" ज्योती मला जरा पाचशे रुपये देशील का ?
आज संध्याकाळी मेघाताईंच्या नातीचा वाढदिवस आहे . काहीतरी भेटवस्तू घेता येईल..
जरासं घाबरतच सुधाबाईंनी विचारले.

त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच ज्योतीने पर्समधून पाचशेच्या करकरीत नोटा काढल्या आणि सासूबाईंना म्हणाली,
हे घ्या आई. पाच हजार आहेत. ठेवा तुमच्याकडे . लागतील तसे खर्च करा.

अगं पण मला फक्त पाचशे बस झाले . तसंही मला इतके पैसे खर्च करायची सवय नाही आणि लागले तर मागेल की सुहासकडे.
सुधाताई उरलेले पैसे ज्योतीच्या हातात देत म्हणाल्या.

अजून किती दिवस तुम्ही दुसऱ्यांना पैसे मागत राहणार आई?
जरा स्वतःसाठी पण खर्च करायला शिका की.
जरा स्वतःसाठी पण खर्च करायला शिका की.
ज्योतीच्या या वाक्याने सुधाबाई भूतकाळात हरवल्या.
३५ वर्षापूर्वी......
सुधा लग्न करून या घरात आली.
तेव्हा सासू सासरे, २ मोठे दीर ,जावा, त्यांची मुलं असा सगळा गोतावळा होता.
दीर आणि नवरा पगार आणून सासऱ्यांच्या हातात देत.
मग पुढचा महिनाभराचा खर्च, भाजीपाला , वीज - दूध - किराणा बील यांचा हिशोब सासरे बघत. ठराविक रक्कम सासूबाईंकडे देत. त्या बिचाऱ्या त्यातच नातवंडांचा खाऊचा हट्ट, तिन्ही सुनांना कपडालत्ता , किरकोळ खर्च यासाठी पैसा पुरवून वापरत. त्यामुळे त्यांची स्वतःची आणि सुनांची कधी मनासारखी हौसमौज झालीच नाही.

एकदा दिवाळीला जरा बऱ्यापैकी पैसे हातात पडले म्हणून सासूबाईंनी स्वतःला आणि तिन्ही सुनांना महागातल्या साड्या, नातवंडांना कपडे, बूट, खेळणी वैगेरे खरेदी केले.
यांवर सासऱ्यांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं.
अक्कल आहे का तुम्हाला काही ? इकडे नवरा आणि मुलं घाम गाळून पैसे कमवतात आणि तुम्ही खुशाल त्यांच्या कमाईवर चैनी करत सुटलात.
इथून पुढे असल्या वायफळ खर्च केलात तर याद राखा.
सासरे जोरात सासूबाईंवर कडाडले.
सासऱ्यांच हे वागणं पाहून सुधा भेदरली. हा प्रसंग तिच्या मनावर कायमचा कोरला.

त्यानंतर सासूबाईंसकट तिन्ही सुनांना फक्त अतिशय आवश्यक वस्तूसाठी सासऱ्यांना पैसे मागायला लागायचे.
मग त्या वस्तूची गरज पाहून सासरे ठरवत पैसे द्यायचे की नाही.

सुधाच्या माहेरीही काही श्रीमंती नव्हती. फरक इतकाच की वडील प्रेमळ होते पण परिस्थिमुळे हौसमौज त्यांना करता आली नाही.
पुढे सासरे गेले आणि तिन्ही बिऱ्हाडं वेगळी झालीं .
सासऱ्यांची परंपरा नवऱ्याने चालवली. मुलगा कमावता झाला आणि घरी त्याचासारखीच कमावणारी सून आणली.
नवरा गेला आता मुला - सुनेकडे मागण्याची वेळ आली असे वाटत असतानाच त्यांचा अंदाज खोटा ठरला.

आता वर्तमानकाळात........
ज्योती - आई ...अहो तुम्हाला म्हणतेय मी .
आता बस झालं घरातल्या गोष्टींसाठी खर्च करणं . हे मी आणि सुहास बघून घेऊ.
हे पैसे ठेवा आणि इथून पुढे दर महिन्याला पगार झाला की तुम्हाला न मागताच पैसे मिळतील. त्यातून तुम्हाला जसा खर्च करायचा आहे तसा करा. त्याचा हिशोब कोणाला द्यायची गरज नाही.

ज्योतीचं बोलणं ऐकून सुधाताईंच्या डोळ्यातून पाणी आलं.
ज्योती त्यांना सावरत म्हणाली,
तुमच्या बाबतीत काय घडलं होतं, हे सुहासने मला आधीच सांगितलं आहे. पण काय करणार ? तेव्हाचा काळ आणि परिस्थितीचं तशी होती.
त्याला तुम्ही काय बदलू शकत नव्हता.
पण
आता इथून पुढे दरवेळी पैसे मागण्याची वेळ तुमच्यावर येऊ द्यायची नाही असं आम्ही ठरवलं आहे.
आता तरी घ्या ना हे पैसे. असं म्हणत ज्योतीने पुन्हा सुधाताईंचा हात धरून पैसे ठेवले.

तुझ्यासारखी सून सर्वांना मिळो, असे म्हणतं सुधाताईंनी ज्योतीची दृष्ट काढली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा