दीर्घकथा स्पर्धा डिसेंबर, जानेवारी 2025-2026
पैज.. एक वेगळी प्रेम कहाणी..
अवनी विचार करत हॉल मध्ये बसली होती.
आपल्या आबांना कसं कनवीन्स करावं तेच तिला समजत नव्हतं
ते तर त्यांच्या कामाला गेले.
दादा वहिनी पण शाळेत गेले.
आता ती आई आणि इतर नोकरचाकर एवढेच होते.

" आई मी जरा मंदिरात जाऊन येते. जाऊ का? "
अवनीने आईची परवानगी घ्यायच्या दृष्टीने विचारलं.

आई बाहेर आली आणि तिच्याकडे बघून बोलली
" आत्ता? आत्ता तुला मंदिरात जायचं आहे? जा. माझं काही म्हणणं नाही बाई. पण लवकर ये. हे, तुझे आबा घरी येतील तेव्हा घरी असायला हवी तू. नाही तर काळजी करत बसतील ते. "

ती हसतच आई कडे बघून विचारलं
" अगं आई, उद्या मी लग्न होऊन गेले तर, तरी ते असंच वाट बघतील का? "

तिचं बोलणं ऐकून त्यांनी तिच्या पाठीत धपाटा घातला आणि म्हणाल्या
" काय गं ए, बाबांची अशी चेष्टा करतेस होय गं, आणि तू तुला सासरी जायची घाई झाली आहे की काय होय गं, तसं असलं तर सांग मला
त्या जरी हसत बोलल्या,
तरी अवनी घाबरली आणि उठून म्हणाली
" ए बाई, काही नको, मला शिकायचं आहे, नाही शिकायला मिळालं, हरकत नाही, पण लग्न बिग्न झंझट नको.
ती उठून तिने तिच्या स्कुटरची चावी घेतली आणि ती तिथून चप्पल घालून बाहेर पडली.
हेल्मेट घालून तिने चावी लावली, आणि गाडी चालवत ती मंदिरात आली.
तिथे झाडाखाली गाडी लावली.
ते एक जुनं, खूप छान हेमाडपंती मंदिर होतं.
गणपती, आणि शंकर पार्वतीच असं छान मंदिर होतं.
आत छान झाड होती, आणि त्यासमोर मंदिर होते.
आधी शन्कराच्या नंदीला तिने नमस्कार केला. त्याच्या कानात बोलली
" माझा निरोप तुमच्या शँकर भगवान पर्यंत पोचवा, मला एम ए करायचं आहे.
आणि ती मोठी स्माईल करत आत गेली.
बाहेरच्या चाफ्याच्या झाडाची फूल तिने वाहिली.

" परमेश्वरा, माझी इच्छा पूर्ण कर
तिने मनापासून प्रार्थना केली.
मग गणपती बाप्पा समोर असलेल्या उंदीर मामाच्या पण कानात तिने इच्छा सांगितली.
आणि मनोभावे नमस्कार केला
" बाप्पा, मला मुंबईला जाऊ दे, मस्त एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवेल, स्वतः बनवेल
ती एक एक लालच देत होती

आता किती तिचं देव ऐकणार होता, त्यालाच माहिती!
ती बाहेर येऊन एका झाडाखाली असलेल्या बाकावर बसली.
काही क्षण मन शांत झालं.
मनातले विचार दूर झाले असं वाटलं.
काही क्षण मन शांत झालं.
मनातले विचार दूर झाले असं वाटलं.
क्षणभर वाटलं पण की बाबांचं ऐकून बी एड वगैरे करून नोकरी करावी.
मग ती मनाशी काही ठरवून उठली.
आता ती ते स्वतः काही बोलणार नव्हती. पण सगळे काय म्हणतात, ते ती ऐकणार होती.

सरपंच म्हणून आबासाहेबांना गावात मान होता.
तिथे त्यांच्या ऑफिस मध्ये सगळे कार्यकर्ते वगैरे बसलेले होते.
काही जण आपल्या समस्या वगैरे सांगत होते
त्यावर चर्चा झाली.
आणि ते घरी जेवायला आले.
ते आले तेव्हा अवनी तिथे गार्डन मध्ये होती.
तिथली ती झाडांची काळजी घेत होती.
मनापासून त्यांच्या खाली असलेली, सुकलेली पाने वगैरे काढून ती सफाई वगैरे करत होती.
त्या झाडांवरच्या फुलासारखीच नाजूक होती ती. तिला जपायल हवं होतं. जगाच्या वादळाच्या तडाख्यात तिला कोमेजू द्यायचं नव्हतं.
पण कोणतं वादळ कधी येईल काही सांगता थोडंच येत...
आपल्या मनातल्या विचाराची त्यांनाच भीती वाटली.

त्यांनी तिला प्रेमाने हाक मारली,
अवनी बेटा
अवनी बेटा
त्यांची हाक ऐकून तिने लगेच बघितलं पण मान फिरवून तिने ती रागावली आहे हे दाखवून दिलं.
तसं ते हसतच बोलले
" अगं, रुसूबाई, किती रुसतेस, चल बरं घरात, जेवण करून घेऊ,
ते असं म्हणाले की ती त्यांच्या जवळ गेली आणि ते घरात आले

आबासाहेब हातपाय धुवून आले. अवनी पण चेंज करून फ्रेश होऊन आली.
ते जेवायला बसले.
ते जेवायला बसले.
जेवण झाल्यावर ते आपल्या रूम मध्ये आराम करायला आले. तेव्हा त्यांच्या पत्नीने जानकीने विषय काढला
" अहो, आपण नितीनला पण पुण्यात ठेवलं शिकायला, तो तर पाच वर्ष रहाणार आहे. अवनीची पण इच्छा आहे तर तिला दोन वर्ष राहू द्या की मुंबई मध्ये.
आपल्या पत्नीकडे त्यांनी आश्चर्याने बघितलं. तीही बारावी शिकलेली होती.

त्या डोळ्यात पाणी आणून भरलेल्या स्वरात बोलल्या
" मी पण बारावी झाले खूप इच्छा होती माझी की मला पदवी मिळवून सरकारी ऑफिसर व्हायचं होतं पण लगेच लग्न झालं जबाबदाऱ्या आल्या, मग सगळं राहून गेलं, आपल्या अवनीच पण असं नको हो व्हायला. आत्ता ती म्हणते ते शिकू द्या तिला. मला खात्री आहे, ती आपलं नाव खाली नाही पडू देणार, आणि ती जे काही संशोधन करेल, खूप नाव कमवेल ती.

आपल्या पत्नीचा बोलणं ऐकून ते विचारात पडले.
खरं बोलत होत्या त्या. इच्छा तर त्यांनी पण बोलून दाखवली होती पण पूर्ण काही झाली नव्हती. माहेरी पण नाही सासरी पण नाही
आणि अवनीच पण लग्न करून दिलं तर, तिचे पण स्वप्न नाही पूर्ण झाले तर,
ते त्या विचाराने अस्वस्थ झाले.

अहो, मी काय म्हणते, आपले जाधव, ते मुंबई मध्ये रहातात, बघा त्यांच्या ओळखीने काही होतं का, रहाण्याची सोय वगैरे,
आपल्या पतीचा चेहरा वाचून त्यांच्या मनात काय चाललं आहे, त्यांना चांगलच समजत होतं.

रामचंद्र राव पण विचार करायला लागले. आपण मुलगा मुलीत कधी भेदभाव केला नाही.
मग आता आपण अवनीवर अन्याय करतो आहे का?
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग सलग प्रकाशित होणार असून सलग वाचण्यासाठी पेजला फॉलो करा. फॉलो सेटिंग मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन निवडा, म्हणजे पार्ट मिस होणार नाही

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा