Login

पहिलं प्रेम भाग ३(भूतकाळात डोकावताना)

प्रेम की आकर्षण


"हाय..." विक्रांत

"हाय.." सौम्या थोडी अवघडून बोलली.

"काल ऑफिसमधे मीटिंग होती मग आठच्या आधीची ट्रेन पकडली..म्हणून मग लवकर गेलो.."विक्रांत

"अच्छा..मला वाटल सुट्टी वैगरे होती!"चोरुन एक नजर त्याच्यावर टाकत ती बोलली.

"सुट्टी संडेला असते. अशी मधे नाही घेता येत आणि सरकारी सुट्टी असेल तर.." विक्रांत

"आजारी असताना पण सुट्टी नाही घेत का? ती मस्करीच्या सुरात बोलली पण आपण खरच मुर्खासारख बोलतोय हे कळल्यावर तिने लगेच त्याला सॉरी पण म्हंटल.."

"ओके...निघतो मी. माझी ट्रेन आली. बाय" विक्रांत

"ओके..बाय.."सौम्या
तो त्याच्या रोजच्या चालीमधे जात होता आणि ही मात्र रोजसारखीच तो जाईपर्यंत त्याला डोळ्यात आणि मनात साठवून घेत होती..

हळू हळू मैत्री वाढली मग नंबर एक्सचेंज झाले एक्सचेंज कसले तो पण एक गेमच होता. जो तिने खेळला होता.
त्याने सांगितल मी नंबर मागणार नाही आणि तिने सांगितल तू मागितल्याशिवाय मी नंबर देणार नाही. पण तिला त्याचा नंबर हवा होता पण मग कसा हे कळेना... शेवटी तिने शक्कल लढवली.
तिने तिचा फोन मधली दोन गाणी डिलीट केली जी त्याच्याकडे पण होती आणि तिच्याकडे पण होती.

"अरे वाह..हे माझं आवडत गाणं आहे. माझ्याकडे होत पण डिलीट झालं. मला ब्लूटूथ ने दे. मी चालू करते."सौम्या

"ओके..एकच मिनिट जरा सरांना फोन करतो. चालेल?" विक्रांत

"हो चालेल!" सौम्या..
तीच संधी साधून ती पटकन ब्लूटूथवर नावाच्या जागी तिचा फोन नंबर एड करते आणि पासवर्डला तीच नाव ..

"केली ब्लूटूथ चालू?" विक्रांत

"हो केंव्हाच केली." सौम्या

कनेक्शन मधे जाऊन तो त्याच ब्लूटूथ चालू करतो आणि न मागता नंबर मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आणि समोरून फोन येईल या खात्रीत असणारी ती..जणू त्याला वाटे की हिला काही माहीत नाही आणि ही सातव्या आसमंतात..

गाण्यांची देवाणघेवाण झाली आणि मग तो त्याच्या मार्गी आणि ती तिच्या मार्गी.. दोघांनाही गड जिंकल्याचा आनंद झाला होता.
दहा मिनिटांनी त्याचा फोन आला जे तिला अपेक्षित होत आणि कोण होत हे तिला समजल होत..

"हॅलो..कोण?" सौम्या

"घेतला ना तुझा नंबर.. हा हा हा... मी मागितला नाही पण तरी तुझा नंबर कसा शोधला मी." विक्रांत खुशितच बोलला.

"अरे..तुझ्याकडे कसा आला..खर सांग कोणी दिला.. मी तर सांगितला नाही.. "ती पण आनंद वजा खोट्या आश्चर्याने बोलत होती.

"माझ्याकडे जादू आहे. ते सोड नंबर आला ना मग सोड विषय.. पोचली का तू क्लास मधे? "विक्रांत


"हो जस्ट.. चल ठेवते फोन..क्लास मधे फोन अलाउड नाही. सुटली की करते फोन.. बाय" सौम्या

"ओके चल बाय.. टेक केअर" विक्रांत
आता रोज भेटण व्हायचं. तासनतास फोनवर बोलणं व्हायचं. व्हॉट्सॲपवर चॅटिंग व्हायची.. मॅसेज वर चॅटिंग व्हायची..
दोघेही कधी जवळ आले समजलच नाही. कधीतरी दूरदूर असणारे आता एक झाले होते. हातावर हात पडणारे.. हातात हात घालून उभे राहू लागले होते..चोरुन बघणारी नजर आता एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. त्याची केस सावरणारे हात आता तिचे होते. दोन मिनिटांच्या भेटीवर पुढचे चोवीस तास काढावे लागत होते. त्याच्यापासून वेगळं होताना तिचा हात सुटायचा नाही..पण..

