पहिलं प्रेम (भाग 16)
( माघील भागात आपण पाहिले की सुजित व सुनीता महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी निघालेले असतात)
आता पुढे.......
मी माझ्या विचारात होते,
व तिकडे मंदिर आले देखील, चल उतर तो म्हणाला, मी काहीच न बोलता उतरले, चल दर्शन घेऊन येऊ,
असे म्हणून तो चालू लागला,
तो पुढे व मी त्याच्या माघे,
तो पटपट पाऊले टाकत होता व मी हळुवार,
जणू त्याला घाई होती काहीतरी संपवण्याची व मला हा क्षण संपूच नये असे वाटत होते,
आता आमच्या दोघात खुप अंतर पडले,
आज तेलकट झालेल्या पायऱ्यांचे देखील भान नव्हते मला, जणू त्या पायऱ्यांना देखील माझ्या मनाची अवस्था समजली होती व त्या मला सांभाळून पाऊले टाकू देत होत्या,
आज ना कुणाच्या आधाराची गरज वाटत होती ना सहाऱ्याची
जणू खरच शेवट होता कशाचा तरी,
आयुष्याचा की स्वासाचा ????
आम्ही मंदिर गाभाऱ्यात पोहोचलो,
त्याने हात जोडून नमस्कार केला,
आज पूजेच्या ताटाचे ना मला भान होते ना त्याला,
मी देखील फक्त हात जोडून माघारी फिरले,
माझे मन मला कसला तरी संकेत देत होते पण मला तो ऐकायचा च नव्हता,
मी त्याची वाट न बघता,
माघारी फिरले, वाटलं होतं पाठीमाघून आवाज येईल,
पण नेहमीप्रमाणे मी आज देखील चुकले होते त्याच्या बाबतीत,
मी वरती येईपर्यंत माघे वळून देखील पाहिले नाही,
प्रश्न च नव्हता
माघे बघण्याचा व कदाचित आज वाटा देखील वेगवेगळ्या होणार होत्या,
मी वरती येऊन एका झाडाखाली बसले,
खुप वेळा नंतर तो आला,
डोळे थोडे लाल वाटत होते,
अरे याचे डोळे लाल का झाले असेल,
काही गेलं असेल का डोळ्यात,
विचारू का??
नाही नको,
झाले असेल कशाने पण आपल्याला काय करायचं
असा विचार करून मी पुन्हा तशीच बसून राहिले,
आता तो जवळ आला व शेजारी येऊन बसला,
तोही शांत व मी ही शांत,
कोण बोलणार,
नेहमीप्रमाणे मीच बोलते हा विचार करून बोलणार तोच तो बोलू लागला,
मला माहित आहे तुझ्या मनात खुप प्रश्न पडलेत,
मी का असे वागतो??
मी का त्या दिवशी अचानक तुला हॉस्टेल ला नेऊन सोडले??
मी का मनमोकळा व्यक्त होत नाही?
मी का तुला आज पुन्हा बाहेर आणले?
हो ना ??
बाप रे याने तर डायरेक्ट नो बॉल वर सिक्स मारला,
मला पडलेले प्रश्न याला कसे कळले,
हा बोलता झाला एकदाच, म्हणजे आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार तर,
याला माझ्या मनातील प्रश्न कळले, मग भावना देखील कळाली असेल,
प्रेम देखील कळले असेल,
प्रेम कळले असेल या फक्त विचारानेच मी लाजले जर याने आज आपल्यावरील प्रेम कबुल केले तर,
पुन्हा मी वेड्यासारखी विचार करत होते, त्याच्यात वाहवत जाण्यापूर्वी मनाला तंबी देऊन थांबवले, की बघू काय म्हणतो ,
ऐक ना, तो
काय मी
तुला काय वाटते ग माझ्याबद्दल, तो
काय वाटते म्हणजे काही नाही ,मी
हो ...........
तो
हो ,,मी
त्याने माझा हात पकडून त्याच्या डोक्यावर ठेवला,
प्रेम करतेस माझ्यावर??
आता काय बोलणार होते मी,
खोटं तर बोलू शकत नव्हते कारण हात त्याच्या डोक्यावर होता व खर बोलायची हिम्मत नव्हती माझ्यात, कात्रीत अडकले होते मी,
नाही रे तसे काही नाही, खुप उशीर होतोय आपण घरी जाऊयात का??
मी विषय टाळत म्हणाले,
होऊ दे, मला बोलायचे आहे तुझ्याशी,
त्या दिवशीच बोलायचे होते ,
पण हिम्मत नाही झाली माझी, तो
अरे यार म्हणजे हा पण घाबरतो का ??
