पैज... एक वेगळी प्रेम कहाणी...
अवनी आपल्या मैत्रिणीकडे आली होती. रुपाली तिची अगदी जवळची मैत्रीण होती. रितेश तिचा भाऊ कार घेऊन आला, हे ऐकून रुपालीची आई आणि ती दोघी पण आश्चर्याने बघायला लागल्या.
तसं रितेश जरा चिडून बोलला
" असं काय बघत आहे, इथून मला ती कार मालकाकडे द्यायची आहे, नवीन आहे जसं काही तुम्हाला, जा रूपे मला चहा आण मस्त आलं गवती चहा घालून, चांगला गोड कर, आणि या तुझ्या मैत्रिणीला पण दे, "

त्याने ऑर्डर सोडली, तसं रुपाली नाक मुरडून बोलली
" आत्ता मला ऑर्डर सोडतो आहेस, पण बघू ना, हम्म, वहिनी आल्यावर पण याच भाषेत बोलशील का, असाच हुकूम सोडशील का? "
" आत्ता मला ऑर्डर सोडतो आहेस, पण बघू ना, हम्म, वहिनी आल्यावर पण याच भाषेत बोलशील का, असाच हुकूम सोडशील का? "
रितेश तिचं बोलणं ऐकून हसतच बोलला
" हो मग, हम नहीं बदलेंगे, मी असाच रहाणार, असंच कोणाला आवडलं तर ठीक, नाही तर स्वतःला बदलावं तिने
तो सोफ्यावर पाय पसरून बसला.
" हो मग, हम नहीं बदलेंगे, मी असाच रहाणार, असंच कोणाला आवडलं तर ठीक, नाही तर स्वतःला बदलावं तिने
तो सोफ्यावर पाय पसरून बसला.
हुह, म्हणे स्वतःला बदलावं, का, स्वतःला का बदलायचं, अवनी मनातच विचार करत तिथे बसली होती.
बरं मला सांग बेटा, काय चाललं आहे तुझं, पुढे काय करायचं ठरवलं आहेस, काय करणार? "
आई तिच्या जवळ बसली, तिच्या समोर गवारच्या शेंगा होत्या, अवनी पण निवडू लागली.
आई तिच्या जवळ बसली, तिच्या समोर गवारच्या शेंगा होत्या, अवनी पण निवडू लागली.
अगं राहू दे, राहू दे, आधी मी काय विचारलं सांग,
रुपालीच्या आईच बोलणं ऐकून अवनीने तिरप्या नजरेने रितेश कडे बघत सांगितलं
" पुढे एम एस सी करायला मी मुंबईला जाणार आहे, सांगितलं ना, ".
रुपालीच्या आईच बोलणं ऐकून अवनीने तिरप्या नजरेने रितेश कडे बघत सांगितलं
" पुढे एम एस सी करायला मी मुंबईला जाणार आहे, सांगितलं ना, ".
तसं काकू हसतच बोलल्या
" अगं ते शिक्षणाचा झालं, मी लग्नाचं विचारत आहे, असं काय बघते आहे
ती नाराज होऊन बघायला लागली.
" अगं ते शिक्षणाचा झालं, मी लग्नाचं विचारत आहे, असं काय बघते आहे
ती नाराज होऊन बघायला लागली.
अहो काकू, तुम्हाला तर माहिती आहे, आमचे आबासाहेब, ते नाही परमिशन देणार मुंबईला जायला, मग बघू,
ती उदास स्वरात बोलली.
ती उदास स्वरात बोलली.
मुंबईला जाऊन शिकणार? की मजा करणार? मुंबई चीज अशी आहे, भल्याभल्याना तिथे मोह होतो, मग बाकी रहात बाजूला, "
रितेश चहा घेत अवनीला चिडवत बोलला.
रितेश चहा घेत अवनीला चिडवत बोलला.
" मुंबईला जाऊन तुझ्यासारखे बदलले असतील पण मी नाही बदलणार, काही लोक बदलतात, पण मी फक्त माझ्या अभ्यासावर फोकस करणार आहे, फक्त अभ्यास, मग रिसर्च, मस्त मला संशोधन करायचं आहे, त्यात स्वतःला झोकून द्यायचं आहे, बाकी गोष्टी मी नाही लक्ष देणार कधीच, "
अवनी चिडून बोलत होती.
"अरे तिला का चिडवतो रे, ती नाही अशी, उगीच काही बोलू नको,"
आई निवडलेली भाजी उचलून किचन मध्ये जात बोलली.
आई निवडलेली भाजी उचलून किचन मध्ये जात बोलली.
आता अवनी आणि रितेश दोघेच तिथे होते.
मी बदलणार नाही, अजिबात मुंबईला जाऊन, तू बदललास तसं
तिने रितेशला जणू चॅलेंज दिलं.
तिने रितेशला जणू चॅलेंज दिलं.
बघू, बदललीस तर? लागली पैज, मला माहिती आहे, मिस अवनी पाटील कोण बदललं आणि किती बदललं, मी तर पैज लावून सांगतो, तू बदलणार, जर नाही बदलली ना तर तुला मी म्हणेल ते करावं लागेल,
आणि अवनी चिडून म्हणाली
" आणि बदलले तर, समजा मी बदलले तर तर काय? हम्म प्रत्येक वेळी तुझी अशी मनमानी नाही चालणार, मिस्टर रितेश जाधव, मी कधीच बदलणार नाही, तू पैज जिंकूच शकत नाही, कधीच नाही
ती जरा भावुक होऊन बोलली.
" आणि बदलले तर, समजा मी बदलले तर तर काय? हम्म प्रत्येक वेळी तुझी अशी मनमानी नाही चालणार, मिस्टर रितेश जाधव, मी कधीच बदलणार नाही, तू पैज जिंकूच शकत नाही, कधीच नाही
ती जरा भावुक होऊन बोलली.
लक्षात ठेव, मी हरलो तर तू म्हणशील ते करेन मी, आणि तू हरली तर, तू सांगशील ते मी करेन,
त्याने अगदी गंभीर स्वरात सांगितलं.
त्याने अगदी गंभीर स्वरात सांगितलं.
अवनी त्याच्याकडे बघून बोलली पण
" पण मला मुंबईला जायला मिळालं तर, हे सगळं शक्य होईल, आत्तापासून कशाला सगळं हे,
अवनी निराश स्वरात बोलली.
" पण मला मुंबईला जायला मिळालं तर, हे सगळं शक्य होईल, आत्तापासून कशाला सगळं हे,
अवनी निराश स्वरात बोलली.
रुपाली किचन मधून आली.
अवे, अगं आले पण मी भांडी घासून काय म्हणत होता तुला दादा, नेहमी प्रमाणे भांडलीस ना त्याच्याशी? किती भांडता गं सारखं, मागे पण तो मुंबई वरून गावी आला, त्याच्या आधी तो गेला तेव्हा पण असंच भांडली होती आता तू मुंबई मध्ये चालली, आता भांडते, किती ते भांडण,
रुपाली हसतच तिला बोलली.

