Login

पैज.. एक वेगळी प्रेम कहाणी...

एक वेगळी प्रेम कथा
पैज.... एक वेगळी प्रेम कहाणी.....

रितेश एक मेकॅनिकल इंजिनियर होता. त्याच्या वडिलांनी त्या गावात कायम स्वरूपी बदली करून घेतली होती.
तिथे जमीन पण घेतली होती. त्या जमिनीत ते काही काही पीक घेत होते.
रितेशने एक वर्ष जॉब केला होता, पण मग तो गावी आला होता. त्याने मस्त गॅरेज टाकलं होतं, आणि शेती पण बघत होता. आत्ता पण जस्ट गाडी गिर्हाईकाकडे नेऊन देताना अवनीची स्कुटर दिसली म्हणून तो घरी आला, तर तिची भेट झाली.
तसं तो तिला बरीच वर्ष झाली ओळखत होता.
पण ती मात्र त्याला जास्त भाव देत नव्हती. म
कारण एकदा त्याने तिला चिडवलं होतं, की सायन्स तर घेतलं पण डॉक्टर इंजिनियर नाही झालं तर काय उपयोग?
आणि तेव्हा पासून ती आणि तो दोघांतून विस्तव जात नव्हता.

अवनी घरी आली. तोपर्यंत तिचं मन बरंच शांत झालं होतं.
ती आई बरोबर जेवायला बसली
तिचे वडील जेवण करून परत गेले होते.

" आई, बोलले का गं काही आबा, की मला मुंबई मध्ये शिकायला ठेवायचं किंवा नाही, काही म्हणाले का, काही ठरवलं का, अर्थात एका रात्रीत तर नाही निर्णय होणार, पण तरी मला वाटत कुठे तरी की आबा मला शिकायला जाऊ देतील, "
तिच्या मनात जी आशा वाटत होती, ती तिने बोलून दाखवली. आईला पण वाटत नव्हतं की ते परवानगी देतील पण ती त्यांच्या बरोबर बोलली तेव्हा वाटलं होतं की त्यांचं मन बदलेल.

इकडे रामराव शाळेत गेले होते.
तिथे पण ते अवनीचा विचार करत होते मुलींच्या प्रगतीचा विचार करताना आपण आपल्या मुलीवर अन्याय तर करत नाही?
काय हरकत आहे?
त्यांनी खूप विचार केला आणि ठरवलं, तिला परवानगी द्यायची पण तिथे तिला गाडी, सोबत नोकर वगैरे असं सगळं देऊन मगच पाठवायचं. तसच ओळखीच्या कोणाकडे पाठवण्याच्या ऐवजी तिला स्वतंत्र फ्लॅट कॉलेज जवळ घेऊन द्यायचा. अगदी बॉडीगार्ड नाही पण ड्रायवर बरोबर द्यायचा या अटी मान्य असतील तरच तिला पाठवायचं, त्यांनी ठरवलं. आणि जरा मन शांत झालं त्यांचं.
अविनाश आणि अनिता ते सगळे घरी आले.
अवनी तुळशी जवळ दिवा लावत होती.

तिला बघून त्यांचं मन प्रसन्न झालं. आपल्या संस्कारावर त्यांचा विश्वास होता.

ते सगळे आत आले, आईने चहा आणला सगळ्यांसाठी.
अवनीने लगेच सांगितलं
" मी केला आहे, बरं का, कसा झाला आहे? "

तसं वहिनी हसतच बोलली,
" अहो, अवनी ताई, तुम्ही याच्या बरोबर पोहे पण केले असते, तर नक्की पसंत केलच असत बघा तुम्हाला, "

तिचं असं चेष्टा करणार बोलणं ऐकून सगळेच हसले.
अवनी मात्र थोडी मनातून चिडूनच तिथून उठली. वहिनीला मला हाकलायची घाईच झाली आहे. असंच तिच्या मनात आलं
आणि ते फारस चुकीचं पण नव्हतं.
वहिनीला तर वाटत होतं, लवकर लग्न होऊन अवनी या घरातून तिच्या सासरी जावी.

अवनी, थांब,
आबांचा आवाज कानावर आला, तसं ती थांबून आश्चर्याने वळून बघायला लागली.

सदर कथेचे भाग सलग वाचण्यासाठी पेजला फॉलो करा.
फॉलो ऑप्शन मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन निवडा. म्हणजे पूर्ण कथा वाचता येईल.
0

🎭 Series Post

View all