Login

पैज... एक वेगळी प्रेम कहाणी...

एक वेगळी प्रेम कथा
पैज... एक अनोखी प्रेम कहाणी...

अवनी मात्र विचार करत होती.


आपल्या वडिलांना कनवीन्स करणं सोपं नाही, तिला माहिती होतं. पण मनात इच्छा तर खूप होती की शिकून एम एस सी होऊन रिसर्च, पी एच डी करावी.
सकाळी, आबासाहेब विचार तर करत होते पण त्यांनी कोणाला काही समजू दिलं नाही.
अविनाश बोलत होता
" आबासाहेब, नितीन यायचं म्हणत आहे, येईल तो उद्या परवा.

त्याची पत्नी, अनिता लगेच बोलली
" अगं बाई हो का? किती छान, खूप दिवसांनी येत आहेत ना भाऊजी! काय गं अवनी? "
पण अवनीच काही लक्ष नव्हतं.
ती तिच्याच विचारात होती
" अम्म काय, काय म्हणाल्या वहिनी? "
तिने विचारलं

काही नाही, अगं, तुझा दादा येणार आहे, पुण्याहून, तुला काही आणायचं असेल तर सांग, आत्ताच
आई असं बोलली तसं अवनी भानावर आली आणि म्हणाली
" हो हो मी फोन करते त्याला, नाही तर मेसेज करते, आई, आबा मी रुपाली कडे जाणार आहे. जाऊ ना? "
तिने विचारलं.
इतकी मोठी होऊन पण ती आपली परवानगी घेते हे बघून त्यांचा जीव मात्र सुखावला.
आणि आबासाहेब हसून बोलले
"जा, तिथे तिचा भाऊ पण येणार आहे, रितेश, त्याची आणि तुझी पण भेट होईल,"
ते हसतच म्हणाले, पण हे ऐकून तिच्या मात्र चेहऱ्यावरचे भाव बदलले. कोणी नाही पण अनिताने बघितलं. पण ती सगळ्यांसमोर लगेच तर काही बोलली नाही.

आई मी जेवायला येते गं,
आत्ता जाते रूपाकडे, खूप बोलायचंय, सांगायचंय,
म्हणत अवनी उठली आणि गाडी घेऊन गेली पण.

अनिता मात्र अविनाशला बोलली
" अशी तर किती निरागस आहे, अवनी, मला भीती वाटते, मुंबई मध्ये राहून तिचा हा निरागस स्वभाव बदलू नये
ते दोघे शाळेत निघाले होते.

असं नाही होणार, तू नको काळजी करू,
अविनाश तिची काळजी कमी करण्यासाठी बोलला.

अवनी मात्र रुपालीकडे आली.
रुपाली एक मिडल क्लास मधली मुलगी होती.
तिचे वडील एम एस ई बी मध्ये होते. आई गृहिणी होती. सगळे कुटुंब सुशिक्षित होतं.
रुपाली कॉमर्स साईडला होती
बी कॉम करून तिला जास्त काही महत्वाकांक्षा नव्हती. पदवी घेऊन लग्नाची वाट बघायची बस.
अवनी आणि ती, शाळेपासूनच्या मैत्रिणी होत्या.
अवनी श्रीमंत होती पण ती साधी होती तिला गर्व नव्हता आपले वडील सरपंच आहेत, याचा कुठेच तिने कधी फायदा करून घेतला नव्हता.

अवनीने गाडी लावली. गेट उघडलं. आणि ती आत गाडी चालवत आणायला लागली.
एवढ्यात फोर व्हीलर आली आणि तिच्या गाडीला किंचित धक्का लागला.
ती चिडून काही म्हणणार तोच गाडीची काच खाली झाली, आणि एक तरुण बाहेर डोकवत बोलला
" ओह व्हेरी सॉरी मिस..
ती मात्र स्वतः उठली आणि गाडी उचलून साईडला लावून आत यायचा प्रयत्न करायला लागली.

पडल्यामुळे जरा अंग दुखतं होतं.
ती गाडी पार्किंग मध्ये गेली, आणि त्यातून एक तरुण उतरला,

सॉरी, मी हेल्प करू का, आत जायला
त्याने अवनीला विचारलं
काही गरज नाही, खूप मदत केलीत, पुष्कळ झालं तेवढं
अवनी चिडून मोठ्याने बोलली.

अगं ए अवनी, काय गं, कधी आलीस, आणि हे गं काय, अशी का चालते आहे? बरं चल, अवनीला रूपाने हात धरून आत आणलं.

पाठमोऱ्या तिला रितेशने बघून मान नकारार्थी हलवली.

ही मुलगी अशी लगेच चिडते, मनातून तर हळवी आहे, माणसाची पारख नाही. कसं होणार हिचं मुंबई मध्ये.
तो स्वतःशी विचार करत आत गेला.

अरे भैया, कसा आहेस,
रुपालीने त्याला बघून विचारलं.

अवनी मात्र त्याच्याकडे बघून म्हणाली
" हम्म, त्याचं काय तो ठीक असणारच, भारी कार जे घेऊन आला आहे. "
तिचं असं बोलणं ऐकून रुपाली आणि तिची आई, त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागल्या.


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेजला फॉलो करा. आणि फॉलो ऑप्शन मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन निवडा. म्हणजे कथा लगेच वाचता येईल.
0

🎭 Series Post

View all