Login

पाहिलं प्रेम (भाग 23) न विसरता येणारी आठवण

Love

पहिलं प्रेम ( भाग 23) 

( माघील भागात आपण पाहिले सुनीता व सुजित रात्री बाहेर गेले होते फिरण्यासाठी) 

आता पुढे ...............

त्या दुरून दिसणाऱ्या दिव्याकडे मी बघतच राहिले, 
खुप सुंदर होते ते, 
त्यांचे रंग तर मोहून टाकणारे होते, 
आमची बाईक जशी जशी जवळ जात होती तसे तसे ते दृश्य अजून मोहिनी घालत होते, 


अरे हे काय तिकडे तर लोक पण 
दिसताय,
 कोण ?????~
असेल ते लोक 
व इतक्या रात्री तिथे काय करताय, 
मी मनाशी च म्हणाले, 
इथे सुजित ला काही विचारायची सोय कुठे होती, 
पुन्हा उडवली असती माझी त्याने, 
म्हणून मी गप्प राहिले, 


आता आम्ही खुप जवळ आलो होतो, 
त्याने गाडी साईड ला घेतली व उतर म्हणाला, 


मी भान हरवून बघत होते त्या दिव्याकडे 

अरे उतर ,
तो पुन्हा म्हणाला, 

मग भानावर येत हो उतरते म्हणून मी खाली उतरले, 

तो बाईक लावून आला व चल म्हणाला, 

खुप लोक दिसत होते, 
मी जागेवरून हलेना हे कळताच 
त्याने हात पकडला , 
मी आहे ना चल, म्हणाला 

मी त्याचा सोबत चालू लागले, माझ्यासोबत ती झाडे देखील चालू लागली जी सुशोभित केली होती लायटिंग ने, 

आम्ही एका टेबलावर जाऊन बसलो, 
तो टेबल देखील शुभोभीत केलेला होता, 
तिथे एक व्यक्ती आली व तिने सुन्दर गुच्छ माझ्या हातात दिला, 

Welcome mam 

म्हणत तो निघूनही गेला, 


मी तो गुच्छ हातात घेतला 
आणि त्यात काहितरी होते, 
अरे काय आहे हे, 
अरे वा गिफ्ट 
मी लगेच ओरडले अरे त्यांनी मला गिफ्ट दिलंय किती मस्त ना....

मी उघडून बघू का???

त्याने फक्त मानेने हो असा ईशारा केला, 

मी गिफ्ट उघडले 
त्यात घड्याळ होते, 
इतके महाग घड्याळ मी पुन्हा म्हणाले, 
काय हे लोक पण असे कुणी देत का कुणाला पण काही, 
आपल्या व्यवसायाची पब्लिसिटी कशी करावी हे यांच्या कडून शिकावं, 
माझा तोंडाचा पट्टा चालूच होता, 

तितक्यात माझे लक्ष त्यात असलेल्या कागदावर गेलं 

काय असेल त्यावर म्हणून मी कागद उघडला, 

प्रिया सुनीता, 
माझे नाव कसे माहीत यांना मी पुन्हा म्हणाले, 
तो फक्त बघत होता माझ्या ओसंडून आनंद वाहणाऱ्या चेहऱ्याकडे, 

मी पुन्हा वाचू लागले, 

प्रिय सुनीता, 

राज ये मोहब्बत 
किसीं को ना बताना 

हो अगर आँखो मे आसू
तो उन्हे पलको मे छिपाणा 

भुलना पडे ईस रिषते 
को मजबुरी मे 
तो हमे भुलाना 

मा बाप की बात मानकर 
बेठी होणे का फर्ज निभाना। 

तुझाच सुजित 


निभाना पर्यंत सगळं ठीक होत पण तुझाच सुजित ने कोसळले मी , 

हा दूर तर जाणार नाही ना?? 

तरीही याच्या डोक्यात काहितरी चाललंय हे मला जाणवत होतं 
पण काय ते अजूनही कळेना 
पण आता थोडं थोडं उलगडू लागलं होतं, 


नक्कीच काहितरी झालंय,

माझा चेहरा बघून तो म्हणाला 
आवडलं नाही का गिफ्ट , 


तू दिलंय ना हे, मी 

हो , मग काय ते लोक देत असतात का हे सगळं मीच केलंय तुझ्यासाठी, तो 


मग इतकं सगळं केलं होतंस मग या ओळी का लिहल्यास 
त्या वगळता नसत्या आल्या का?? 
मी 

नसत्या आल्या, 
आपल्या नात्याची ईमारत ज्या विटेवर उभा आहे ना ती वीट आहे ही असे समज, 
या नंतर आयुष्यात कधीही मी व घरचे निवडायची वेळ तुझ्यावर आली तर या ओळी वाच तुला निर्णय घेण्याची ताकद मिळेल, समजलं तो 

मी हो म्हणाले, अश्या रोमँटिक जागेवर आणून यानें पुन्हा उपदेशाचे डोस पाजले होते, 
पण जाऊ दे ना , 
त्याची साथ, 
हे मनमोहन दृश्य 
डोळ्याचे पारणे फेडणारे ते रंगीबेरंगी दिवे, 
याचा आनंद घेऊ, 
तसेही आपण ठरवलंय हे क्षण मनसोक्त जगायचे बाकी नंतर काहीही होऊ, 

चल तिकडे जाऊयात असे म्हणून  तो हिरव्यागार लॉन वर घेऊन गेला, हातात कॉफी सोबत तो दूरवर पसरलेला अंधार व आमच्यावर पडणारे ते रंगीबेरंगी लाईट, जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त करून देत होते, 

या नंतर मी जेव्हा कधी लाईट बघेल तेव्हा नक्कीच तुझी आठवण येईल, 

Thank you so much 

माझे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी 

मी मनातल्या मनात म्हणत होते, 

प्रेमात किती खुणा जपल्या जातात ना, मग ती पहिल्या भेटीची तारिख असो की  प्रेम व्यक्त केल्याची तारीख 
तशीच जपून राहते हृदयात, 

सोबत कॉफी घेतलेलं कॉफीशॉप  असो की मूव्ही बघितलेले थेटर, 


ड्रेसचा रंग असो की भेटीचे ठिकाण, 
माणूस आयुष्यात कधीच विसरत नाही, 

काय असेल सुजित च्या मनात, 
त्या ओळी पुन्हा एकदा वाचून कश्या वाटल्या नक्की सांगा,

पहिलं प्रेम अनुभवत जगण्यासाठी, 
वाचत रहा पहिलं प्रेम, 

धन्यवाद

🎭 Series Post

View all