अगं हे काय अवनी चहा तसाच राहिला, थांब मी गरम करून आणते, म्हणत रुपाली चहा घेऊन किचन मध्ये गेली.
ती जाताच रितेश परत आला
यार, चावी विसरलो, सवय नाही ना,
तो बडबड करत आत आला.
यार, चावी विसरलो, सवय नाही ना,
तो बडबड करत आत आला.
विसरण्याची सवय आहेच ना अजून, सगळं विसरून जा, सगळं
अवनी उठून पळतच गाडी जवळ गेली आणि निघून पण गेली.
अवनी उठून पळतच गाडी जवळ गेली आणि निघून पण गेली.
तिथे चहा परत घेऊन आलेली रुपाली ती तिथे नाही हे बघून रितेशला आश्चर्याने विचारलं
" अरे, आत्ता इथे होती ही कुठे गेली काय माहिती? काय रे परत काही बोललास का तू तिला? का बोलतोस तुला माहिती आहे ना, ती किती हळवी आहे, किती मनाला लावून घेते, तरी तिला सारखं चिडवत असतो, उद्या गेली मुंबई मध्ये तर काय, काय चिडवशील तिला की...
त्याने काही नाही बोलता तिच्या हातातून चहा घेतला आणि बोलला
" रूपे, स्वैपाक शिकून घे, आता लग्न करावं लागेल तुझं, तयारी कर,
रुपाली मात्र स्वप्नाळू डोळ्यांनी म्हणाली
" बघू, दादा, मी शिकते तर आहे, पण मला माहिती आहे, स्वैपाक, घरकाम असं सगळं करावं लागणार नाही मला,"
रितेश तिच्याकडे बघून हसतच बोलला,
" अरे वा, म्हणजे रुपाली मॅडमनी कोणीतरी स्वप्नातला राजकुमार शोधला आहे, कोण आहे, मला सांग

त्याचं असं चिडवणं ऐकून रुपाली तिथून पळून गेली पण रितेश मात्र काही वेळ तिथे ती काय म्हणाली याचा विचार करत उभा होता काही वेळासाठी तो अवनीचा पण विचार विसरून गेला होता.
सदर दीर्घ कथेचे भाग सलग प्रकाशित होणार असून सलग वाचण्यासाठी पेजला फॉलो करा. फॉलो सेटिंग मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन निवडा. म्हणजे पार्ट मिस होणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा