दुखणं-1

दुखणं
"काय करू गं सासूबाईंचं.. सगळे उपचार झालेत पण काडीमात्र फरक पडत नाही.."

काजल वैतागून आपल्या डॉक्टर मैत्रिणीला सांगत होती..

"मी काही डॉक्टर रिकमेंड करू का? माझ्या ओळखीत आहेत काही.."

"तुझ्याकडे आणलं असतं पण तू आहेस डेंटिस्ट...त्यांचं दुखणं वेगळंच.."

"अरे देवा..उगाच डेंटिस्ट कोर्स केला मी."

"जोक कसले सुचताय तुला..."

"मला सांग.. त्यांना त्रास काय होतोय विचारलं की काय सांगतात?"

"डोकं जड झालंय... काही सुचत नाहीये... काही करू वाटत नाहीये.."

"त्यांचे रिपोर्ट्स पाठव बरं मला.."

काजलने तिच्या डॉक्टर मैत्रिणीला रिपोर्ट्सचे फोटो पाठवले. डॉक्टर मैत्रिणीने ते नीट पाहिले. सगळं अगदी नॉर्मल होतं. खेडेगावात त्यांचं बालपण आणि तरुणपण गेलं होतं. तिथलं सकस अन्न, शारीरिक कष्ट यामुळे त्या अजूनही निरोगी होत्या. मग यांना दुखणं कसलं आहे नक्की? डॉक्टर मैत्रीणही विचारात पडली.

काजल आणि तिची डॉक्टर मैत्रीण अगदी सख्ख्या मैत्रिणी. एकमेकांसाठी अगदी वेळोवेळी धावून जात. मनातलं सगळं एकमेकींशी शेयर करत. काजल बारावीनंतर bsc कडे गेली आणि तिची मैत्रीण डॉक्टरकीकडे. काजलचं लग्न लवकर झालं, याउलट तिच्या मैत्रिणीचं शिक्षणामुळे लग्न अजूनही बाकी होतं.

मैत्रीण तिचं क्लिनिक बंद करून संध्याकाळी घरी गेली. गेल्या गेल्या तिच्या आईला म्हणाली,

"आई आज जेवायला काय आहे?"

"वरण भात.."

आईने आळस देतच उत्तर दिलं..

"आज मूड खराब आहे वाटतं.."

"अगं आत्या येऊन गेली सकाळी.." तिची बहीण जेवता जेवता म्हणाली..

🎭 Series Post

View all