पहिला मान-३

पहिला मान
मुक्ताची तारीख 10 दिवसांवर आली. ती दहा दिवस आधीच आपल्या सासरी येऊन धडकली..सासूबाई चक्रावल्या,

"काय गं??"

"बाळांतपणाचा पहिला मान सासरचा...माझं बाळंतपण तुम्हीच करणार.."

सासूबाईंनी मटकन खाली बसून घेतलं..आधीच त्यांना सर्वांचं करत जीवावर येई, त्यात आता हे...बरं दारी आलेल्या सुनेला नाही तरी कसं म्हणणार??

मुक्ताकडून काही काम शक्य नव्हतं, त्यामुळे सासूबाईंना तिला काय हवं नको सगळं पाहावं लागे... त्या ते करायलाही तयार नव्हत्या...पण मुक्ताने मुद्दामहून नवऱ्याला दहा दिवस सुट्टी घ्यायला लावलेली, तो समोर असताना सासूबाई आपल्या सुनेला नाही म्हणू शकत तर नव्हत्याच...कारण मुलाच्या नजरेसमोर कोणती सासू आपला वाईटपणा दाखवेल??

मुक्ताने आता आता सासूबाईंना धडा शिकवायला सुरवात केली होती, पण खरी मजा तर पुढे आहे...

तिला कळ येताच दवाखान्यात सर्वजण गेले, तिने गोंडस मुलाला जन्म दिला...बाळाला सर्वप्रथम सासूच्या हातात तिच्या सांगण्याप्रमाणे देण्यात आलं..

दवाखान्यात चार दिवस थांबणं होतं... ती म्हणाली,

"माझे आई वडील आहेत तोवर तुम्ही आईंना घेऊन घरी जा.."

सासूबाईंनी सुस्कारा टाकला...आता तरी आपण मोकळ्या होणार..

"...आणि आईंनी बॅग भरून इकडे या, दवाखान्यात माझ्यासोबत त्या थांबतील...पहिला मान त्यांचा.."

सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली...चार दिवस सुनेची आणि नातवाची सेवा?? अरे देवा....

मुलानेही आग्रह केला आणि सासूबाईंना नाईलाजाने दवाखान्यात थांबावं लागलं..बाळ रात्री अपरात्री उठे, रडे...सासूबाईंना बराच त्रास पुरला, पण शेवटी त्याही आजीच ना..नातवासाठी हे करतांना त्यांना काही वाटायचं नाही, फक्त सुनेसाठी काही करावं लागलं की येई जीवावर....

बाळाला घेऊन ती आणि सासूबाई घरी आल्या...तिच्या माहेरच्यांनी खूप आग्रह केला..

"अगं मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी करतात..तशी रितच आहे.."

"रीत चं मला माहित नाही, पण पहिला मान हा सासरच्यांना..माझ्या सासूबाईंनी हेच शिकवलं आहे, आणि ते मी कायम लक्षात ठेवणार..काय हो सासूबाई??"

सासूबाईंनी बोटं मोडत मान डोलावली...

बाळ मोठं होऊ लागलं, आजीबाई नातवात रमू लागल्या, एके दिवशी अचानक दारात पाहुण्यांची बरीच गर्दी जमली..

🎭 Series Post

View all