Login

यातना!

विरहाच्या यातना!
शीर्षक:- यातना

विरहाच्या यातना
प्रेमाची आशा लावे
आयुष्य सावरायला
फक्त ओंजळभर प्रेम मावे

दूर जाण्याची भाषा
आता नको करुस
उगाच विरहाचे रंग
त्यात पुन्हा नको भरुस

वेड्या तुझ्या मनाला
थोडा तरी आवर घाल
फक्त बोलू नकोस उगाच
सोबत एक पाऊल तरी चाल

आयुष्य जगायला एकत्र
विश्वास त्यात डोकावतो
समजूदारपणा नसल्यास
गैरसमज त्यात सोकावतो

© विद्या कुंभार

🎭 Series Post

View all