भाग - सोळा.
"एवढया उन्हाची कुठे गेली होतीस गं?" घरी आल्या आल्या स्मिताने पल्लवीला धारेवर धरले.
"कुठे गं? मैत्रिणीकडे तर गेले होते." पल्लवी.
"पल्लवी, चेहरा का पडलाय असा? कोणी काही बोलले का तुला?" व्हिलचेअर वर बसलेल्या नयनाताईंनी विचारले.
"मामी, अगं ते बाहेर होते ना, म्हणून असेल. दादू कुठे आहे? दिसत नाहीय ते?" तिने विषय बदलायचा प्रयत्न केला.
"आम्हाला सांगून जातोय होय? तू घरी असलीस की दोघे काही बोलता तरी. आमच्याशी तर काही सोयरेसुतक नसल्यासारखेच तो वागतो." नयनाताईंनी डोळ्याला पदर लावला.
"बाहेरून आल्या आल्या वहिनीला रडवलेस ना? जा आधी फ्रेश होऊन ये. नंतर बोलूया." स्मिता.
"आई, मी जरावेळ पडते गं. उन्हामुळे डोके जड आल्यासारखं वाटत आहे." आत जात पल्लवी म्हणाली.
" बाहेर फिरताना ऊन नसते, घरी आल्यावरच सगळी नाटकं सुरु होतात." आत जाणाऱ्या तिच्याकडे पाहत स्मिता पुटपुटली. "वहिनी, तू उगाच कशाला डोळ्यात पाणी आणतेस गं? मी आहे ना? शेखरचे लग्न लावून दिल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये." नयनाताईकडे पाण्याचा ग्लास देत ती म्हणाली.
"ब्रो, कुठे आहेस यार तू?" काळजीने तिने विचारले.
"जरा बाहेर आलोय. बोल ना काय झालेय?" तो.
"बाहेर म्हणजे कुठे? तुझ्या त्या पार्कमध्ये का?" तिने अंदाज घेत विचारले.
तो काही न बोलता केवळ खिन्नपणे हसला.
"व्हॉट? दादू तू पण ना यार." त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती. "काय केलेस तिथे जाऊन?" शांत स्वरात तिने पुढे विचारले.
"ऍक्च्युअली त्या घरावर दुसऱ्याच नावाची नेमप्लेट होती. चौकशी केल्यावर कळले की ते घर केव्हाच विकल्या गेलेय. तिची फॅमिली दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झालीय." तो निराशपणे म्हणाला.
"हं. ऐक ना, मी आज त्या चाईल्ड हॉस्पिटल ला गेले होते." आपली खुर्ची त्याच्यासमोर ओढत ती म्हणाली.
"काय? नि तू आत्ता हे सांगते आहेत. आजसुद्धा होती का ती तिथे?" त्याने अधीरपणे विचारले.
"हो भेटले ना मी तिला." छवीचे नाव ऐकून शेखर तिच्याबद्दलच बोलत होता हे तिला स्पष्ट झाले.
"काय झालेय तिला?" त्याच्या चेहऱ्यावर काळजी.
"हे कसले लॉजिक तिचे बाबा तिच्यासोबत नाहीत म्हणून तिला त्यांनी दत्तक घेतले नाही असं कसं म्हणतेस तू?" तो.
"मला काय म्हणायचंय ते बहुदा तुला कळलेलं नाहीय. हे बघ, जेव्हा एखादं जोडपं बाळाला दत्तक घेतो, इट मिन्स त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे असा होतो. त्यांना एकमेकांना सोडायचे नसते म्हणून दुसऱ्याचे बाळ ते दत्तक घेतात. इथे तसे नाहीये. छवीच्या पेरेंट्सचे परस्परावर प्रेम असते तर ते असे वेगळे झाले नसते ना? " त्याला समजावत पल्लवी.
"तुला हे सारं कोणी सांगितले? छवीच्या आईने?" तो.
"नाही. मी डॉक्टर निशांतना भेटून आलेय. त्यांच्याकडूनच मला हे कळलं." पल्लवी.
" कदाचित तुला तुझ्या आधीच्या वागण्याचा पश्चाताप होत असावा, म्हणून त्या छोटीत तुला तुझी मुलगी दिसली असेल. आता सगळे क्लिअर झालेय ना, देन फॉरगेट इट ऑल! आयुष्यात पुढे मूव्ह ऑन कर. आपली कंपनी जॉईन कर. मामांना मदत कर. छोटया छोटया गोष्टीतून आनंद घ्यायला शिक." त्याचा हात हातात घेत ती म्हणाली. तिच्या हातावर त्याच्या डोळ्यातून एक टपोरे मोती सांडले.
"आणि हे सारखं रडूबाईसारखे रडत जाऊ नकोस. बरे दिसत नाही रे. मला माझा पूर्वीचा स्ट्रॉंग ब्रो हवाय." त्याचे डोळे पुसत ती म्हणाली.
झोपताना शेखर पल्लवीच्या बोलण्याचा विचार करत होता. तिचे बोलणे त्याला पटले होते. आपल्यामुळे छवीच्या आयुष्यात काही अडचणी येऊ नयेत, हे त्याला पटले होते. पण तरी आपले मन त्या चिमुकलीकडे का ओढतेय ह्याचा काहीच अंदाज लागतं नव्हता.
*********
"आसावरी, डॉक्टर काय बोलले गं? काय झालंय माझ्या गुलाबाला?" जेवण झाल्यानंतर स्वयंपाकघरातील ओटा आवरत असताना रजनीताईंनी आसावरीला विचारले.
"काही नाही हो काकू, आणि काळजी करू नका मी असेपर्यंत तुमच्या गुलाबाला काहीही होणार नाही बरं." आसावरी.
"आणि तू नसलीस तर?" तिच्याकडे बघत रजनीताई.
"असं का म्हणताय? मी कुठे जाणारेय?" ती.
"म्हणजे? काकू तुम्हाला काय म्हणायचे आहे?" त्यांच्याकडे वळून आसावरी.
"आता ताकाला जाऊन भांडं काय लपवायचं ना? स्पष्टच बोलते, तू पस्तीशीमध्ये पोहचते आहेस. थोडा स्वतःचा विचार कर. असे एकटीने कुठवर आयुष्य काढणार आहेस? तू लग्न करून घे." रजनीताई.
"काकू, मी आधीच तुम्हाला सांगितले ना, मला आता असल्या फंदात पडायचे नाहीय, आणि अचानक हा किडा डोक्यात कसा वळवळायला लागला?" त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ती.
"किडा नाही गं, कित्येक दिवसापासून मनात होतं पण तुझ्याशी बोलायला योग्य वेळच मिळत नाही बघ. अशी किती दिवस एकटी राहणार आहेस? मला काकू म्हणतेस तर आईसामान आहे ना मी? मग माझं ऐकणार नाहीस का?" तिचे खांद्यावरचे हात आपल्या हातात घेत रजनीताई.
"काकू, अशा शब्दांच्या जाळ्यात मी अडकणार नाही हं. तुम्ही आईसारख्या काय, माझ्या आईच आहात. पण हे लग्न बिग्न नको हो." ती.
"असे म्हणून कसे चालेल? छवी आणि माझ्यामुळे तू नकार देत आहेस ना? असा कुणी मुलगा असेलच की जो छवीची जबाबदारी उचलेल. तुझा तो बॉस, काय नाव त्याचं? आठवलं, सागर. तो काय वाईट? त्याला तर तुझ्याबद्दल माहितीही आहे." रजनीताई.
"ओह! म्हणजे तो घरी आला होता तर?" ती.
"हो. तूच सांग त्याच्यात काय वाईट आहे? श्रीमंत आहे. छवीला सांभाळायला तयार आहे. मुख्य म्हणजे त्याचे तुझ्यावर प्रेम आहे." रजनीताई.
" आसावरी, प्रत्येकाला एकाच तराजूत तोलायचे नसते गं." रजनीताई.
"नसेना का. पण पुरुषजातीवर माझा अजिबात विश्वास नाहीये. काकू तुम्ही माझ्यासोबत आहातच की. आपण एकमेकांना पुरेसे नाही आहोत का? का सारखा लग्नाचा विषय?"
"मी आहे गं आसावरी, पण कोठवर पुरणार आहे मी? तुला तुझे भविष्य आहे की नाही?" त्या प्रेमाने समजावत म्हणाल्या.
"काकू, भविष्याचा विचार करून मला माझा वर्तमान खराब करायचा नाहीय. तुम्ही दोघी हेच आता माझे आयुष्य आहे. मला ते एन्जॉय करू द्या." ती.
तिने हसून मान डोलावली.
"हॉस्पिटलमध्ये काय झाले ते तरी सांगशील? डॉक्टर काही सिरियस बोललेत का?" त्यांनी विषयात हात घातला.
.
.
क्रमश:
काकूंना खरे सांगेल का आसावरी? कळण्यासाठी वाचत राहा कथामालिका, पाहिले न मी तुला..!
पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला ते कळवा. सोबतच अधीर मन झाले! या नव्या कथामलिकेचा देखील आस्वाद घ्या.
धन्यवाद.
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा