पाहिलं प्रेम (भाग 9) न विसरता येणारी आठवण

A love story

पाहिलं प्रेम (भाग 9) 

(माघील भागात आपण पाहिले सुनीता, सुजित, तिचा दादा व होणारी वहिनी घरी येण्यासाठी निघतात) 

आता पुढे .......................


रस्त्याने जाताना त्या पाळणाऱ्या झाडासोबत माझे मन देखील पळत होते, 

त्याची काळजी करणे, 
मी आहे तुझ्यासोबत हे सतत सांगणे, 
प्रेम आहे की फक्त जबाबदारी हेच मला कळत नव्हते, 

आम्ही काका च्या घरी पोहोचलो, 
त्यांचा निरोप घेऊन बाहेर आलो, 
गाडीत बसत असताना 
सुजित काहीतरी खुणावत होता पण काय ???
ते मला कळत नव्हतं, 
तो पुन्हा नजरेने मुलीकडे ईशारा करत म्हणाला, 
नंबर, 
मी विचार केला माझा नंबर तर आहे यांच्याकडे मग आता कुणाचा पाहिजे, 

मी त्याला न जुमानता गाडीत बसण्यासाठी दरवाजा उघडला, 
तसाच दरवाजा पुन्हा लावत तो हाताने जोरात माझा हात ओढत म्हणाला अग मुलीचा नंबर घे, 

आता माझी ट्यूबलाईट लागली नंबर दादा ला हवा असेल, 
मी आतमध्ये जाऊन 
त्या मुलीचा नंबर घेतला,
व गाडीत बसलो, 
घे नंबर पण हे हळू पण सांगू शकत होतास 
मी खोटा राग आणत म्हणाले, 

केव्हाचा खुणावत होतो 
तुला कळते का सांगितलेले, 
तो हसत म्हणाला, 

त्याच ते हसन 
व मला चिडवन 
मला आपलस वाटत होतं 
नक्कीच, 
आता मला खात्री पटली होती 
की ही फक्त जबाबदारी नाही त्याहून वेगळं आहे, 

दादा नि मला होस्टेल ला सोडलं आणि तो सुजित सोबत माझं काम आहे सांगून निघून गेला त्याचे आज काय काम होते ते मला माहित होतं, 

मी फक्त हसत "हो जा जा कर तुझं काम 
म्हणून होस्टेल मध्ये गेले, 

आज प्रत्येक गोस्ट माझ्या मनाप्रमाणे घडली होती,
 मन सतत घिरट्या घालत होते  स्वच्छंदी खगा प्रमाणे त्या मंदिराभोवती, 
आज मनसोक्त नाचाव पाय दुखेपर्यंत, 
मनाला वाटणारी ओढ व वास्तव याची कुठेतरी सांगड जुळली होती आज, 

माझ्या तंद्रीत च मी रूम मध्ये गेले फ्रेश झाल्यावर आठवलं अरे प्रॅक्टिकल बाकी आहे तिहायचं व उद्या सबमिशन ची लास्ट डेट आहे, 

सगळ्या स्वप्नाना बाजूला सारत मी वास्तवात आले 
म्हणल, 
पुन्हा कधी बघू स्वप्न 
आज प्रॅक्टिकल, 

कॉलेज सुरू होते व आमचे बोलणे पण 
त्याच असणं, नसणं, हसन, रागावणं, सगळंच माझ्यावर परिणाम करत होत,
मी रंगून गेले होते त्यात, 
आता आमचे रोज कॉल चालायचे, 
कॉल वर वेळ कसा निघून जायचा हेच कळत नव्हते व जेव्हा तो म्हणायचा चल काम आहे, 
नंतर बोलू, 
असे वाटायचे त्याला सांगावं 
नको ना फोन ठेऊस, 
नको ना दूर जाऊस,
असच बोलत राहू 
आयुष्यभर, 
मग त्याला कुठेही अंत नको,
 ना कुठली परिसीमा, 
असेच प्रेम करत राहू 
नाव नसलेल्या नात्याने, 
पण हे फक्त मी मनातल्या मनात बोलू शकत होते, 

आता तो प्रत्येक रविवारी न चुकता भेटायला यायचा, 
काही न काही सामान आणायचे म्हणून आम्ही बाहेर पडायचो, 
त्याच्या सोबत खाल्लेली ती पहिली पाणीपुरी, 
त्याच्या सोबत भिजवणारा तो पहिला पाऊस, 
त्या पावसात एका छत्रीतून केलेला तो सुखमय प्रवास, 
त्यात माझी तुटलेली चप्पल
सांभाळताना उडालेली तारांबळ, 
पावसाच्या थेंबापासून वाचवण्यासाठी आसरा बनलेलं त्याच जॅकेट, 
लॉंग ड्राइव्ह ला गेल्यावर 
रस्त्याच्या कडेला घेतलेला तो चहा, 
त्याच सतत मला सांभाळणं, 
त्याच माझ्यावर हक्क गाजवण, 
पावसात भिजल्यामुळे झालेली सर्दी व त्याने घेतलेली काळजी, 
सगळंच खुप विलक्षण होतं.

असा विचार तर करत नसेल ना तो माझ्याबद्दल......................

भूतकाळाचे पडदे उलगडताना
जेव्हा तुझा निर्विकार चेहरा आठवतो,
हसतो आणि पुन्हा एकदा फसतो
आकंठ तुझ्या प्रेमात,

प्रेमाचा तो गुलाबी रंग
त्यात विरहाचा पांढरा रंग
तुझा होण्याचे बाजूला सारून
जबाबदारी ने झुरत राहतो 
पुन्हा एकटाच,

तू ही प्रेम करतेस
मीही प्रेम करतो
फरक फक्त इतकाच
तू फक्त खऱ्या प्रेमाला मानतेस
व मी माझ्या प्रेमाला खरे.


नाही नाही तो कशाला असा विचार करेल, 
माझे आपले काही असते, 
मग काय असेल त्याच्या मनात, 
माझ्या सारखी समान भावना की मी चुकत असेल कुठे?????

होत का प्रेमात अस खुप वेळा 
आपण समोरच्याला गृहीत धरतो पण तो मात्र आपल्याला वेगळाच समाजत असतो, एखाद्याने आपुलकीने किंवा माणुसकीने केलेली मदत, घेतलेली काळजी, आपण प्रेम मानून बसतो, व स्वतः च जोडलो जातो त्या व्यक्तीशी नाव नसलेल्या नात्याने, 
व ती व्यक्ती बिचारी, 
तिला तर माहीत देखील नसते आपल्या भावनांची ,
ती तिची सरळ मार्गाने चालत असते तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, 
गुंततो आपण व त्रासही मग आपल्यालाच होतो, 
असेच काही तर होणार नाही ना सुनिताच्या बाबतीत, 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
व मला फॉलो करा,

🎭 Series Post

View all