आईने गौरवला जेवण भरवलं. गौरव पण त्यांच्या हातून खात होता. “आजी, जेवण खूप छान झालं आहे. तू किती प्रेमाने मला खाऊ घालत आहेस!” गौरव म्हणाला.

“मी आधीच सगळं करायला पाहिजे होतं,” अमोलच्या आई म्हणाल्या.

“आई, जाऊ दे... जेवण छान झालं आहे. मी तुला खाऊ घालतो,” अमोल म्हणाला. आणि त्याने त्यांच्या आईला खाऊ घातले.

आता अमोलच्या आई सुमनसोबत चांगल्या वागत होत्या.
आजूबाजूचे लोक सुद्धा सुमनला काही म्हणत नव्हते.

गौरव मोठा होत होता. त्याला शाळेत टाकलं होतं. सुमनला मिठी मारून तो अमोलसोबत शाळेत गेला.

असेच छान दिवस जात होते. सुमन आणि अमोलचं जीवन मस्त मजेत चाललं होतं. गावातले लोक आता सुमनसोबत नीट बोलत होते. सुमन दुकानातही जात होती आणि अमोलला मदत करत होती.

अमोल आणि सुमन मस्त गप्पा मारत बसले होते.

“सुमन, देवाने जे दिलं नाही, ते तुला स्वतः निर्माण करता आलं,” अमोल म्हणाला.

“जे आपल्या खरंच पदरी पडलं... अन पवित्र झालं,” सुमन म्हणाली.

“खरंच बोलत आहेस. गौरव आपल्या आयुष्यात आला आणि सगळं बदललं. आपल्या आयुष्यात आनंद आला. आई पण आता आपल्या सोबत चांगली बोलते, चांगली वागते, तुला त्रास देत नाही,” अमोल म्हणाला.

“आता सगळं छान होईल,” सुमन म्हणाली.

दोघं पण गप्पा मारत बसले.