पहिलं प्रेम(भाग 17)
( माघील भागात आपण पाहिले सुजित व सुनीता मंदिरात गेले होते,सुजित पहिल्यांदा व्यक्त झाला होता)
आता पुढे ...........
सुजित पुढे बोलू लागला,
मला तुझं अव्यक्त प्रेम कळतं होत ग पण मी काहीच करू शकत नाही,
एक तर तुला मी सांभाळावे पण इथे उलट होत होते,
जर घरी कळले तर तुझ्या दादा ला काय वाटेल??
तो काय विचार करेल ???
करेल का तो मला माफ,
अरे पण तू इतका टोकाचा विचार का करतोय,
आता तर सुरुवात झाली व तू वेगळं होण्याचं बोलतोय,
मला माझे घरचे माहीत आहेत व दादा पण,
मी माघीतलेली प्रत्येक गोस्ट त्याने मला दिलीये,
तो हिरो आहे माझ्यासाठी,
आणि बाबा चे झाले तर बाबा तुला बघून खुश होतील,
काय नाही तुझ्याकडे सगळं तर आहे,
दिसायला स्मार्ट आहेस,
पैसा, घर, गाडी, सगळं तर आहे,
कुठल्याही वडिलांना तुझ्या सारखा जावई मिळणे भाग्याचे वाटेल बग तू, उलट अनोळखी मुलाच्या हातात हात देण्यापेक्षा तू जास्त परवडशील त्यांना,
मी ठामपणे म्हणत होते,
आज माझं त्यांच्यावरील प्रेम,
त्यांच्यावरील विश्वास,
त्याची ओढ
त्याचा ध्यास
सगळं काही ओसंडून वाहत होतं,
कारणही तसंच होत,
प्रेमाचं प्रतिउत्तर आज प्रेमाने मिळालं होतं,
तुझं सगळं बरोबर आहे, ते देतीलही परवानगी पण माझ्या काही मर्यादा आहेत,
म्हणजे मीच स्वतः ला काही नियम व मर्यादा घालून दिल्या आहेत,
तो म्हणाला
हे बग तुझ्या मनात जे काही असेल,
किंवा तुझा निर्णय जो काही असेल तो स्पष्ट सांग मी आनंदाने स्वीकारेल , पण बोल एकदा मनातलं please
ऐक तर मग
मी खुप लहान होतो तेव्हा बाबा वारले, वडिलांचे छत्र काय असते हे अनुभवण्यापूर्वी च मी पोरका झालो, मग मामा नि आई ला सावरलं माझं शिक्षण, संगोपन सगळं मामा नि केलं,
मामा नि मला कधीच काही कमी पडू दिले नाही,
एक वर्षांपूर्वी मामा चा अपघात झाला, तेव्हा पासून मला अंथरुणात खिळून आहे,
घरातील कर्ता पुरुष असा निराधार झाल्यामुळे घर पूर्ण कोलमडून पडले,
मामा ला चार मुली आहेत
तीन हुशार आहेत पण सर्वात लहान दिसायला थोडी डावी व थोडी चालताना लचकते,
तिघीचे लग्न चांगल्या घरात झालेत पण लहाणीला कुणी करत नाहीये, आई ला वाटते मामा चे खुप उपकार आहेत त्यामुळे एक तर त्यांचीच मुलगी करावी किंवा त्यांच्या पसंतीची,
माझा नाईलाज आहे ग,
एक तर मामा चा शब्द मोडू शकत नाही व दुसरीकडे आई ची माया, माझ्याकडे जे आहे ते सगळं मामा मुळे मिळालंय,
माझा स्वतः चे निर्णय नाही घेऊ शकत मी,
किती कमनशिबी आहे बग ना मी
ज्यामुलींवर जीवापाड प्रेम करतो तिला सांगू ही शकत नाही व स्वीकारू देखील शकत नाही,
किती बर झालं असत ना
प्रत्येक गोस्ट आपल्या मनाप्रमाणे झाली असती तर ,
प्रेम व्यक्त करून , रडणं व मोकळे होणं एक वेळ बर या फक्त आठवणीत झुरण्या पेक्षा ,
पण माझ्या नशिबात तर ते सुख देखील नाही,
तो बोलत होता व माझ्या डोळ्यात फक्त पाणी होते,
काय रे देवा का माझ्याच वाट्याला हे आणलं,
जर नव्हतं आयुष्यभर सोबत ठेवायचं तर मग आयुष्यात तरी का आणलं,
मी माझी सुखात होते ना
ना कुणाची आस ,
ना कुणाची ओढ
ना कुणाची आठवण
ना कुणाची प्रतीक्षा
ना कुणासाठी तळमळ
ना कुणासाठी झुरने
मग का शिकवले मला प्रेम करायला, का शिकवले जगायला, का ??
