पहिलं प्रेम (भाग 20)
(माघील भागात आपण पाहिले सुजित सुनीता ला हॉस्टेल ला सोडून निघून जातो)
आता पुढे ..........
त्याच्या आठवणीत मला कधी झोप लागली माझे मलाच कळले नाही,
आता आमचे रोज बोलणे होते होते,फक्त रविवारी भेटणारे आम्ही आता आठवड्यात दोन वेळा भेटू लागलो,
माझा प्रत्येक हट्ट तो पुरवायचा,
पण ना त्याने कधी मर्यादा ओलांडली ना मला ओलांडू दिली,
माझे कॉलेज, क्लास, प्रॅक्टिकल, अभ्यास सगळं सुरळीत चालू झाले होते,
असेच एक दिवस
कॉलेज लवकर सुटले म्हणून
मी एका मैत्रिणी ची गाडी घेऊन हॉस्टेल ला येत होते,
थोडा थोडा पाऊस येत होता, मस्त तो गार वारा,
त्यात अंगावर पडणारे ते पावसाचे थेंब मनासोबत शरीराला देखील मोहून टाकत होते,
मी व माझी मैत्रीण
मस्त गप्पा मारत चालतो होतो, अचानक माझे गाडीवरील नियंत्रण सुटले व आम्ही खाली पडलो,
मैत्रिणीला जास्त लागले नाही
पण माझा हात मोडला,
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये भर्ती केले,
यांच्या नातेवाईकांना बोलावून घ्या
असा डॉक्टर ने निरोप दिला,
आम्ही दोघी ही घाबरलो आता करायचे काय,
मॅडम ला कसेही सांभाळून घेऊ पण आता डॉक्टर ला काय सांगू,
मग मला सुजित आठवला,
मी त्याला कॉल केला व घडलेला प्रकार सांगितला,
क्षणाचाही विलंब न करता तो हॉस्पिटल ला आला,
हॉस्पिटल मधील नर्स ने हजार प्रश्न विचारून त्याचे डोके खाल्ले
त्याचा वैतागलेला चेहरा च सगळं सांगून जात होता, शेवटी या कठीण प्रसंगात देखील त्याने माझी साथ सोडली नाही,
यांना हॉस्टेल ला पाठवू नका घरी घेऊन जा,
नर्स च्या या बोलण्याने मी गोधळात पडले,
आता घरी जायचे म्हणल्यावर
दादा ओरडणार,
आई बाबा ना काय सांगू,
आणि अभ्यास बुडेल ते वेगळंच,
आता काय करावं,
नाही नको जास्त नाही मार
मी थांबेल होस्टेलवर
व काही लागले ते हॉस्पिटलमध्ये कॉल करेल,
मी म्हणाले,
नाही नाही
मग इथे ऍडमिट राहा,
नर्स
अरे देवा ही काय ऐकत नाही आता, मी
चालेल , आम्ही घरीच जाऊ,
सुजित
याला काय जाते घरी जाऊ सांगायला,
सामोरे मला जावे लागेल घरच्यांना, मी मनात म्हणाले,
आम्ही हॉस्पिटल मधून बाहेर आलो,
तुझ्या मैत्रीनिला होस्टेलवर सोडून, तुझे सामान घेऊ व माझ्या घरी जाऊ चालेल ना , सुजित
हा डोक्यावर पडलाय का??
एक तर मैत्रिणी समोर मी जास्त बोलू पण शकत नाही,
दादा चा मित्र आहे म्हणून सांगितलंय
व घरी कशाला नेतो मला,
कसे सांगू याला, मी मनातच म्हणत होते,
त्याने गाडी हॉस्टेल समोर आणली,
माझे हॉस्टेलमधून सामान मैत्रीनि ला सोडून आम्ही निघालो,
मला माहित आहे तुझ्या मनात हजार प्रश्न आहेत,
पण घरी कॉल करून सांगितले आहे तुला थोडे लागले म्हणून व आराम मिळावा व काळजी घेता येईल म्हणून माझ्या घरी घेऊन जातोय,
आणी हो आई ला देखील पूर्वकल्पना दिलेली आहे
त्यामुळे आता चेहऱ्यावरील हे प्रश्नचिन्ह दूर केले तरी चालतील ,
तो हसत म्हणाला,
आता माझ्या जीवात जीव आला म्हणजे याला कळते तर माझे मन मी म्हणाले,
आज पुन्हा त्याच्या घरी जाणार होते, पण अगोदर ची भेट व आजची यात फरक होता,
माझ्या मनानेच त्याला आपले मानून त्याची माणसे व त्याचे घर देखील मला आपले वाटत होते,
त्याचे घर आले
मी उतरणार तोच त्याची आई हातात काहीतरी घेऊन आली
त्यांनी ते माझ्यावरून ओवाळून एका बाजूला फेकून दिल,
त्यांनी ते काळजी पोटी केलं होतं,
पण दरवाजात उभा आम्ही दोघे,
त्यांनी ओवाळलेलं
आणि तो माझ्या सोबत उभा आहे याची जाणीव,
हा क्षण माझ्या हृदयावर कोरला गेला होता,
जो विचार कधी स्वप्नात देखील केला नाही
ते आज वास्तव होतं,
होत का?
प्रेमात कधी असं
ज्याचा आपण कधी विचार देखील करत नाही ते अनुभववायला मिळते,
उदा: वाढदिवसाला मिळालेलं ते सरप्राईज गिफ्ट असो की
योगायोगाने जुळून आलेला तो रंगाचा योग असो
प्रेमात मिळालेलं प्रत्येक सरप्राईज
हे अनमोल च असते त्या नात्या प्रमाणे,
सुनीताला मिळेलल हे सरप्राईज ठरेल का तिच्यासाठी तिच्या स्वप्नपूर्ती चा योग
जाणून घेण्यासाठी सोबत राहा,
लाईक करा,
कथा कशी वाटली नक्की कळवा
व फॉलो करा,
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा