Login

द पेमॉन (भाग ७)

सैतान आणि मानव यांची प्रेमकथा
एलिझाबेथला आता काय बोलावे तेच सुचत नव्हते. तिच्या मनात मिखाईलच्या चॉकलेटी डोळ्यांचा आणि त्या नाजूक माळेचा विचार घोळत होता. कारण तिला आठवले की ती त्या तरुणाला धडकली तेव्हा, त्याच्या मजबूत बाहूंमध्ये पडताना बहुतेक माळ सुटून त्याच्याकडेच गळून पडली असेल. ती माळ फक्त एक दागिना नव्हती – ती तिच्या आईची शेवटची आठवण होती, जादुई निळ्या दगडाची माळ जी तिला नेहमी संरक्षण देते असे वाटायचे. आणि हे जर मदरला माहीत झाले की ती माळ आता मानवी जगात आहे, एखाद्या अनोळखी मनुष्याच्या हातात तर एलिझाबेथची काही खैर नव्हती. मदर विच मीरिंडा तिच्या रागात काहीही करू शकायची.

हॉलमध्ये प्रचंड शांतता होती. मीरिंडा एलिझाबेथकडे एकटक पाहत होती, जणू तिच्या डोळ्यातून सत्य बाहेर काढणार. एनाबेला आणि एलिना घाबरून एकमेकांकडे पाहत होत्या.
तेराईतील तो हॉल आता पूर्ण शांत झाला होता. फक्त मीरिंडाच्या रागाचा श्वास, तिघींच्या धडधडत्या हृदयांचा आवाज, आणि दूरच्या जंगलातून येणारे रहस्यमयी आवाज जणू प्राणीही म्हणत होते.

"पुढचा भाग कधी?" मीरिंडा एलिझाबेथकडे एकटक पाहत राहिली, जणू तिच्या डोळ्यातून सत्य बाहेर काढणार की किमान एखादे नवे खोटे तरी.

रॉईलो चिंतेने त्या तिघींकडे पाहत होते, आणि हॉलमध्ये तणाव इतका वाढला होता की हवेत जादूची ठिणग्या उडू लागल्या होत्या. 


रॉईलो चिंतेने हात हालवत होते. तेव्हाच हॉलच्या छतावरून एक जोरदार गरजना झाली, आणि वरच्या बाजूला असलेले जादुई काचे फुटण्याच्या बेतात हादरले.

"मी सांगतो या तिघी जंगलाच्या प्रतिबंधित क्षेत्रात काय करत होत्या आणि का गेल्या होत्या!" एक खणखणीत, उन्मत आवाज हॉलमध्ये घुमला. आणि लगेच एक प्रचंड काळा ड्रॅगन हॉलच्या मोकळ्या छतातून खाली उतरला. त्याच्या पंखांची फडफड इतकी जोरात होती की हॉलमधला धूर आणि ठिणग्या सगळ्या उडाल्या. ड्रॅगनवर बसलेला जादूगार शँग्रीला ओरडत तिथे आपल्या ड्रॅगनवर उडत आला. ड्रॅगनने खाली उतरताना जमिनीवर पंजे रोवले, आणि शँग्रीला उतरला. त्याने आपला लाल झगा नीट करत मदर विच मीरिंडा आणि जादूगार रॉईलोला अभिवादन केले.


शांग्रीला हा तेराई जादूई नगरीतील राजकुमार होता. प्रमुख लकीयर जादूगार हग्रीसचा एकुलता एक मुलगा आणि वारसदार. त्याच्या रक्तात राजेशाही आणि प्रचंड जादुई शक्ती दोन्ही होत्या, ज्यामुळे तो निकिलियन (निकृष्ट नसलेला, अत्यंत शक्तिशाली जादुगार) लकीयर म्हणून ओळखला जायचा. त्याची जादू क्रूर आणि विनाशकारी होती; तो आगीचे गोळे, विद्युत प्रवाह आणि प्राण्यांना वश करणाऱ्या मंत्रांत निपुण होता.

दिसायला तो अत्यंत हँडसम होता. सहा फूट उंच, बॉडीबिल्डरसारखे कमावलेले शरीर, फुगलेली छाती, मांसल खांदे आणि कडक दंड. गोरा रंग, लांब काळे केस नेहमी मागे बांधलेले, आणि डोळे हिरवे-निळे मिसळलेले जणू जादुई विषारी तलाव. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी उपहासाचे हसू आणि करारी स्वभाव दिसायचा. दिसायला राजबिंडा पण करारी चेहरा  नाकावरची तीक्ष्ण रेषा, काळ्या भुवया, आणि ओठांवर नेहमीचे ते उपहासात्मक हसू. उन्मत आणि गरम डोक्याचा.

पण त्याचे मन तितकेसे सुंदर नव्हते. शांग्रीला कपटी आणि उद्धट होता. त्याला आपल्या शक्तीचा आणि सौंदर्याचा प्रचंड गर्व होता. तो इतरांना कमी लेखायचा. त्याला प्राण्यांची शिकार करणे, युनिकॉर्नचे रक्त गोळा करणे किंवा दुर्बलांना त्रास देऊन आपले वर्चस्व दाखवणे आवडायचे. दया, माया किंवा माणुसकी त्याच्या शब्दकोशात नव्हती. तो फक्त शक्ती आणि सत्ता यांना मानायचा.

एलिझाबेथला तो एकतर्फी पसंत करायचा. तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या जादुई शक्तीमुळे तिच्यावर मोहित होता. तिला आपली राणी बनवण्याचे स्वप्न पाहायचा. पण एलिझाबेथ त्याच्या या क्रूर आणि उद्धट स्वभावामुळे त्याचा तिरस्कार करायची.

शांग्रीला मात्र तिच्या नकाराला आव्हान मानायचा आणि अधिकच कपटीपणे तिच्या मागे लागायचा.


"ओहह शँग्रीला, ये ये... काय केले यांनी?" मीरिंडा त्याला बोलवत, थोड्या उत्सुकतेने म्हणाली. कारण शँग्रीला हा ताकतवर लकीयर होता. आणि जादूगारांच्या गावाच्या प्रमुखाचा मुलगा होता. मीरिंडाला त्याच्या बातम्या नेहमी आवडायच्या – कारण त्या नेहमी गोंधळ घालणाऱ्या असायच्या.

"मदर मीरिंडा, तुम्हाला माहित आहे आपल्या जादुई नगरीत युनिकॉर्नच्या रक्ताला किती महत्त्व असते. तो शक्तिशाली आणि जादुई शक्तींनी परिपूर्ण जीव आपल्या रिच्युअलसाठी महत्वाचा असतो. मी आज एका युनिकॉर्नची शिकार केली. तो प्रचंड शक्तिशाली होता त्याचे शिंग चमकत होते, आणि तो मला जादूने रोखत होता. पण मी त्याला जखमी केले. तो जखमी होऊनही निसटला आणि दुखवर्णी तलावाच्या परिसरात जाऊन पडला. पण मी पोहोचायच्या आत एलिझाबेथ आणि या दोघींनी त्याला वश करून दुखवर्णी तलावाच्या पाण्याने परत जीवदान दिले. आणि त्याच्यावर बसून त्यांनी आपल्या गुप्त दरवाज्यावर त्याला घेऊन गेल्या – मानवी जगात!" त्याने एक भुवई उंचावत, आपली जादूई छडी नाचवत तिघींना पाहत म्हटले. त्याच्या आवाजात उपहास आणि राग दोन्ही होते.

हॉलमध्ये एकदम खळबळ उडाली. मीरिंडाच्या डोळ्यात अंगार पेटला होता. रॉईलो चिंतेने हात जोडले.

"सगळ्यात पाहिले आम्हाला माहीत नव्हते की तो शिकार झालेला युनिकॉर्न आहे. मला वाटले तो टेकडीला आपटून जखमी झाला. आणि कुणाही अडचणीत असलेल्या जीवाची मदत करणे आपला पहिला धर्म असावा. कुणा जीवाची हत्या करून शक्ती मिळवणे हे सैतानी कृत्य आहे. मला नाही वाटत की मी काही चुकीचे केले," एलिझाबेथ फणकाऱ्यात, डोळे उंचावून म्हणाली. तिच्या आवाजात ठामपणा होता, पण आतून ती घाबरली होती.

"हे तुला भारी पडेल एलिझाबेथ," शँग्रीला तिच्या जवळ येऊन, तिला निरखत, हळूच पण धमकीच्या स्वरात म्हणाला. त्याचे हिरवेनिळे डोळे तिच्या निळ्या डोळ्यात खुपसले.

"बघू काय भारी पडते ते. तू जाऊ शकतोस," एलिझाबेथ रागात त्याला ओरडली. तिने आपले हात मुठीत आवळले.

शँग्रीलाने एक कुत्सित हास्य करत तिला पाहिले – जणू म्हणत होता, "आता बघ." मग तो परत मागे वळला. आपल्या ड्रॅगनकडे गेला, त्याच्या पाठीवर हात फिरवला, आणि ड्रॅगनने एक गर्जना केली. शँग्रीला त्याच्यावर बसला आणि जोरदार पंख फडफडवत तो उडाला हॉलच्या छतातून बाहेर.


"तिन्ही कारट्यांंनी नाकात दम आलाय माझ्या! रोज रोज नवे उपद्व्याप! रॉईलो तुला सांगते लवकरात लवकर कोणी जादूगार पाहून त्यांचे लग्न करून टाक. म्हणजे आपण मोकळे. मी अजून नाही सहन करू शकत या तीन कैदाशिणींना!" मीरिंडा ओरडत, आपली छडी जोरात जमिनीवर आपटत आत गेली. तिच्या मागून धूर आणि ठिणग्या उडाल्या.

मीरिंडा आत गेलेली पाहून रॉईलो तिघींना जवळ घेतले. त्यांनी हळूच तिघींच्या खांद्यावर हात ठेवला. "मला तुझा अभिमान आहे एलिझाबेथ. तू त्या युनिकॉर्नला वाचवून चांगले काम केले. मदरचे मनावर घेऊ नकोस. ती अशीच बडबडत असते – पण आतून तिला पण माहित आहे की तू बरोबर होतिस. आणि एनाबेला, एलिना  तुम्ही पण छान साथ दिलीत. जा आता, विश्रांती घ्या. उद्या नवीन दिवस आहे."

तिघींनी रॉईलोना हसून निरोप दिला आणि हॉलाबाहेर पडल्या. पण एलिझाबेथच्या मनात अजूनही माळेची आणि मिखाईलची चिंता होती आणि आता शँग्रीलाच्या धमकीचीही. पण तिने ठरवले ती माळ परत आणणारच, मग काहीही होवो.

रात्र झाली जेवण वैगेरे करून तिघीही झोपायला गेल्या. पण एलिझाबेथला अजूनही मिखाईलची आठवण येत होती. त्याचे ते डोळे, त्याचे स्मित, त्यांची नजरानजर. तिच्या डोक्यातून जातच नव्हते. नक्कीच आपली माळ त्याच्याकडे राहिली असणार. ती विचार करु लागली. पण माणूस विच समुदायास घातक असतो हे तिला माहीत होते. पण का माहीत नाही तिच्या मनात मिखाईलला भेटायची लिप्सा जागृत होत होती. उद्या कसेही करून तिने परत गुप्त दरवाज्या मागून मानवी मितीत प्रवेश करायचे ठरवले.


0

🎭 Series Post

View all