चार वर्ष ती दोघे सोबत होती. खूप आठवणी होत्या. न सांगता त्याला तिच्या मनातल सगळ समजत होत. तिला पण हेच हवं होत...पण त्याला? त्याला काहीतरी वेगळं हवं होत.

अचानक तो तिला टाळू लागला..तिला इग्नोर करू लागला.. जस की वापरून झाल्यावर टीशू फेकतात अशी अवस्था झाली होती तिची. त्याला कामाचं प्रेशर असेल म्हणून तो अस वागतोय अस तिला वाटू लागलं होत पण... खूप मॅसेज केल्यावर तो तिला दुसऱ्या दिवशी भेटायला आला.

"काय झालं? का वागतोस तू अस? का नाही बोलत आहे माझ्याशी?" सौम्या.. पोटतिडकीने विचारत होती.

"तू स्वतःला विचार ना.. तू काय केलं आहेस ते?" विक्रांत चिडून बोलला.

"काय केलं आहे मी?" सौम्या

"तू माझ्या घरी का गेली होती.. तुझ्यामुळे माझ्या घरी वाद झाले. ती मुलगी कोण? तुला इकडे का विचारत आली? म्हणून डोकं खराब केलं माझ आणि तू विचारते मी काय केलं.. वाह रे बेटा..."विक्रांत

"हा मग काय करू मी? आज किती दिवस झाले तू माझ्याशी नीट बोलत नाही,भेटत नाही इव्हन तू तुझा रस्ता बदली केला येण्याचा.. मॅसेज वर बोलले आपण लग्न करूया तर काय बोललास? तुला माझ्याशी लग्न करायचं नाही मग काय चुकीचं वागले मी." सौम्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलली.

"हे बघ.. आपल लग्न पॉसिबल नाही.. का समजत नाही तुला. माझ्या घरचे जी मुलगी बघणार तीच फायनल असणार आणि एकत्र रहायला लग्न थोडीच करावं लागत. आपण आपल्या फॅमिलीने निवडलेल्या व्यक्तीशी लग्न करूया.. आणि मी कुठे तुला सोडणार आहे तूच लग्नाची जिद करून बसली आहे. राधा कृष्ण पण तर भेटत होतेच ना."विक्रांत तिला समजावण्याच्या सुरात बोलत होता.

"काय बोललास? म्हणजे लग्न दुसऱ्याशी करून पण आपण भेटायचं.. म्हणजे? आणि राधाकृष्ण देव होते.. त्यांची तुलना माणसांशी होऊच शकत नाही. मला फक्त प्रेयसी म्हणून नाही मिरवायच तुझी बायको व्हायचं आहे." सौम्याचा गळा दाटून आला होता.

"जाऊदे.. सोड तो विषय आणि हे बघ आपल लग्न होणार नाही.. ओके असच भेटायचं असेल तर बोल नाहीतर सोड विषय.." तुटक तुटक बोलून तो निघून गेला आणि ही मात्र नेहमीच्या जागी उभी राहून अश्रू गाळत होती.

तिच्या कानात फक्त एकच शब्द आवाज करत होता. आपण लग्न फॅमिलीच्या आवडीच्या व्यक्तीशी करूया आणि आपण असच भेटूया ना.. लग्नाची काय गरज आहे.
त्याच माझ्यावर प्रेम होत की फक्त आकर्षण... तिला काही समजेना ती बेचैन झाली होती.

त्याने रस्ता बदलला होता पण तिने मात्र तोच ठेवला होता. आतःशा ती त्याला फक्त प्लॅटफॉर्म वर लांबून बघून निघून जात होती. काही दिवसांनी ते ही तिने स्वतः कमी केलं. आकर्षण आणि प्रेम यामध्ये ती अडकली होती.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे...

🎭 Series Post

View all