Login

पहिले पाढे पंचावन्न चा अर्थ मराठी meaning in marathi >>

पहिले पाढे पंचावन्न चा अर्थ मराठी meaning in marathi >>
पहिले पाढे पंचावन्न चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :पहिले पाढे पंचावन्न

उच्चार pronunciation : पहिले पाढे पंचावन्न

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. कितीही समजावले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येणारा.
2. मूळ पदावर येणें.

मराठीत व्याख्या :-
एखाद्या व्यक्तीला वारंवार सांगून सुद्धा त्याची मूळ प्रवृत्ती न बदलणे, किंवा वारंवार तीच कृती करणे.

Meaning in Hindi
किसी व्यक्ति का मूल प्रवृत्ति को न बदलना, या एक ही क्रिया को बार-बार दोहराना।


Definition in English :- 
" Not changing a person's basic instincts, or repeating the same action over and over again.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
काही व्यक्तींचा हा अवगुण असतो की त्यांना इतरांनी समजावून सांगितलेली गोष्ट कळत नाही. कितीही उपदेश दिला तरी त्यांचं पहिले पाढे पंचावन्न, अशा लोकांशी निपटण्यात एक मात्र पर्याय असतो की त्यांच्या हातून चुका घडू देणे आणि नंतर स्वतः त्यांना शिकू देणे.


Synonyms in Marathi :-
मूळ पदावर येणें.

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  पहिले पाढे पंचावन्न
2. Definition of   पहिले पाढे पंचावन्न
3. Translation of पहिले पाढे पंचावन्न
4. Meaning of  पहिले पाढे पंचावन्न
5. Translation of   पहिले पाढे पंचावन्न
6. Opposite words of    पहिले पाढे पंचावन्न
7. English to marathi of   पहिले पाढे पंचावन्न
8. Marathi to english of   पहिले पाढे पंचावन्न
9. Antonym of  पहिले पाढे पंचावन्न


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
किशोरी मॅडमचा निनाद आवडीचा विद्यार्थी होता याच्यासाठी नाही की तो खूप अभ्यास करायचा पण यासाठी की स्वभाव गुणांनी त्याच्यासारखं इतर कोणीच नव्हतं.
निनाद पाचवीपासून एकाच शाळेत शिकत आहे वर्षभर इतरांची मदत करणे असो किंवा गृहपाठ वेळच्यावेळी करणे सगळ्या गोष्टी तो पटाईत असायचा कधी कुणाशी भांडण तंटा नाही उलट वर्गाचा कॅप्टन असायचा तर वर्ग ही सुरळीत ठेवायचा.
किशोरी मॅडम निनादला नेहमी म्हणायच्या तू जर चांगला अभ्यास केलास तर नक्की टॉप करशील.
त्यावर निनादच नेहमी उत्तर असायचं मला टॉप नाही करायचंय पासिंग मार्क्स तर मी एका महिन्यात पाडतो,, सुरुवातीपासून तो तसंच करत आला होता आणि पेपराच्या ऐन महिनाभरा अगोदर त्याचा सगळं करून देखील व्हायचं ‌. किशोरी मॅडमनी वारंवार सांगून सुद्धा त्याचा आपलं 'पहिले पाढे पंचावन्न 'दहावीचा निकाल आला तेव्हा त्याला फक्त 40 टक्के मार्क पडले होते आता त्याच्या लक्षात आलं होतं की वेळीच बदल घडवून आणला असता तर मित्रांसमोर आणि घरच्यांसमोर असली नामूष्की झाली नसती.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग