पाहिलं प्रेम (भाग 10) न विसरता येणारी आठवण

Love story

पाहिलं प्रेम (10) 

(माघील भागात आपण पाहिले दादा व सुजित सुनीता ला हॉस्टेल ला सोडून निघून जातात, आणि सुनीता बुडून जाते सुजित च्या विचारात, )

आता पुढे ...........................

सुजित च्या काळजी करण्याला मी  प्रेम मानून बसले होते

मी वाहवत होते  त्यांच्यामध्ये प्रत्येक क्षणाला, 

माझे  नेहमीचे रूटीन चालू झाले 
कॉलेज, अभ्यास,प्रॅक्टिकल हे सगळं सांभाळून, सुजित ला भेटणे बोलणे चालूच होते, 

माझं भांडणंकरणं, हट्ट करण, हक्काने रागावणं अंग वळणी पडले होते त्याच्या, 

दिवस मजेत सरत होते, 
मी  आणखी गुंतत होते  त्या नाव नसलेल्या नात्यात, 
तितक्यात मला आठवले 
फ्रायडे ला सुजित चा वाढदिवस आहे, 

सुजित चा वाढदिवस म्हणजे, माझ्यासाठी आनंदाची पर्वणी च होता, 

मी सगळी तयारी केली, 
म्हणजे मी काय घालणार, हेअरस्टाईल कशी करणार,पण त्याला गिफ्ट काय देऊ, त्याला काय आवडते माहीत नाही, 
व मी दिलेले गिफ्ट आवडेल का त्याला, 
काय बर गिफ्ट द्यावे, 
शर्ट देऊ का????
नाही नको उगाच त्याने नाकारला तर , 
नाही नाकारणार, 
व तसेही मला तो आवडतो ना मग बस झालं, जो शर्ट मला आवडेल तोच गिफ्ट करेल, त्याला आवडो अगर न आवडो, 
मी वैशाली माझी मैत्रीण तिला घेऊन शॉपिंग साठी गेले, 

आज पहिल्यांदा मी सुजित नसताना एकटी बाहेर आले होते,हा नको तो द्या 
तो नको दुसरा दाखवा, 
असे करत करत खुप शर्ट काढले, 
पण कोणता घेऊ सुचेना, 
शेवटी त्याच्या आवडीचे सगळे रंग असलेला एक एक शर्ट घेतला 
व डोळे झाकून कोणत्याही एका शर्ट ला हात लावायचा व तोच घ्यायचा,असे ठरले, 


मी त्याच्या आवडीचे, पांढरा, केशरी, जांभळा, निळा, सगळे एक एक शर्ट काढले व डोळे झाकून एका शर्ट वर बोटं ठेवले,

डोळे उघडून बघते तर काय , 
निळ्या रंगाचा शर्ट वर बोट होते, मी खुप खुश झाले, कारण तो माझा देखील आवडता रंग होत, 

पण दुसऱ्या बाजूने मन पुन्हा हिरमुसले, मी इतकी तयारी केली, आणि त्याने जर मला बोलावले नाही तर , 
छे , छे, मी काही पण विचार करते, 
का नाही बोलावणार तो मला, 
बोलावणारच, 
पण नाही बोलावले तर............
मग नाही बोलावले तर नाही बोलावले....... तरीही मी सरप्राईज देणार च,कारण मला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही, तो मला आवडतो हे पुरेस होतं, 

तितक्यात त्याचा कॉल आला, 
Hi
काय करतेस, तो 

काही नाही बसलेय, मी 

जेवण झालं का ??
तो 

हो झालं तुझं, मी 

आताच केलं, 
बर ऐक ना , तो 

हो ऐकतेय बोल, मी 

उद्या माझ्या घरी कार्यक्रम आहे, तर येशील का??
तो 

कार्यक्रम, ........
कसला कार्यक्रम आहे, मी 


आहे, काहीतरी, तो 

हो चालेल, वेळ सांग येईल, मी 


"संध्याकाळी सहा वाजता,
मी घ्यायला येऊ की येशील तू 
तो 

नको अरे, तुझ्याघरी प्रोग्राम व तू असा बाहेर, नको
 मी येईल, 

मी फोन ठेवला, आनंदाने बागडू लागले त्या स्वच्छंदी फुलपाखरा प्रमाणे,

उद्याचा दिवस कधी येईल 
असे झाले मला जसा काय माझाच वाढदिवस होता, 
मी इतकी तयारी कधी स्वतः च्या वाढदिवशी देखील केली नव्हती,

उद्या जायचे या आनंदातच मी बेड वर पडले, 
तशी मी खुप झोपळू झोप खुप लवकरच येते मला, 
पण विचार केला, आपण 12 ला  विष केलं तर, 
पुन्हा वाटलं नको हे खुप अति होतंय आता, 
तो काय विचार करेल थोडं चांगलं वागलो तर मागेच लागली, नको 
व मला जागरण शक्य पण नाही, 
कशाला हाताने ओढून घ्यायचे
पण पुन्हा विचार केला आयुष्यात एक दिवस तर येतो, कुठे मला रोज रोज जागायचे आहे, 
ठरलं तर मग आज 12 ला विष करायचे, 
ठरलं म्हणजे सगळं संपलं अस नाही, 
माझ्यासाठी 12 पर्यंत जागणे सोपे नव्हते, 
व 12 ला उठून विष करणे मनाला पटत नव्हते, 
मग जागणार कसे, 
9 ला झोपणारी मी 11 पर्यंत जागले, 
पण त्या उरलेल्या 60 मिनिटं च काय करायचं, 
मी डोळ्यांना ओढून ताणून, चेहऱ्यावर पाणी मारून मारून 12 पर्यंत जागले, 

बरोबर 12 च्या ठोक्याला, 
मेसेज केला, 
मेसेज केल्यापासून  प्रतिसादाची वाट बघत होते,

एक एक क्षण जात नव्हता
 नजर तर फक्त  त्याच्या नावाभोवती गुरफटली होती,

आता मेसेज सीन होईल ????
मग सीन होईल????
 हा विचार करता करता
  मला केव्हा झोप लागली, 
माझे मलाच कळले नाही,


कसे असते ना,
 एखाद्यावर जीवापाड प्रेम करणे, आपण जीवाचे रान करतो त्या व्यक्ती च्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी, 
 त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक हास्य उमलाव व त्याचे कारण आपण असावं हा अनुभव च खुप विलक्षण असतो, 

माणूस प्रेमातील पहिली गोस्ट कधीच विसरत नाही, 
 
मग  ती भेट असो की डेट, 
अंगातील ड्रेस असो की प्लेस 

पहिला पाऊस, ते पाहिलं गिफ्ट 
तो पहिला स्पर्श की नजरेने च घेतलेला काळजाचा वेध, 

जपून ठेवलं जातं आयुष्यभर, 
वेळीअवेळी पापण्यांची कड ओलावण्यासाठी,

हो की नाही ...............

येईल सुजित चा प्रतिसाद की राहील सुनीता चा मेसेस तसाच अनसिन ...........

क्रमशः .......................

जाणून घेण्यासाठी मला फॉलो करा, व सोबत राहा

🎭 Series Post

View all