पाहिलं प्रेम (भाग 14) न विसरता येणारी आठवण

Love story

पाहिलं प्रेम (14) 

(माघील भागात आपण पाहिले सुजित व सुनीता बाहेर गेलेले असतात, व आपण आणलेला शर्ट त्याने घातला हे बघून नकळत सुनीता त्याच्या मिठीत सामावली )

आता पुढे ..................

आपण कुणासाठी काही करावं व त्या गोष्टी ची  त्याला जाणीव व्हावी ही भावनाच खुप गोड असते, 
मी आणलेला शर्ट त्यांच्या अंगावर खुलून दिसत होता, 
माझे नकळत जवळ जाणे 
त्यालाही अनपेक्षित होते, 
सुरवातीला तो देखील बावरला पण त्याने सावरले स्वतः ला, 
 पण माझे काय, 
मी तर गुंतले होते त्याच्यात, 
आज पुन्हा त्याच्या प्रेमात पडले होते ते वाढदिवसाचे सर्व विसरून, 
माझे असेच होते क्षणात राग व क्षणात प्रेम, 
मी रागावू च शकत नव्हते त्याच्यावर, 

कुठे हरवलीस, 
त्याने मला हलवत विचारलं, 
कुठे नाही, मी टाळत म्हणाले, 

मग गेला राग, तो म्हणाला, 

असा पण तुझ्यापुढे कुठे टिकतो माझा राग मी मनातल्या मनात म्हणाले, 

नाही रे राग नव्हता आला मला, मी 

हो का , माझ्याकडे बघून सांग बर, तो 

चल निघुयात , मी 

आता का निघुयात, 
माझ्या डोळ्यात बघून म्हण तुला राग आला नव्हता, तो 

याने काय लावलाय हे,
 अजून जास्त वेळ थांबलो तर सगळंच भांड फुटेल, 
त्यापेक्षा काहीतरी सांगून टाकू, असा विचार करून मी बोलू लागले, 

राग तर येणारच ना, 
कुणी आपल्यासाठी इतक्या प्रेमाने काहीतरी करावं व आपल्याला त्याची जाणीव देखील असू नये, 
कुणी कुणासाठी उगाच इतके करत का?????
आपण रागावलो आहोत, दुःखी झालो आहोत हे देखील समोरच्याला समजू नये, व सगळ्यात वाईट म्हणजे कुणाला बोलावून त्याला एकटं सोडणं , 
जे की तू केलंस, माझ्या कुणी ओळखीचे होते का तिथे फक्त तूच होतास ना, मग 
तुला एकदा पण वाटू नये की मी फक्त तुझ्यासाठी आलेय, 
तुला त्याचे भान असू नये, 
मग राग तर येणारच ना, 
व का येऊ नये, 
आपण त्याच व्यक्तीवर रागावतो जी आपली असते, 
आपण त्याच व्यक्ती ला भांडतो जीच्याशिवाय आपण जगू च शकत नाही, 
आपण त्याच व्यक्ती वर लक्ष ठेवतो जीच्याकडून चुका होऊ नये असे आपल्याला वाटते, 
मी बोलत होते व तो ऐकत होता, 

मी शांत झाले तो अजूनही शांत होता, 
आता बोल काहीतरी, 

प्रत्येक भावनेला शब्द असावेच असे नाही काही भावना या समजून घ्यायचा असतात, 
कधी कृतीतून, 
कधी स्पर्शातून , 
कधी सहवासातून 
कधी नजरेतून 
तर कधी अनुभवातून, 
चल निघुयात वेळ आली की सगळं समजेल तुला, 
तो असे बोलून गाडीत जाऊन बसला, 

माझा खुप गोधळ उडाला होता, 
अरे आता तर छान छान, गाणे लावले, माझा शर्ट घालून आला, मला इतक्या दूर घेऊन आला, मिठीत घेतलं, व लगेच दुसऱ्या क्षणाला दूर करून गेला, 
, इतकं परकं करत का कुणी कुणाला, 

याच्या मनात काय चालू असते 
ते कुणीच ओळखू शकत नाही, 
कधी खुप जवळ येतो की लगेच दूर जातो, 
जाऊ दे निघुयात, 

आम्ही पुन्हा गाडीत बसून माघे निघालो, 
मला आनंद मानावा की दुःख तेच कळत नव्हते, 
नेमकं याच प्रेम आहे की नाही हेच कळायला काही मार्ग नाही, 
कालपर्यंत मी मनाला समजावले होते मग आज काय गरज होती याला मला बाहेर घेऊन यायची, 
याला सगळं सोपं वाटत 
पण माझे काय 
माझ्यासाठी खुप अवघड आहे हे सगळं, 
हे याला कळत का नाही,


कधी आयुष्यात येतो, 
कधी निघून जातो, 
जाऊ दे 
आपल्याला माहीत आहे ना 
हा असाच आहे, 

या विचारात माझे होस्टेल आले, 
त्याने हॉस्टेल समोर गाडी थांबवून 
मला फक्त by म्हणून तो निघून गेला, 

काय झाले असेल याला अचानक, 
माझे जवळ जाणे आवडले नसेल का???
माझ्या मनात हजार प्रश्न आले, 
मी रूममध्ये  गेले, 
पण मन कशातच लागत नव्हते, 
असेच दिवसमाघून दिवस जात होते, 
आता आमचे बोलणे हळू हळू कमी होऊ लागले, 
मी अगोदर प्रमाणेच वाट बघायचे 
पण तो वेळ नसल्याचे कारण सांगून टाळायचा, 
काय झाले असेल त्याला, 
हजार वेळा विचारून झाले की स्पस्ट बोल काय झालं ते पण तसेही नाही, 
हसून टाळून घेऊन जायचा, 
आता त्याने स्वतःहून कॉल व मेसेज करणे बंद केले, 
मी केला तरी तो जास्त बोलायचा नाही, 
मग माझी पण चिडचिड व्हायची, मग भांडण मग पुन्हा अबोला, 

व अबोला झाला की तो काही मेसेज करणार नाही हे माहीत असल्यामुळे मी पुन्हा स्वतःहून माघार घ्यायचे, 

पुन्हा तेच वाद, भांडण, अबोला, 
हे सत्र चालूच होते, 


का होत असेल प्रेमात नेहमी असे, 
जे प्रेम करतात तेच खुप भांडतात, 
ज्याच्याशिवाय जगू च शकत नाही नेमकं त्याच व्यक्तीला बोलू शकत नाही, 
सगळे जग सोबत असते पण नेमकं तीच व्यक्ती नसते जी हवी असते, 
होत का तुमच्या सोबत कधी कधी असेही, 

असा एक तरी नंबर मोबाईल मध्ये सेव्ह असतोच 
ज्यावर कधीच कॉल केला जात नाही, 

ना मेसेज येणाची आशा 
ना मेसेज करण्याची ओढ 

तरीही लास्ट सिन चेक केलं जातं रोज, 

दिसते जेव्हा कधी 
ऑनलाईन हे नाव 
वाट बघितली जाते 
ऑफलाईन जाण्याची 
वेळ 


कधी कधी बोट ब्लॉक वर पडते, 
त्यावर घिरट्या घेऊन माघारी फिरते, 


होतं का तुमच्यासोबत कधी असेही, 

क्रमशः ......................


काय होईल सुनिता चे????
काय असेल त्या नात्याचे भविष्य, जाणून घेण्यासाठी सोबत राहा, व मला फॉलो करा,

🎭 Series Post

View all