पाहिलं प्रेम (भाग 11) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love story

पाहिलं प्रेम (11)
(माघील भागात आपण पाहिले सुनीता मेसेज च्या रिप्लाय ची वाट बघत झोपी गेले)


आता पुढे...............................

मला सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा सहा वाजले होते, 
मी पटकन मोबाईल बघितला तर Thanks असा रिप्लाय होता, 

मनात थोडं वाईट वाटलं, 
एवढं जागून 12 ला विष केलं व फक्त Thanks ,,,,,,,

पण अपेक्षा कशाची ठेवतेय 
त्याला थोडीच माहीत आहे 
मी इतके कष्ट करून त्याच्यासाठी जागले, 
त्याला वाटले असेल केला असेल सहज मेसेज आणि तसेही ज्याच्यासाठी खुप जण जागतात त्याला माझी कदर तरी कशी येणार, 

पुन्हा माझी मीच हसले स्वतः ला 
मी काही पण विचार काय करते, 

कुणी केलं असेल त्याला पहिलं विष??

कुणी असेल का त्याच्या आयुष्यात इतकं जवळच?

त्याला कळेल का माझ्या भावना 
माझ्या मेसेज मधून,
सगळं काही निरुतरीत होतं, 

चल सुनीता आवर आज जायचे आहे, 

स्वतः लाच सांगत मी तयारी करू लागले, 
तसे संध्याकाळी जायचे होते , 
पण मला तितका दम होता का???
मला तर सकाळपासून च जावेसे वाटत होते, 

आज मीच आपली खुश होते, 
कारण नसताना, 
स्वतः ला पुन्हा पुन्हा आरशात नेहाळत 
होते समोरून जाताना, 

दिवस त्याचा व 
अनुभवत होते मी, 

 खरच किती जगत ना माणूस एखाद्यासाठी, 
त्यात समरस झालं की माणसाला दुसरं काहीच दिसत नाही, 
प्रेम अशी एकमेव भावना आहे जी माणसाला माणूस बनवते, 

मी काय विचार करत होते 
त्याचा मलाच ताळमेळ नव्हता, 

माझं फक्त एकच काम चालू होतं 
रूम मध्ये चकरा मारणे,
 मधेच घड्याळ बघणे, 
 इनबॉक्स चेक करणे, 

मला एक कळेना, 
माहीत होतं मेसेज येणार नाही 
तरीही मी इनबॉक्स का चेक करत होते वेड्यासारखा, 

वाट बघण्यात व माझ्याच तंद्रीत 4 वाजले, 

आता मी तयारीला लागले, 
तयारी पण अशी की जसे काय लग्न आहे माझे, 
सगळे ड्रेस काढून झाले, 
होते नव्हते सगळे सामान जमिनीवर आले, 

हा की तो,,
तो नको हा च ,........  
असे करत करत 

त्या दिवशी चे लेजिन्स टॉप घातले, 
मी माझी तयार होऊन, 
त्याच्या घरी निघाले, 
काय होईल, 
कसे होईल, 
हजार प्रश्न 
मिळेल का आपल्याला काही सरप्राईज की फक्त भेट होईल, 
या विचारात च मी त्याच्या घरी आले, 
आतमध्ये प्रवेश करताच 
तो प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करत म्हणाला, 
बर झालीस आली 
चल काही काम असेल तर मदत कर आईला, 
मला मदत कर म्हणाला, 
बर झालं लवकर आली म्हणाला , 
म्हणजे हा वाट बघत होता तर माझी
 मग कॉल करायचा ना एक, 
जाऊ दे बिझी आहे तो, 
मला आपलं तर म्हणाला ला ना , 
मी खुश होते, 
पण म्हणल गिफ्ट देऊ 
पुन्हा वेळ मिळेल की नाही माहीत नाही, 

सुजित, मी आवाज दिला

आलो, 
बोल काय म्हणतेस, तो 

काय म्हणू , कसे विष करू, हातात हात घेऊ की दुरून बोलू, डिअर म्हणू की सुजित ,
नाही नको काहीच 
फक्त happy birthday म्हणू उगाच नको काही पण, 

तो जवळ येत म्हणाला 
ओ मॅडम बोला ना, 

मी गोधळून, happy birthday 

तो Thanks 
फक्त यासाठी बोलवले का???
तो माझ्या हातातील बॉक्स कडे बघत म्हणाला, 
हो,,,,...........
नाही ...........
मी पुन्हा गोधळले,
जाऊ दे काही बोलण्यापेक्षा कृती करू, 
मी बॉक्स पुढे केला, 
तेवढ्यात त्याचे मित्र आले, 
त्याने तो घाईत घेतला व निघून गेला, 

मी आपली थांबले एका बाजूला, 
हळू हळू सगळे येत होते, प्रत्येकजण आपापल्या मित्रमंडळी मध्ये व्यस्त होता 
सुजित चे तर विचारू नको .......
तेवढ्यात कुणीतरी म्हणे 
घे केक कापून, 
सुजित कुठे आहे, 

