पहिलं प्रेम (भाग 25)
(माघील भागात आपण पाहिले सुजित व सुनीता लॉन वर फिरत असतात)
आता पुढे .............
सुजित तिला डोळ्यातील पाण्याचे प्रकार सांगत होता, त्याला वेगळं काहितरी बोलायचं होत पण सुचत नव्हते म्हणून त्याने मोर्च्या पाण्याकडे वळवला, आज तो व्यक्त होत होता तिच्याकडे पण ते तिलाच कळतं नव्हतं,
काय झालंय यार याला आज,
हा असे काय बोलतोय माझे तर डोके च काम करेना, असा विचार करून
चल निघुयात का ???
मी म्हणाले,
का???
आताच तर आलोय , आणि पूर्ण रात्र थांबणार आहोत इथे,
त्यामुळे निवांत राहा,
तुला माहीत आहे आम्ही जेव्हा कॉलेज ला होतो ना तेव्हा नेहमी यायचे, खुप वेळ थांबायचो,
इथले वातावरण, लोक, तो प्रकाश ओळखीचा झालाय आता
आमचा पूर्ण ग्रुप असायचा,
खुप मजा करायचो,
तो
त्यात दीपिका देखील होती का ??
मी
अरे देवा, तुझ्या डोक्यातून अजून ते भूत गेलं नाही का???
अग एखादी व्यक्ती दिसायला आवडणं वेगळं ते फक्त आकर्षक असत पण एखादी व्यक्ती सतत सोबत हवीशी वाटण, तिचा भास होन, तिचा सहवासात , आपुलकी, जाणवन म्हणजे प्रेम,
जे गर्दीत ही एकटं करून जात ते प्रेम व जे एकटं असताना भावनांची गर्दी करून जात ते प्रेम, जर तू स्वतः ला तिच्या सोबत कॅम्पेअर करत असेल तर ते अगोदर बंद कर,
तो
बर बर तुझं प्रेम पुराण झालं का??
आता कुठे जाणार आहोत का आपण की इथेच राहणार सकाळपर्यंत, मी
तुला जर बोर होत असेल तर
तू जा,
सॉरी तू एकटी कशी जाणार ना चल मी नेऊन सोडतो तुला,
तो रागात म्हणाला
अरे तसे नाही, पण मग तू सारखे सारखे शेवट, निरोप असे नको ना बोलू , मी म्हणाले,
Ok आता मी पुन्हा तो शब्द घेणार नाही,तो म्हणाला
आम्ही दोघांनी खुप गप्पा मारल्या, आज जग जिंकले होते मी,
सकाळ होणार होती आता,
चल निघुयात, तो
आता कुठे घरी का??
मी
नाही, चल तर, तो
चल तर चल मी निघाले त्याच्या सोबत,
कुठे जात असेल हा, नाही नको तू काही तर्क लावू नको पुन्हा चुकला तर खुप त्रास होतो मग,
मी मनाला समजावले,
त्याने बाईक, बीच वर आणून उभा केली,
पाण्यापासून थोडे दूर होतो आम्ही,
तो मुद्दाम पुढे चालतोय माझ्या असे जाणवले मला,
त्याच्या उमटलेल्या पाऊल खुणावर मी पाऊले टाकत हळूहळू चालले, होते, मी पायाने चालत होते व मनाने विचार करत होते,
अरे हा आता आठवलं
मीच म्हणाले होते,
माझे खुप स्वप्न अपूर्ण आहेत
मला ते क्षण तुझ्यासोबत जगायचेत, मला त्या निळ्या आकाशाखाली बसून तारे मोजायचे आहेत,
मला एक पूर्ण रात्र तुझ्यासोबत घालवायची आहे जिथे कुणीच नसेल तू व मी सोडून,
मला त्या मऊमऊ वाळूतून चालायचे आहे तुझ्या पाऊल खुणावर पाऊले टाकत,
मला तुला व्यक्त होताना बघायचंय माझ्या प्रेमात,
म्हणजे हे सगळं त्याने माझ्यासाठी केलं,
किती विचार करतो ना
हा माझा,
मी सहज म्हणाले व त्याने ते सत्यात देखील उतरवले ,
आणि मी किती मूर्ख माझ्या आता लक्षात आले,
आता तो खुप अंतर पार करून गेला होता, मी फक्त बघत उभा होते त्याला,
डोळ्यातून अश्रू ओघळू लागले व मग मला कळले की खरच प्रत्येक अश्रू दुःखदायक असतात असे नाही, काही मोत्याप्रमाणे असतात जे जपून ठेवावे वाटतात,
आज त्याच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडले होते,
खरच प्रेमात व्यक्ती प्रेमापोटी काहीही करायला तयार होतो???
समोरच्याला जाणवू न देता त्याच्यासाठी काही करणे हे किती सुखावह असते ना??
प्रेम च माणसाला सगळं शिकते,
करायला ही आणि टिकवायला ही,
कसा असेल यांच्या प्रेमाने शिकवलेला नात्याचा शेवट,
जाणून घेण्यासाठी सोबत राहा,
क्रमशः ............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा