पाहिलं प्रेम (भाग 15) न विसरता येणारी आठवण

Love story

पहिलं प्रेम (भाग 15)

(माघील भागात आपण पाहिले सुजित व सुनिताचे बोलणे आता कमी कमी होत होते) 

आता पुढे ...................


माहीत नाही का ???
पण त्या दिवशी पासून तो दूरच राहत होता, 
मला अजूनही तितकीच ओढ होती त्याच्या बाबतीत पण तो टाळायचा मला, 

मला खुप आठवण यायची त्याची पण सांगणार कुणाला, 
कारण मी च अडकले होते त्या नाव नसलेल्या नात्यात, 
मी खुप चिडचिड करायला लागले, कुठेच लक्ष लागत नव्हते, 
सारखे त्याच्याशी बोलावं त्याला भेटावं, तो समोर असावा, त्याचा सहवास असावा असे वाटायचं, 
कळायचं की चुकतंय 
पण तरीही करावेसे वाटायचे, 
कळायची की नाहीये माझा त्याच्यावर अधिकार तरीही हक्क गाजवावा वाटायचा, 
त्याला माझ्या या वागण्याचा त्रास होत असेल हेही जाणवायचं पण तरीही मी त्रास द्यायचे, 
मुळात त्याला त्रास देण्यासाठी मी हे सगळं करत नव्हते, 
पण मी देखील मजबूर होते माझ्या हृदयापुढे, 
मला तो सोडून दुसरे कुणी दिसतच नव्हते, 
खरच प्रेम इतके वेदनादायक असते का ओ............
मग जर प्रेम इतके वेदना देत असेल तर लोक का करत असतील प्रेम, 
का गुंतवतात जीव, 
का अडकतो स्वास 
का होतो माणूस वेडापिसा फक्त त्या एका चेहऱ्यासाठी, 

अश्या अनेक प्रश्नांनी मी वेडीपीसी व्हायचे, 
त्याला कॉल करायचे, भांडायचे, पुन्हा सॉरी म्हणायचे, पुन्हा स्वतःहून माघार घेऊन बोलायचे, 
थोडक्यात काय तर मला माझे भानच राहिले नव्हते, 
पण माझ्या अश्या वागण्याला तो देखील कंटाळला असावा, 
आता त्याने प्रतिसाद देणे बंद केले होते.................


आज पुन्हा खुप दिवसांनी त्याचा कॉल आला, 
नंबर बघितला , 
उचलू की नको, 
बघू तरी काय म्हणतो, 
म्हणून मी कॉल उचलला, 

हॅलो , बोल 
आज काशिकाय आठवण झाली 
गरिबांची, 
मी पुन्हा खोचकपने सुरवात केली, 

आठवण येण्यासाठी विसरावे लागते, तो 

(मग विसर ना मला एकदाचे व हो मोकळा, मी तरी सुटेल या त्रासातून, 
सारखी सारखी तुझाच विचार करते, मी मनात म्हणाले, )
ठरवलं की विसरता येत , मी 

कसे ते तरी सांग, तो 

मी खोटं हसून बर सांग, काय म्हणतो, मी 

आज भेटुयात का??
तो, 

आज व का ??
याला का भेटायचे असेल, 
हा असे का करतो, 
अचानक असा तर अचानक तसा, 
हो म्हणू का की नको, 
 नाही म्हणू , 
याचा काही भरोसा नाही रडवेल मला पुन्हा, 

पण मी डोक्याने विचार करत होते व हृदयाने हो म्हणून टाकले, 


ठीक आहे, 
6 ला येतो, 
तयार राहा, तो 

मी फक्त हो म्हणून कॉल ठेऊन दिला, 

आज मला त्याच्या बोलण्यात वेगळेपना, जाणवला होता, 
तो तोडून बोलत होता पण त्या तोडण्यात देखील आपलेपणा होता, 
त्याच्या विचारात माझा दिवस गेला, 
6 वाजले मी आवरून तयार झाले, आज ना कुठली ओढ होती ना तयार होण्याची घाई, मनातून वाटत होतं आज काही तरी संपणार एक तर प्रेम किंवा प्रतीक्षा, 

मी विचारताच होते की तेवढ्यात त्याचा कॉल आला खाली ये, 

मी हो म्हणून 
निघाले, 

गेट वर आले , 
व बघते तर आज पुन्हा मी घेतलेला शर्ट होता, 
का करतो हा असे, का वागतो असा, याच्या अशा वागण्याने मी ओढली जाते यांच्याकडे हे कळत का नाही याला, मी स्वतः वर चिडचिड करत म्हणाले, 

मी माघे बसणार तोच 
समोर बस ना please , 

आज तो खुप वेगळा वाटत होतं मग मी जास्त न ताणता समोर बसले, 

थोडे अंतर गेल्यावर, 
आपण कुठे जातोय, 
मी 

तिथे जिथून सुरवात झाली तो 

आता मला काही कळेना, 
पण गाडी त्या महादेवाच्या मंदिराच्या दिशेने निघाली होती, 
अरे हो हा च तोच रस्ता आहे त्या मंदिराचा, 
याने इकडे का आणले असेल, 
याच्या मनात काही वेगळं तर नाही ना चालू, 
हा असे का म्हणाला जिथून सुरवात झाली????
कशाची सुरवात झाली??

व याला काय संपवायचे आहे आज, 

काही कळेना, 
हिम्मत करून मी म्हणाले, 
सुजित गाडी थांबावं, 
त्याने ऐकले नाही , 
कदाचित तो भानावर च नसेल सध्या, 
पण भानावर नासायला काय झाले, 


जाऊ दे हा असाच आहे, 
आता असा तर नंतर तसा, 
बोलेल स्वतःहून काय चालू आहे मनात व नाही बोलला तर नाही बोलला मला काय त्याचे, 
तसेही यांच्यामुळे मला फक्त त्रास च होतो, 

पण जसे जसे मंदिर जवळ येत होते माझी घालमेल वाढली होती, 
मनात ना ना प्रकारचे प्रश्न येत होते, 
काही लग्न वैगरे करण्याचा किंवा पळून जाण्याचा बेत तर नसेल ना याचा, तसाही त्याचा काही नेम नाही मला, 
तो काही पण करू शकतो, 


पण बाप रे जर खरच तो लग्न करू म्हणाला तर, 
माझी तयारी आहे का???

आतापर्यंत प्रेमाची गाथा गाणारी मी आता एकदम निःशब्द झाले होते, 
की खरच जर याने असे काही विचारले तर आपण तयार आहोत का????

पण आज एक गोस्ट कळली प्रेम करण सोपं असते, 
ते सांगणे देखील, पण निभावणं अवघड, 
माझ्याच मनाच्या प्रश्नोत्तरी मध्ये मी हरले होते,

का कुणावर इतका 
जीव जडावा 
नजरेत सदा फक्त 
तोच दिसावा 


मोहरूनि साऱ्या क्षणांना 
नजरेत तोच असावा
ध्यास फक्त त्याचाच 
सतत जपावा 


हळवे माझे मन 
घेई त्याचा च वेध 
हक्क नसूनही त्याच्यावर 
असे त्याचाच शोध 


हरले होते मी त्याच्या पुढे, 
माझ्या मनाला माझे वागणे पटत नसूनही मी वाहवत होते त्याच्यात, 
आज मला पटले होते की प्रेम करण जस माणसाच्या हातात नसते, तसे ते प्रेम विसरले देखील,

पण मी का विचार करत होते असा, 
तो तर निःशब्द च होता, 
फक्त माझ्या भावनाचा गोधळ माजला होता,

होत का प्रेम तुमच्यासोबत कधी असे, 
आपणच हसतो आपणच रडतो, 
आपणच भांडतो, पुन्हा आपणच बोलतो, 
समोरच्याला गरज नसते आपल्या प्रेमाची की त्यांची पद्धत हीच असते प्रेम व्यक्त करण्याची, 
प्रेम करण ते निभावणं सोपं असत की प्रेम आहे हे माहीत असूनही ते फक्त हृदयात जपणं?????
नावाशिवाय नाते च जोडले जात नाही, मग या नाव नसलेल्या नात्याला अस्तित्व मिळेल का??
काय असेल सुजित च्या मनात लग्न की दुसरे काही, 
देईल तिला आयुषभरासाठी साथ की ठरेल ही भेट शेवटची 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
तुमच्या लाईक व कमेंट्स मुळे लेखकाला प्रोत्साहन मिळाले ते चालू ठेवा 
क्रमशः ........

धन्यवाद

🎭 Series Post

View all