Login

बापरे

Opinion On Recent Incident
बापरे
ही एकच प्रतिक्रिया माझी हा हल्ला झाला तेव्हा, अगदी लगेच आलेली,
आणि आता विचार करतेय खूप ते आज काल काय म्हणतात ना overthinker आहे मी आधीपासूनच आणि आता तर राहून राहून या हल्ल्याचे विचार येतात, जे वाचलेत त्यांच्या समोर त्याच्या प्रियजनांवर गोळ्या घातल्या गेल्या आहेत सगळेच अगदी सामान्य लोक होती ती, हे सगळ त्यांनी पण फक्त चित्रपटांमध्ये पाहिले असेल, पुस्तकांमध्ये वाचलं असेल, अगदी तुमच्या माझ्या सारखच,
जवळच्या व्यक्तीला गमावणं ते ही अशा पद्धतीने, उरलेले पूर्ण आयुष्य त्यांच्या कानातून ते गोळ्याचे आवाज जातील?,
शांत पणे झोपू शकतील,? त्या किंकाळ्या आक्रोश ईथे ऐकून धस्स होतंय ते नॉर्मल लाईफ जगू शकतील,? काश्मीर, ती जागा ते टेलिव्हिजन वर तरी बघू शकतील?
ती नवीन नवरी किती स्वप्ने असतील मंतरलेले दिवस हे आणि त्या दिवसांचा हा असा शेवट? काय चूक होती त्यांची, एका ठराविक धर्मात जन्म घेतला ही, की त्यांना अपेक्षित धर्मात जन्म नाही घेतला ही?
एका चित्रपटामधला सीन आहे "ठप्पा कहां है दिखाओ?" तो सीन करणाऱ्या कलाकार ला सांगायचं आहे ठप्पा च मागितला त्यांनी, जातीच्या राजकारण पेटविणाऱ्या सांगायचं आहे तुम्ही ब्राह्मण, तुम्ही मराठा, बौद्ध अस नाही विचारलं त्यांना हिंदू विचारलं फक्त आणि गोळ्या मारल्या, इतकी क्रूरता, इतका द्वेष, माझे खूप मुस्लिम मित्र मैत्रिणी आहेत, जे खूप चांगल्या विचाराचे आहेत,त्यांनी ही या गोष्टीचा निषेध च केला, पण सर्वधर्म समभाव आता नको, जे जीव गेले ना त्यांच्या मागे राहिलेल्यांची कल्पना करवत नाही, अंगावर काटा येतो, fighting सीन जर आला movie मधे तर चॅनेल बदलनारे आहोत आम्ही का तर लहान मूल घाबरतील, किंवा आम्ही स्वतः पण विचार करतो की काय उगीच मारामारी बघायची... जे खोट नको वाटत ते खर भोगल त्या लोकांनी.
एका क्षणात आयुष्य संपलं, ज्या ठिकाणाला आपण स्वर्ग म्हणतो त्याने आयुष्यभराच्या नरक यातना दिल्या.या सगळ्या परिस्थितीतून पीडितांना बाहेर पडण्याची देव शक्ती देवो हीच प्रार्थना.
"मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा।"
आता जाती फक्त 2 च स्त्री आणि पुरुष, बाकी धर्म हिंदू बास......