Login

पहिली माळ देवी शैलपुत्री

Devi Shailputri Is The First Goddess To Worship On First Day Of Navratri. In Today's Era We Can Find Such Greatness In Few Females. Hats Off To The.
नुकत्याच पॅरिसमध्ये झालेल्या पॅरालिंपिक्समध्ये भारत देशाने दैदीप्यमान कामगिरीचे प्रदर्शन दाखवलेले. त्यात मुख्यत्वे महिला खेळाडूंनी चमक दर्शविली. त्याच वेळेस माझ्या मनाने ह्या खेळाडूंना देवीस्वरुप मानले.

“या देवी सर्वभूतेषु माळ शैलपुत्री रुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।“

आजची पहिली माळ देवी शैलपुत्रीला समर्पित आहे. देवी शैलपुत्री नवदुर्गांपैकी पहिल्या दुर्गेचे स्वरूप मानले जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा व आराधना केली जाते. शैलपुत्री देवीचा ललाटावर अर्धचंद्र, उजव्या हातात त्रिशूळ डाव्या हातात कमळाचे फूल आहे.

याचप्रमाणे आताच्या युगात आपल्या शैलपुत्री देवी सारख्या पहिल्या दुर्गेचे प्रतिक म्हणजे पॅरालिम्पिक्स विजेती दीपा मलिक.

दीपा मलिक या पहिल्या भारतीय पॅरालिम्पिकमध्ये पदकं मिळवणार्या महिला ठरल्या आहेत. परंतु, त्यांचा हा प्रवास अत्यंत कठोर, खडतर व टोचणारा काट्याकुट्यांनी भरलेला होता. १९९९ साली वयाच्या २९ व्या वर्षी त्यांना स्पायनल ट्युमरचे निदान झाले. तो ट्यूमर काढून टाकण्यासाठी त्यांची तीन ऑपरेशन्स झाली. ती ऑपरेशन्स यशस्वीदेखील झाली. पण, ट्युमर निघून जाताना शारीरिक शक्ति देखील घेऊन गेला.

“सर्वांत ज्येष्ठता व श्रेष्ठता म्हणजे मानसिक खंबीरता” हा वाक्प्रचार या वीरांगनेने सत्यात उतरवून दाखविला. देवी शैलपुत्रीसारखं एका हातात सकारात्मक व ऊर्जाचे कमळ आणि दुसर् या हातात येणार्या प्रत्येक शारीरिक व मानसिक अडथळ्यांना दूर लोटण्याचे त्रिशूल घेऊन ही योध्दी पदक मिळविण्यासाठी सज्ज झाली.

२०१६ मध्ये पॅरालिम्पिक्समध्ये रजत पदक मिळवून त्यांनी भारतीय व जागतिक पातळीवर मानाचा तुरा रोवला. आणि प्रत्येकाला दाखवून दिले की ,
“कार्यक्षमता व सामर्थ्यता असेल जोडीला
तर कोणत्याच कमतरतेला नसेल आयुष्यात जागा.”

ह्या अमूल्य व अगणिक कार्याबद्दल दिपा मलिक ह्यांना शतशः नमन.

धन्यवाद.