मी मनातच म्हणाले,
बोल, काय बोलायचे आहे ते
मी त्याला धीर देत म्हणाले,
तू आत्ता बोलणार नाहीस माहीत आहे मला, मीच स्पष्ट बोलतो असे बोलून तो बोलू लागला,
मी लहानपणापासून अभ्यासात हुशार , कॉलेज ला टॉप केलं व व्यवसाय क्षेत्रात आलो,
दिसायला चांगला होतो म्हणून खुप मुली ओळखीच्या होत्या पण फक्त hi, by इतक्याच,
दीपिका माझी बालमैत्रीण पण तिच्याबद्दल कधी काही वाटलंच नाही,
माझे आयुष्य खुप मजेत जात होते, तेव्हा तू आयुष्यात आलीस,
शक्यतो मित्राची बहीण
ही माझी बहिण च असावी
असे वाटत असताना देखील,
मी ओढलो जात होतो तुझ्याकडे,
मी स्वतः ला थांबवले
समजावले ,
तू जबाबदारी आहेस माझी मौका नाही,
माझ्या विश्वासावर तुला पाठवले होते,
पण त्या विश्वासाला तडा जात होता,
कुपणाने शेत खाल्ले असे होऊ नये,
म्हणून मी तुला टाळायला लागलो,
तुझ्याशी बोलणे कमी करू लागलो,
जाणवत होतं माझं दूर जाण तुला त्रासदायक आहे तरीही ते केलं ईच्छा नसताना,
माझ्या वागण्यावर, विचारावर, स्वप्नावर तुझे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले होते,
तुझी ओढ ,
भेटण्यासाठी चाललेली तळमळ, माझी वाट बघत, रुसणं , भांडण, काळजी करण, सगळं कळून न कळल्यासारखे करत होतो मी,
वाढदिवसाच्या दिवशी तू निघून गेलीस, पण माझे मन पण गेले तुझ्यासोबत,
सगळे होते तिथे पण तू नव्हती जी मला सोबत हवी होती,
जेव्हा तू चक्कर येऊन पडलीस ना, तेव्हा कधीच न रडणारा मी पहिल्यांदा रडलो होतो,
तुझं जवळ येणं,
स्पर्श करणं
तुझ्या नजरेतील माझा शोध सगळं कळतं होत ग पण माझ्या काही मर्यादा होत्या ज्या मला कधीच तोंडता नाही आल्या,
तू व्यक्त होऊन जायची पण माझे काय मला काय बोलावे ते पण कळतं नव्हते,
तुझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट देऊ या विचारात् तो होऊनही गेला,
त्या दिवशी तुला बाहेर घेऊन तर गेलो खरा
पण जेव्हा तू मला हग केलंस तेव्हा मनाला खुप वाईट वाटलं यासाठी नाही की मला ते आवडलं नाही यासाठी की मी फसवत तर नाही ना तुला,
तुझ्या भावना माहीत असूनही,
शेवट काय आहे हे माहीत असूनही तुला खोट्या आशेवर ठेवण योग्य आहे का?
जर मी तुला आयुष्यभर साथ देऊ शकत असेल तर च मी पुढे चालावं अन्यथा नाही असे मला वाटते,
कारण प्रेम जेवढे सुखदायक असते त्याचा विरह तेवढाच दुःखदायक असतो, जो मी अनुभवला काही दिवसांपासून,
तो बोलतच होता, व माझे विचार चक्र चालू झाले, काय बोलतोय हा याचे याला तरी कळतंय का??
विरह अनुभवला म्हणजे,
हा प्रेमात पडलाय माझ्या,
अरे देवा किती छान ना ,
मी मनातच नाचू लागले, बागडू लागले,
माझ्यासाठी आज खुप आनंदाचा क्षण होता, प्रेमाची शेवटपर्यंत साथ मिळो न मिळो पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीची पण समान भावना असणे यापेक्षा आनंदाची गोस्ट काय असू शकते,
या क्षणाला मला सर्व सुखे कमी वाटत होते,
त्याच्याबद्दल मनात असलेला गिल्ट , राग कुटच्या कुठे पळून गेला होता,
खरच प्रेम ही भावनाच किती सुंदर असते ना,
दोन जीव एक स्वास
सतत एकमेकांना लागलेला एकमेकांनाचा द्यास
एकमेकांना आपले
मनापासून मानलं जातं
हळुवारपणे जपल
हे प्रेमाचं नातं
नजरेच्या वाटेने तू काळजात
घर करून बसतो
मनाने शोध सुरू होतो
जेव्हा वास्तवात तू
नसतो,
अनुभवलेत का ?
कधी
पहिल्या प्रेमातील दिवस,
एकमेकांसाठी हसणं,
एकमेकांना जपणं,
ती काळजी, तो गाजवलेला हक्क, तो पहिला पाऊस, ती पहिली भेट
दोघेही निःशब्द आणि न पिलेल्या कॉफीचे ते भरलेले बिल
.........
क्रमशः ...............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा