पाहिलं प्रेम (भाग 2) न विसरता येणारी आठवण

A love story

पाहिलं प्रेम (भाग 2)

माघील भागात आपण पाहिले दिव्या च्या बाबा नि तिच्या जोरात कानामाघे मारली 
आता पुढे ..........

बाबांनी कानाखाली मारताच तिच्या कानातून रक्त वाहू लागले. 


मी घाबरले,
जोरात ओरडले, माझ्यातली आई कासावीस झाली तिचे लेकरू संकटात होते म्हणून मग समोर बाप का असेना.
मी पळत जाऊन दिव्या ला मिठी मारली, 

मारून टाकता का लेकराला???
मी ओरडून यांना म्हणाले.

मेली तरी चालेल 
नाक कापण्यापेक्षा 
रमाकांत ओरडले.

तुम्ही जा बघू रूम मध्ये,
मी सांभाळून घेते
त्यांना रूम मध्ये पाठवून 
मी दिव्या ला सांभाळले, 
तोपर्यंत खुप रक्त गेलं होतं 
पण दिव्या अजूनही शांत होती.
जणू तिला त्या जखमेचे भान च नव्हते 

दिव्या व रमाकांत दोघेही आपापल्या रूम मध्ये जाऊन खुप वेळ झाला होता.
 मनात खुप शंका कुशंकांनी घर केले होते. 

माझे दिव्या शी बोलणे खुप गरजेचे होते 
कारण कुणासमोर ती तिचे मन मोकळे करेल असे दुसरे कुणी घरात नव्हते. 
पण तिच्या रूम कडे जाण्याची माझी हिम्मत होत नव्हती. 
कारण रमाकांत ने (आई) ना सर्व घडला 
प्रकार सांगितला होता.
आई नि न्यायाधीश बनून तिचा निकाल देखील दिला होता.

मान्य आहे ती चुकली पण ही वेळ तिच्या चुका दाखवण्याची नव्हती
 तिला समजून घेण्याची होती. 

तिचे वय कोवळं आहे मनाप्रमाणे 
आता च जर तिला योग्य आधार मिळाला तर ती चुकीचे पाऊल उचलणार नाही किंवा तिला तिच्या कृत्या चा पाश्छताप देखील होईल व ती कायमची सावरेल यातून 
आणि
 जर आज आम्ही तिची ही अवस्था हाताळताना 
कुठे कमी पडलो तर तिला कायमचे गमावून बसु. 

पण हे सगळं मला कळत होतं 
घरच्यांना कोण समजावून सांगेल 
ते तर तिला आरोपी मानून बसले होते 

त्यांना तिच्या मनाचे 
तिच्या प्रेमाचे 
तिच्या भावनांचे 
तिच्या वयाचे 
तिच्या अवस्थेचे 
काही देणं घेणं नव्हतं 
फक्त ती चुकली इतकच ते मान्य करत होते 

पण आज जर आई ची मुलगी अशी वागली असती तर आई ची हीच प्रतिक्रिया असती का ???

या विचाराने मन हेलावत होते.


दिवे लागणीची वेळ जवळ आली 
आज कुणी अन्नाला शिवले देखील नव्हते 
मी दिवे लावले 
व दिव्या च्या रूम कडे निघाले 
अर्ध्या रस्त्यात गेले तोच आई समोरून आल्या.

कुठे निघालीस ग, 

ते दिव्या ......
बघून येते 
मी घाबरत म्हणाले 

काही गरज नाही 
मरणार नाही ती तू गेली नाही तर 
आई रागात म्हणाल्या

आई चा राग मान्य होता 
त्या चिडणे स्वाभाविक होत, 
पण माझं पण आई च मन होत ना 
कस सोडू माझ्या पाखराला एकटं 
मुळात हे वयच अस असतं ज्यात पाऊले चुकतातच, 
पण त्यांना समजावून योग्य मार्गावर आणणे आपले काम असते,
ते बालिश असतात आपण नाही 
पण माझ्या मनाची व्यथा सांगू कुणाला 
मला तर दिव्या शी नीट बोलता देखील आले नाही म्हणजे बोलूच दिले नाही आई व यांनी, 
काय करत असेल ती ???
काही चुकीचे पाऊल उचलले तर 
नाही ,नाही ,
मला जावेच लागेल
 मी पुन्हां तिच्या रूम कडे निघाले 
तर पाठीमाघून आवाज आला 
आज काय उपवास घडवणार वाटते तुम्ही सगळ्या घराला. 
मी घाबरून माघे बघितले तर रमाकांत होते जरा जेवणाचे बघा 
भूक लागलीये 

हो बघते, 
मी मान खाली घालून निघून गेले.
मी शरीराने किचन मध्ये होते पण मनाने दिव्याकडे.

सतत तिचाच विचार होता मणी 
पोरीने काही चुकीचे केलं तर 

मी कसाबसा स्वयंपाक केला 
सर्वांसाठी जेवणाचे ताट लावले 
तेवढ्यात रमाकांत म्हणाले 
दिव्या चे ताट तिच्या रूम मध्ये दे आजपासून ती खोली च तिचे विश्व असेल 

काय ........
काय बोलताय कळतंय का????
अहो एकदा तिला नीट विचारून तरी घेऊ 
समजावून सांगू, 

कोवळं वय आहे 
काही बर वाईट केलं मग 

तिला तिची चूक समजेल 
इतके कठोर नका वागू 


इतका मोठा निर्णय तुम्ही एकटयाने घेणार 
अहो थोडा तरी विचार करा लहान आहे ती 
मी बोलतच होते तर मधेच आई कडाडल्या 

कळतंय का ??
बग रमा आता ही तुला शिकवणार 
व मी अजून जिवंत आहे निर्णय देण्यासाठी त्याचा एकटया चा निर्णय नाही तो,
आणि काय ग 
लहान आहे म्हणतेय 
तिच्या वयात होते तेव्हा मला दोन मुलं झाली होती 
तेच चांगलं होत 
 

ऐक रमा 
तिला काय बुक शिकायची आहेत ती घरून शिकव 
आणि जर नसेल शिकायचे तर टाक भाजून (भाजून म्हणजे त्यांच्या वेळी लग्न करण्याला म्हणत असे)

माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले 
एकीकडे लेकीची माया तर दुसरीकडे बंधने 
एकीकडे पतीचा अभिमान  तर दुसरीकडे स्वतः चा स्वाभिमान 
काय जपावं 
आणि काय विसराव
हा मोठा प्रश्न होता माझ्या समोर 

क्रमशः .............


जेव्हा पाहिलं प्रेम घरात माहीत होतं तेव्हा पहिला परिणाम होतो शिक्षणावर, अनेक बंधने लावली जातात, 
पण ही बंधने अडवू शकतील का मनातील भावना 
काय असेल दिव्या चे भविष्य लग्न की शिक्षण जाऊन घेण्यासाठी सोबत राहा व मला फॉलो करा 

धन्यवाद

🎭 Series Post

View all