दीपिका सोबत आहे वरती, 
येतोय, गर्दीतून दुसरा म्हणाला, 

दीपिका ,,,,कोण असेल ही 
व वरती काय करते, 
जाऊन बघू का मी 
माझा शर्ट घातला असेल का त्याने 
काय करावं काही कळेना, 
हजार प्रश्न व मनात उडालेला गोधळ तसाच मुठीत धरून मी उभी राहिली कोपऱ्यात, 
तितक्यात  एक मुलगी त्याच्या हातात हात देऊन
त्याला घेऊन येताना दिसली, 

डोक्यात मुंग्या आल्या,
माझ्या सहनशक्ती पलीकडले होतं ते, 
सगळ्यांनी केक कापला,
 तो आवाज, त्या मुलीचे हसणे, सारखे सारखे सुजित ला स्पर्श करणे माझ्या काळजावर जखमा करत होते, 
केक कापून झाला, एकमेकांना भरवून देखील झाला, 
फुगे फुटले टाळ्या वाजल्या, 
सगळीकडे आनंदी आनंद झाला,माझे हृदय मात्र रडत होते डोळ्यांची साथ न घेता, 

माझा शर्ट आवडला नसेल का????
त्याने का घातला नसेल, 
तितक्यात एक जण म्हणे शर्ट भरीईईईईई दिसतोय, 
मग गिफ्ट कुणी केलाय 
दीपिका म्हणाली, 

तूच भारी आहे मग तुझी चॉईस पण भारीच असेल ना, तो म्हणाला 

हे ऐकताच मी जवळचा फ्लॉवर पॉट हाताने घट्ट धरला
इतका घट्ट की हाताला जखम झाली, 
याचे भानही नव्हते मला, 


आता माझ्या मानसोबत 
शरीर सुद्धा दुःखी झाले होते 

मी मनातून खुप दुखावले गेले, 
कुणाला काहीही न सांगता तिथून निघून आले, 
रस्त्याने चालताना विचार करू लागले, 
मी कुठे चुकले, 
त्याच्यासाठी जागन, 
त्याची काळजी करणं 
त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य यावं व कारण मी असावं यासाठी जीवाचे रान करणं, 
त्याची वेड्यासारखी वाट बघणं, 
(मग ती रविवारी असो की मोबाईल वर)

त्याला खरच कळतं नसेल 
का????
 माझ्या मनातील प्रेम,
 माझ्या भावना,
माझी ओढ व मला लागलेले त्याचे वेड, 

सगळं काही निरुतरीत होतं 

मी दुःखी मन घेऊन हॉस्टेल ला आले, 
ज्या उत्साहाने गेले होते तो तिथेच हरवला त्या दीपिका भोवती,

या सगळ्या धावपळीत मी उपाशीच होते सकाळपासून 
आणि आता जेवणाची ईच्छा उरली कुठे होती, 
पोट भरलं होत 
स्वतः च्या हाताने स्वतः चा खेळ करून, 
माझ्या प्रत्येक कृती चा पश्चात्ताप होत होता मला, 

त्याला तरी का दोष देऊ 
तो कधीच बोलला नाही माझ्यासाठी हे कर किंवा ते कर, व त्याने कधी काही केलं देखील नाही माझ्यासाठी, 
मीच आपली त्याच्या मदत करण्याला वेगळं मानून बसले, 
तो त्याच्या सुरवाती पासूनच दूर होता सुरक्षित अंतर ठेवून चुकले मी होते 
त्याला गृहीत धरून, 

स्वप्नां मी पाहिले, 
त्याच्या जवळ मी गेले, 
त्याच्यासाठी जे नाही ते मी केलं, 
त्याच्यात स्वतः ला मी हरवून बसले, 
त्याच्यावर मी प्रेम केलं, 
माझ्या मूर्खपणा मुळे, 

मग यात त्याचा काय दोष ????
जो अनभिज्ञ आहे या सगळ्यातून , 

सगळं कळतं होत मेंदूला ,
पण मनाचे काय ते तर अडकले होते त्या नाव नसलेल्या नात्यात, 

आता हृदयाला डोळ्यांची देखील साथ मिळाली हाताना तंबी देत मदतीला येऊ नका म्हणून, 

मी मनसोक्त रडत होते त्या नाव नसलेल्या नात्यासाठी, 
वाहणाऱ्या पाण्यासोबत सकाळपासून चा एक एक क्षण वाहवत होते आठवणी प्रमाणे 

प्रेमात नेहमी असे का होते, 
ज्याला खुप जीव लावावा नेमकं तीच व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त दुखावते, 
आपण तिच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच पडते,


तुला खरच जपायचं होत 
खोल काळजात 
पण कस ते कधी 
कळलच  नाही

तुला घट्ट धरून
 ठेवायचं होत हृदयात
पण कस ते उमगलच नाही 

 तुला सामावून 
घ्यायचं होत स्वासात
पण कस ते समजलच नाही 


तुझं च होऊन जगायचं होत 
आयुष्यभर 
पण कस ते उलगडलेच नाही 


 तुला होऊ च द्यायचे नव्हते 
स्वतः पासून कधी दूर 
पण कसे ते मात्र निरुतरीतच राहील, 


चुकले होते मी तुझ्या बाबतीत, 
पण मनाला अजूनही ओढ होती त्या नाव नसलेल्या नात्यांची, 

क्रमशः ...............................

🎭 Series Post

View all