का???
का ???
आज माझ्या कुठल्याच
का चे कुणाकडेच उत्तर नसावे ना त्याच्याकडे ना तुझ्याकडे,
खुप अवघड असते रे एखाद्द्यामध्ये
अडकलेला जीव काढणे, एखाद्याची आठवण विसरणे, एखाद्याला दूर करणे,
तुझं काय रे तू तर देव आहेस,
तुला कसले आले काळीज
तुला कसल्या आल्या भावना
पण आम्ही माणसे आहोत माणसे, आम्ही तुटतो, आम्ही रडतो, आम्ही कोसळतो, कोलमडून पडतो रे कायमचे,
पण तू एक गोस्ट लक्षात ठेव
जर तुला नसेल ना कुणाची साथ बघवत तर त्यांना एकमेकांच्या आयुष्यात देखील आणत जाऊ नकोस,
नको खेळत जाऊ रे असे खेळ, नको मांडत जाऊ असे घडीचे डाव,
कारण तुझा खेळ होतो रे पण आमचे आयुष्य होरपळून निघते त्यात,
त्याच काय ???
तू बसतो मंदिरात निर्गुण, निर्विकार, दगडात अस्तित्व शोधत ,
पण आम्ही हाडामांसाचे माणसे आहोत,
अरे साधे खरचटले जरी तरी डोळ्यातून अश्रू येतात इथे तर काळजाचे च तुकडे केलेस तू,
मी भांडत होते त्या आतल्या दगडाशी जो महादेवाच्या रूपाने बसला होता,
त्याला कदाचित माझा आवाज कानावर पडला नाही तरी चालेल पण माझ्या हृदयाची हाक नक्कीच ऐकू जाईल हा विश्वास होता मला,
मीच तुटलेली होते व सुजित ला काय आधार देणार होते,
हा दिवस आयुष्यात येईल असे वाटत होते पण इतक्या लवकरच येईल असे नव्हते वाटत,
सुरू होण्यापूर्वी संपलं होतं सगळं,
किती कठीण होऊन बसते ना जेव्हा निर्णायक वेळ येते,
प्रेमात दुरावा कुठल्याही कारणाने येतो,
चटके तर दोघांनाही बसतात,
प्रेम करण सोपं,
निभावणं सोपं
पण विसरणं महा कठीण होऊन बसत,
सतत वाहणारे डोळे, आठवणीने व्याकुळ झालेले मन, साधा चेहरा देखील बघू शकत नाही अशी झालेली अवस्था माणसाला जिवंतपणी मारते,
प्रेमात हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेथून सुरू होतात दोन प्रवास,
वाट बदलते,
मार्ग बदलतात,
अनोळखी चेहरे सोबतीला घेऊन
आयुष्यात देखील सुरू होते
पण मनाचे काय ते तर अजूनही तिथेच असते त्या जुन्या वाटेवर,
कुणाच्या तरी शोधत,
संपत असेल का हा शोध आयुष्यात कुठल्यातरी वळणावर की संपतो शेवटच्या स्वासाबरोबर च,
काय असेल सुनीता च्या मनात,
करेल सुजित च्या निर्णयाचा स्वीकार की वाढेल प्रेमा बद्दल तिरस्कार,
जाणून घेण्यासाठी सोबत राहा,
व भरपूर लाईक व कॅमेन्ट करा,
मी वाट बघते आपल्या प्रतिसादाची ,
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा