पैज... एक वेगळी प्रेम कहाणी....
सावरगाव.
एक छोटंसं गाव. गाव छोटं होतं. पण तिथे सगळ्या आधुनिक सुविधा होत्या. शाळा कॉलेज, होते, आय टी आय होतं, आणि पोलिटेक्निक होतं. अजून तिथे सुधारणा झाल्या असत्या.
रामचंद्र पाटील. गावचे सरपंच होते. त्यांनी गावात आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळा आणि कॉलेज सुरु केले होते. त्यांच्या पत्नी जानकीबाई, यांची त्यांना मोलाची साथ होती.
आता वयाची चाळीशी ओलांडून ते निवांत होते. दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार होता त्यांचा. मोठा मुलगा,अविनाश तिथेच शाळेत शिक्षक होता. त्याची पत्नी, अनिता पण शिक्षिका होती.
मधला मुलगा अनिकेत, तो पुण्यातच इंजिनियर होत होता. मेकॅनिकल इंजिनियर होऊन आपल्या गावात फॅक्टरी उभी करायचं त्याचं स्वप्न होत
त्यांचं शेंडेफळ म्हणजे
अवनी.
अवनी रामचंद्र पाटील. तिला शिकून रिसर्च करायचे होता.
जिवशास्त्र मध्ये एम एस सी करून तिला जेनेटिक्स मध्ये स्टडी करायचा होता.
आता ती त्यांच्याच कॉलेज मधून बी एस सी झाली होती.
निकाल लागला होता.

" आबा, मी काय म्हणते, प्लीज मला मुंबई मधल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळते आहे, मला जाऊ द्या ना, प्लीज.
अवनी आपल्या बाबांना लाडीगोडी लावत होती.
त्यांची इच्छा होती की आपल्या मुलीने बी एड वगैरे करावं आणि आपल्याच शाळेत किंवा कुठे पण नोकरी करावी. तिच्या शिक्षणाला त्यांचा अजिबात विरोध नव्हता पण त्यासाठी तिला मुंबईला पाठवायला त्यांचं मन तयार होत नव्हतं.
असं नव्हतं की त्यांची परिस्थिती नव्हती किंवा मुंबई मध्ये ती कुठे राहिली असती, असा पण काही प्रश्न नव्हता.
पण त्यांचं हळवं मन तिला दूर करू इच्छित नव्हतं.

आई प्लीज, तू तरी सांग, की दादा, तू तरी सांग,
ती सगळ्यांकडे विनवणी करत बघत म्हणाली.
सगळ्यांना वाटत होतं की तिने जावं शिकायला. पण ते आबांच्या बोलण्याची वाट बघत होते.

" अगं बाळा, मला काळजी वाटते, ती मुंबई. आहे, आपलं सावरगाव नाही. तिथे कसले कसले लोकं असतात, बेटा, तुझी काळजी वाटते,
ते असं बोलताच अवनी गाल फुगवून म्हणाली
"याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही असं समजू का मी आबा, कारण मी आता एकवीस वर्षाची आहे. मला सगळं कळत असं नाही म्हणणार मी, पण माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा ना प्लीज, बाबा मी प्रॉमिस करते की फक्त कॉलेज, प्रॅक्टिकल, कधी तरी मैत्रिणी, असं करेन शिवाय इथे पण येईनच की, आणि तुम्ही या, तसं पण मुंबई मध्ये काम असतंच की तुमचं मग काय हरकत आहे
ती सारखं आपलं म्हणणं पटवून देत होती.
पण आबांचं मन कुठे तरी अस्वस्थ होत होतं. का माहिती नाही पण त्यांना तिला पाठवावे वाटत नव्हतं
असं नव्हतं की मुलीवर विश्वास नव्हता पण तरी कुठे तरी वाटत होतं
तिला आपल्या डोळ्यासमोर ठेवावी. नको दूर कुठे पाठवायला. पण त्यांना तिची स्वप्न माहिती होती. तिला तर परदेशात जाऊन शिकायचं होतं इथे राहून नसतच जमलं.
पण त्यांचं मन अजून पण तयार नव्हतं.

सदर दीर्घ कथेचे भाग सलग प्रकाशित होणार असून सलग वाचण्यासाठी पेजला फॉलो करा.
फॉलो सेटिंग मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन निवडा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा