पहिलं प्रेम (भाग 27) न विसरता येणारी आठवण

Love

पहिलं प्रेम (भाग 27) 

( माघील भागात आपण पाहिले सुजित सुनीता ला घरी सोडण्यासाठी येत होता ) 

आता पुढे ..........

तो मला घरी सोडण्यासाठी येत होता व मी गुंतले होते विचारात, 

आम्ही घरी पोहोचलो 
घरी पूर्ण तयारी झाली होती, 
आम्ही पोचताच सगळ्यांनी माझ्या भोवती गर्दी केली, 
त्यांच्या आनंदाचा पारावर उरला नव्हता, 
जसे मुलगा बघायला नाही लग्नच
करायला येणार आहे , 
त्या सर्वांना कट मारून मी सुजित ला शोधू लागले, 
पण तो कुठेच दिसत नव्हता, 
मी खुप शोधले शेवटी 
दादा ला विचारलं तेव्हा कळलं 

सगळ्यांना भेटून त्याने निरोप घेतला,
 तो कायमचा च 

मला बघायला आलेल्या मुलाने मला पसंत केलं 
व लग्न देखील ठरले, 

मी त्याला लग्नाला देखील बोलवले नाही , दादा ने बोलावले पण तो आला नाही, 
आणि त्याने यावे असे मला देखील वाटत नव्हते, 
कारण माझे बोहल्यावर चढणारी पाऊले त्याला बघून थांबली तर?? 

तो वाऱ्यासारखा आयुष्यात आला व त्याच वेगाने निघूनही गेला, 
पण त्याने मला जगायला शिकवलं 
नसेलही आमच्या नात्याला नाव 
पण तरीही ते हृदयावर कोरल गेलं 
कायमच, 

 आजही त्याची आठवण आली की हे नयन भरून येतात, 

त्या नंतर मी कधीच वाळूत कुणाच्या पावलावर पाऊल ठेवले नाही कारण त्याच खुणा अजून जपून आहे मनात, 

कधीच आकाशातील चांदणे बघण्याची हिम्मत केली नाही कारण तोच प्रकाश अजून टिकून आहे डोळ्यात, 


तो व त्याच्या आठवणी पुरेशा आहेत जीवन जगण्यासाठी, 
हे आजही वास्तव होत,

मी माझ्या संसारात रमले होते, 
सुखात आहे, 
पण आजही त्याला आठवते तेव्हा या गाण्याच्या ओळीं डोळ्यात पानी आणून जातात, 

कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

कितीदा झुरावे तुझ्याचसाठी?
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी?
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी?
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी?

कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे?
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

किती हाक द्यावी तुझ्या मनाला?
किती थांबवावे मी माझ्या दिलाला?
किती हाक द्यावी तुझ्या मनाला?
किती थांबवावे मी माझ्या दिलाला?

कितीदा रडुनी जीवाने हसावे?
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

खरच कितीदा पडू रे तुझ्या प्रेमात एकाच आयुष्यात, 

व मला अचानक जाग आली, 
बाहेर बघते तर सकाळ झाली होती, 

मी तीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून विचार करू लागले, 
ज्या पहिल्या प्रेमाला मी इतक्या दिवसात विसरले नाही , 
 
ही ला तिचे प्रेम विसर म्हणून सांगणारी मी स्वतः निर्दोष आहे का ????

मला आहे का तो हक्क????

आज माझ्यातील आई व त्या सुनीता चे भविष्य ठरणार होते जी आजही जपते तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण हृदयात, 


मला येईल का राहता माझ्या लेकि माघे ठामपणे उभा, 

की करेल मी तिच्या देखील प्रेमाचा शेवट स्वतः प्रमाणे, 

आयुष्यभर मी जगत आले त्या बोचऱ्या टोमन्या सोबत तसेच तिने ही जगावं असे वाटतेय का मला, 

कोण चुकतंय 
मी ????
रमाकांत????
आई ???
की दिव्या??? 

की प्रेम ?????

जाणून घेण्यासाठी सोबत राहा

🎭 Series Post

View all