Login

पाहिलं प्रेम अंतिम (भाग 28) न विसरता येणारी आठवण

Love

पहिलं प्रेम अंतिम (भाग 28) 

( माघील भागात आपण पाहिले सुनीता ला तिच्या डोळ्यातील पाण्याने जाग आली होती पण त्याच बरोबर खुप प्रश्न देखील पडले होते, 

आता पुढे ...............


आज माझ्या आईपणाची कसोटी होती, 

मी दिव्या ला लवकर आवरून खाली ये म्हणून सांगून गेले,

मी माझ्या कामाला लागले, 
मनात खुप गोधळ होता पण आज मला ठाम राहायचे होते,

मी सर्व तयारी केली व यांना आई ला दिव्या ला जेवायला बोलावले, 


तिला का ??? 
तिला दे रूम मध्ये, 
ती नकोय मला डोळ्यासमोर 
आई म्हणाल्या, 


नाही आई ती पण आपल्या सोबत जेवण करेल, 
मी म्हणाले 

आई ला उलटून बोलतेस 
हे ओरडले 


अहो 
उलटून नाही बोलत पण मला बोलायचे आहे तुम्हांला, 
तिला फक्त आज जेऊ द्या तुमच्या सोबत 
उद्या तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेल, 
मी त्यांना समजावत म्हणाले,

माझ्या या बोलण्यावर दोघेही तयार झाले, 

मी दिव्या ला आवाज दिला ती घाबरत च खाली आली 

त्यांच्या दोघा समोर वरती बघण्याची पण तिची हिम्मत होत नव्हती तशी माझीही नव्हती पण आज मला लेकीच्या प्रेमाने बोलत केलं होतं


सगळे जेवायला बसले, 
आणि मी बोलायला सुरुवात केली, 

मग काय ठरवले तुम्ही दिव्या च्या शिक्षणाचे , 
मी असे म्हणताच 

सगळे माझ्याकडे बघू लागले, 

काय म्हणजे, 
अजून काही बाकी आहे का???
आई म्हणाल्या, 


आई तुमचा राग काळतोय मला, 
पण मला सांगा 
रमाकांत चे व माझे लग्न होण्यापूर्वी 
रमाकांत चे एका मुलीवर प्रेम होते व तिने आई वडिलांसाठी 
यांना नकार दिला हे मला यांनी च सांगितले होते, 
व आजही रमाकांत त्या मुलीला विसरू शकले नाहीत,
ते त्या मुलीला आजही दोष देतात, 

माझे बोलणे मधेच तोडत रमाकांत म्हणाले दोष देत होतो पण आता नाही देत कदाचित एका मुलीचा बाप झाल्यावर कळले ती बरोबर च होती व मी चूक, 

आता ते बोलू लागले 
व तुला काय वाटत ग 
दिव्यात माझा जीव नाही मी 
तिला मारले याचा मला त्रास झाला नसेल का???? 

पण जे मी अनुभवलं ते माझ्या मुलीच्या वाट्याला नको म्हणून मी सतत तिच्यावर लक्ष ठेवतो 
ती ला त्या पहिल्या प्रेमाची झळ च लागू नये असे मला वाटायचे 
कारण प्रेम करण माणसाच्या हातात असत पण ते टिकवणं देवाच्या व नशिबाच्या 

सगळं छान झालं तर मनाला आनंद असतो पण जर दुःख मिळालं ना तर माणूस आयुष्यभर कोलमडून पडतो तो कायमचा, 

त्यांचे बोलणे ऐकून दिव्या उठली व बाबा ना जाऊन बिलगली 
बाबा मला माफ करा, 
मी तुमच्या शब्दा पुढे नाही जाणार कधी, 
ते बाप लेकीचं प्रेम बघून 
आई नि कधी मला जवळ घेतलं हे त्यांच्या पण लक्षात आले नाही, 
मी ओरडते, 
तिला बाहेर जाऊ नको म्हणते 
तिला वळण लाव म्हणते 
तिला वळण नाही म्हणून नाही 
तर तिला जर काही झालं या स्वार्थी जगामध्ये तर या डोळ्यात व कानात शक्ती नाही ग ते पचवण्याची , 
म्हणून तिला जपतो आम्ही 
कुणी तिला कुस्ककरू नये म्हणून, 

बाकी नात कधी आजी ला जड होते का ग 
तीच तर पहिली व्यक्ती असते जी आजी च्या मुलाची दुसरी आई होते, 


आई ने मुलीला दिलेली आई ची उपमा,
माझ्या डोळ्यातील 
वाहणारे पाणी,
रमाकांत ला दिव्या ने मारलेली मिठी, 
व कुठेतरी माझ्या पहिल्या प्रेमाने मला दाखवलेला योग्य मार्ग , सत्याचा सामना करण्याची हिम्मत 
हा सगळा योगायोग च म्हणावा लागेल, 


आणि हो तुझे शिक्षण काही बंद होणार नाही, 
उद्या त्या मुलाला घरी बोलावं मी त्याला समजावून सांगतो, 
तू तुझे व त्याने त्याचे शिक्षण पूर्ण करावे एकमेकांशी काहीही संबंध न ठेवता, 
तुमचे शिक्षण पूर्ण झाले व तुमची ईच्छा असेल तर मी स्वतः तुझे त्याच्याशी लग्न लावून देईल, 
बाबा चे हे शब्द ऐकताच दिव्या खूश झाली
तिचा आनंद गगनात मावेना, 

इतरवेळी बाबा व आजी ला घाबरणारी दिव्या आज त्यांना कडकडून मिठी मारत होती, 

सगळ्यांनी छान जेवण केले व हे कामावर निघून गेले, 

मी मनातच सुजित चे आभार मानत होते, 
रमाकांत सारखा जोडीदार मिळाला म्हणून की तुझ्या पहिल्या प्रेमाने मला जगायला शिकवले म्हणून, 
माहीत नाही 
पण ते आजही अनुत्तरित च आहे 
की एक नाव नसलेलं नात आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकत का ?????
त्याला नाव नसले म्हणून काय झालं अस्तित्व तर असते ना हृदयात जपलेल, 

त्या पहिल्या प्रेमातील गोड आठवणी पुन्हा कधीच अनुभवायच्या नसतात 
त्या फक्त वेळीअवेळी एकांतात आठवून डोळ्यात पाणी आणण्यासाठी जपून ठेवायच्या असतात, 
हृदयात कोपऱ्यात, 

हो की नाही ?????????

@कथेचे सर्व अधिकार लेखिका गीता सूर्यभान उघडे यांच्याकडे राखीव असून कथा शेअर करायची असल्यास नावसाहित करावी पण साहित्य चोरी नको कारण लेखन हा लेखकाचा आत्मा असते
कथा कशी  वाटली नक्की कळवा ते लेखनास प्रोत्साहन देते, 

आपल्या प्रतिक्रिया च्या प्रतीक्षेत

धन्यवाद

🎭 Series Post

View all